इन्सब्रुकची
सकाळ! अगदी
मागील पानावरून पुढे !
कालच्या
प्रमाणेच आजही ढगाळ वातावरण,
अधून
मधून पाऊस हे सुरूच होतं.
हवामानाचा
अंदाजही हे असच रहाणार हे
सांगत होता.
आम्ही
विमानाने इन्सब्रुकहून हॉलंडला
परतलो.
इथेही
वातावरण तसेच ढगाळ आणि पावसाळी
होते.
सुधारणेची
काही चिन्ह नव्हती आणि
हवामानखात्याची भाकितंही
पुढच्या आठवड्यापर्यंत हे
सुरूच राहील अशी होती.
यावेळी
क्युकेनहॉफला जायचच म्हणून आम्ही मे महिना गाठला होता.
क्युकेनहॉफ
म्हणजे ट्युलिप्सची बाग.
इतके
फोटो बघून निर्माण झालेली
उत्सुकता आम्हाला स्वस्थ बसू
देणार नव्हती. वर्षातून फक्त एक महिना ही बाग सर्वसामान्यांसाठी खुली असते. जायचे
तर सोमवारी २० मेपर्यंतच
कारण नंतर बाग बंद!
सोमवार
शेवटचा दिवस म्हणून नको.
शनिवार
रविवार खूप गर्दीचे म्हणून
नको म्हणजे उरला शुक्रवार.
त्यादिवशी
हवामान सुधारण्याची शक्यता
वर्तवलेली होती.
आम्ही
दोघांनी जाऊन यायचं ठरवलं.
तसाही
आड वार म्हणजे श्रीशैलला
जमलं नसतं आणि एकदा बघितल्यानंतर पुनः तिथे जाण्यात
त्याला काहीच रस
नव्हता.
तयारी
करायची म्हणजे इथे एक बरं आहे.
टाइमटेबलमधून
कनेक्टिंग गाड्या शोधा वगैरे
आपण करत बसायला नको.
निघण्याचं
आणि पोहोचण्याचं वेळ आणि ठिकाणं एवढ
त्या साइटवर टाकलं की सगळा
चार्ट समोर येतो.
घराजवळच्या
बस स्टॉपचं नाव माहीत होतं
म्हणून नाहीतर घरापासून इतकी
पावलं चाला हे सुद्धा सांगतात!.
तर
त्याप्रमाणे सकाळी १० वाजता निघून
पोहोचण्याचा प्लॅन बनवला आणि
सोबत खाणं,
चहा
घेऊन निघालो.
आमचं
आइंडाहोवन नेदरलॅन्डस या
देशाच्या दक्षिणेला आणि आता
जायचं ते क्युकेनहॉफ उत्तरेला,
अगदी
टीचभर देश म्हटला तरी ३ तास
प्रवासात जाणार होते.
इथून
रेल्वेने स्किपोल.
गाडी
बदलून तिथून लायडेन.
(आइंडहोवनहून
अल्कमारला जाणारी इंटर सिटी
ही लायडेनला जाण्य़ासाठीची
थेट गाडी आमच्या जाण्य़ाच्या
वेळात उपलब्ध नव्हती)
तिथल्या
व्हिजिटर्स सेंटरमध्ये कॉम्बी
तिकिट.
नंतर
क्युकेनहॉफ एक्सप्रेस या
त्यांच्या बसने पार्क पर्यंत.
स्किपोलला
गाडी ज्या प्लॅटफॉर्मवर आली
त्याच्या बाजूच्याच प्लॅटफॉर्मवर
लायडेनची गाडी आली.
पळापळ
वगैरे न करता लायडेन
गाठलं.
स्टेशनवर
उतरून बाहेर आलो.
दात
वाजायला लागले.
आम्ही अक्षरशः थडथडत होतो.
थंडी,
भणाणता
वारा, आणि
भर म्हणून पाऊस!
आणखी
काय होणार?
जॅकेट,
स्कार्फ
यांना भेदून गारठा अंगात शिरत
होता.
व्हिजिटर्स
सेंटर कुठे असेल या काळजीत
आम्ही रस्त्यावर आलो.
समोरच
पाटी दिसली आणि हायसं वाटलं.
तिथे
जाऊन तिकिटं घेतली.
ही
तिकिटं,
म्हणजे
कॉम्बी तिकिट.
समोरच
बसस्टॉप आहे तिथून बस घ्या
असं त्या काऊंटरवरल्या बाईने
सांगितलं.
या
तिकिटावर तुम्ही लायडेन किंवा
स्किपोलपासून पार्कपर्यंत
जाऊ शकता.
तुम्हाला
पार्कमध्ये रांगेत उभे न रहाता
थेट प्रवेश मिळतो.
बस
आणि पार्कचे तिकिट एकत्र
म्हणून कॉम्बी.
परतीच्या
प्रवासात तुम्ही लायडेनहून
निघालात म्हणून लायडेनलाच
परत या असा आग्रह नाही स्किपोललाही
जाऊ शकता.
तुमची
मर्जी.
एकूणच
गोष्टी सुलभ करण्याकडे यांचा
प्रयत्न.
आपल्याकडची
बाबूगिरी,
नियमांचे
उफराटे अर्थ लावत अडचणीत
आणण्याची वृत्ती नाही.
लायडेनहून
निघणारी क्यूकेनहॉफ एक्सप्रेस
निघायला अवकाश होता.
(ही
एक्सप्रेस निघून थेट
पार्कच्या दारापर्यंत जाते)
म्हणून
आम्ही ५७ नंबरची बस म्हणजे
लोकल बस घेतली.
हो,
ते
तिकिट या साध्या बसलाही चालतं!
या
मार्गाने आल्याचा फायदा हा
की ही बस वळणा वळणाच्या सुंदर
रस्त्याने गावातून फिरत फिरत
रमत गमत आपल्याला पार्कपर्यंत
पोहोचवते.
अतिशय
सुंदर रस्ता,
वाटेत
लागणारी ट्युलिप्सची शेतं
त्यातील रंगांची उधळण बघत
आपण शेवटच्या स्टॉपपर्यंत
पोहोचतो.
वाटेत
कित्येक ठिकाणी गाड्या थांबवून
लोकं शेतात गेलेली दिसत होती.
आम्ही
स्टॉपला उतरून रस्ता ओलांडून
(हे
दिव्य तुम्ही एक्सप्रेस बसने
गेलात तर करावे लागत नाही)
पार्कमधे
शिरलो.
पार्कमध्ये
विविध म्हणण्यापेक्षा प्रत्येक
प्रकारची ट्युलिप्स आहेत.
गंधहीन
अशा या फुलांना रंगांचं ऐश्वर्य
मात्र देवाने मुक्त हस्ताने
दिले आहे.
त्यात
माणसाने भर घातली असावी कारण
यातील खूप फुलं मिश्र रंगांची,
मोहक
अशी आहेत.
विजेचा
बल्ब असावा तशी ही फुलं.
म्हणजे
एकटं दुकटं फूल घेतलं तर त्याला
सौंदर्य म्हणावं
असं त्यात काहीच नाही पण ती
आपल्यासमोर येतात ती घोळक्यानेच.
यांच्या
इतक्या प्रकारच्या रचना इथे
समोर येतात की अवाक व्हायला
होते.
भौमितिक
आकार झालेच पण उतरंड मांडल्यासारखी
या फुलांची रांगोळी फारच छान
दिसते.
त्यात
मधूनच जांभळ्या फुलांची
डिव्हायडिंग लाइन उठाव आणते.
पण
ही काही मैलोगणती
वगैरे दिसणारी
म्हणजे आपल्याला फोटोमधून
भेटायला येणारी शेतं नव्हेत.
त्यांच्या
रचना या तुकड्यांमध्येच
भेटतात.
पण
जरा या पार्कच्या बाहेर नजर
टाकलीत तर पाण्याच्या ओहोळाने
पार्कची हद्द जिथे संपते
त्यापलीकडे हळद कुंकवाची
शेतं असल्यासारखा प्रत्यय
देणारी विस्तीर्ण शेतं दिसतात.
ओहोळ
ओलांडून तिथे जाण्याची मात्र
सोय नाही.
पार्कच्या
रस्त्यापलीकडेसुद्धा अशीच
शेतं आहेत.
तिथे
जाता येऊ शकेल अशी परिस्थितीही.
पण.......
हा
पण महत्वाचा.
सकाळी
आम्ही आलो तेव्हा ढगाळ हवा
असली,
बोचरे
वारे असले तरी पाऊस पडत नव्हता.
सूर्यदर्शन
नव्हते पण फोटो काढण्याआड
येईल अशी उदास हवाही नव्हती
आणि असली तरी त्या रंगांमुळे
जाणवली तरी नाही.
पण
संध्याकाळचे पाच वाजले आणि
पावसाची भुरभुर सुरू झाली.
छत्री
उघडावीच लागली.
नंतर
अर्ध्या तासानंतर मात्र
पावसाने मनावर घेतल्या सारखा
जोर धरला आणि मग आवरतेच घ्यावे
लागले.
हा
पाऊस नसता तर निश्चितपणे त्या
शेतामधे जाण्याची संधी साधली
असती.
तुम्ही
कितीही रचना करा शेतामधलं
विस्तीर्ण रूप या रचनांमध्ये
प्रत्ययाला येत नाही आणि तसं
गंध, रूपहीन
फुलं बघत हिंडायचं म्हणजे
अभिनयाविना एखाद्या सुंदर
नटीचा ठोकळा बघत बसण्यासारखं
वाटतं.
महत्व
कमी करण्यासाठी नव्हे पण काही
एका क्षणी आपण त्याच गोष्टी
पुनः पुनः तर पहात नाही ना असं
वाटू लागतं.
कदाचित
याची जाणीव ठेवूनच तर या
पार्कमध्ये विविध पॅव्हेलियन्स
निर्माण केली नसतील?
त्यांना
बिऍट्रिक्स,
व्हिलेमिना,
विल्यम्स
इ राजघराण्यातील व्यक्तींची
नावं दिलेली आहेत.
ही
पॅव्हेलियन्स अतिशय कल्पकतेने
सजवलेली आहेत.
मध्यभागी
एक छतापर्यंत पिवळी फुले
असलेले झाड(!)
आहे.
जवळ
गेल्यावर कळते की असंख्य
बाटल्यांमध्ये झाड ठेवून
त्या बाटल्यांचं झाड उभे आहे.
अशाच
प्रकारे खूप रचना केल्या आहेत.
फुलं
त्यांची शास्त्रीय नावं,
काही
ठिकाणी भौगोलिक
ठिकाणं अशी माहिती आहे.
नारळाच्या
करवंट्या,
शहाळ्याचा
भाग यात माती ठेवून वाढवलेल्या
झाडांचीही अशीच सुंदर रचना
आहे. एकूण
कल्पकता अनलिमिटेड!
इथे
एक फॅशन परेडच आहे.
बायकांचे
पुतळे आहेत.
पानं
फुलं यातून निर्माण केलेली
त्यांची वस्त्र प्रावरणे
बघताना आपण स्तिमित होतो.
परतीच्या
बसची वाट बघत आम्ही आडोशाला
उभे होतो.
पाऊस
धो धो पडत होता.
उत्तरा
म्हणाली एवढा आटापिटा करून
आलो, बघितलं
हे सगळं छानच आहे पण.......
इन्सब्रुकहून
परत येत असता स्किपोलला विमान
उतरण्यासाठी खाली येत होतं
तेव्हा जे ट्युलिप्स दर्शन
झालं (ट्युलिप्स
शेतांचा एरिअल व्ह्यू)
त्याची
सर बागेतल्या ट्युलिप्सना
नाही.
तिला
म्हणालो वाघ,
राणीच्या
बागेतला आणि कान्हाच्या जंगलात
अवचित सामोरा आलेला,
तुलना
कशी होणार?
क्युकेनहॉफच्या फोटोंची उत्सुकता खूप जणांनी व्यक्त केली होती. माझ्या अल्बमचा access देत आहे.
https://picasaweb.google.com/anandpatkie/NLKEUKENHOF?authkey=Gv1sRgCPPKpqPV_6T8vQE
क्युकेनहॉफच्या फोटोंची उत्सुकता खूप जणांनी व्यक्त केली होती. माझ्या अल्बमचा access देत आहे.
https://picasaweb.google.com/anandpatkie/NLKEUKENHOF?authkey=Gv1sRgCPPKpqPV_6T8vQE
ही फुलं वासरहित खरी पण यांचं दर्शन मोहक आणि आल्हादक आहे.
ReplyDeleteमराठीतून प्रतिक्रिया प्रकाशित होत नाहीत म्हणून हा
ReplyDeleteआनंदा,
ReplyDelete'प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर' अशी गत झाली आहे.
आमचे गेले काही मंगळवार सुंदर, रमणीय, नेत्रसुखद आणि आल्हाददायी करून सोडले आहेस.
नकळत मंगळवार उजाडायची वाटच पहातो.
तुला प्रतिक्रिया कळवताना मागे म्हटल्याप्रमाणे 'हे सर्व आपल्याकडे का नसतं ? किंबहुना का होऊ शकत नाही ?' हाच विचार प्रकर्षाने मनात येतो
खरंतर मनाला अगदी तळापासून सुख संवेदना देणारं उपभोगत असताना, असं काही आपल्याकडून लिहिलं जाऊ नये म्हणून मग प्रतिक्रिया द्दयावी कि नाही हा संभ्रम.
असो. अतीव आल्हादच्या क्षणी मन अव्यक्त होतं.
असाच काहीसा प्रकार.
सविस्तर सर्व भेटीअंती.
प्रवीण
अशा प्रतिसादातच तर पुढे जाण्याची प्रेरणा असते.
Deleteखरतर काही कारणांमुळे साइटवर थेट लिहिता न आलेल्या आणि मेलद्वारे मिळालेल्या प्रतिक्रिया तुझ्या या प्रतिक्रियेप्रमाणेच इतक्या सुंदर आहेत की त्यांचाच एक लेख व्हावा. काहींचं संकलन करून रविवारपर्यंत देण्याचा अवश्य प्रयत्न करतो.