तारीख
२ मे २०१३.
स्थळ
अम्मान एअरपोर्ट.
आम्ही
निवांत बसलो आहोत.
पुढच्या
विमानाला अजून तीन तासांचा
अवधी आहे.
सभोवतीचं
वातावरण बघितलं तर परदेशात
आहोत अशी पुसटशीसुद्धा शंका
येऊ नये इतकी भारतीय माणसं
आहेत.
समोर
एक उंच खुर्ची,
पबमध्ये
असते तशी.
त्यावर
एक जटा-दाढीधारी
पद्मासन घालून बसला आहे.
येणारा
जाणारा त्याच्याकडे बघत बघत
जातो आहे.
काहीजणांच्या
हातात विमानात दिलेला ब्रेकफास्ट
दिसतो आहे.
अशी
निरीक्षणं करता करता मन माझं
मुंबईत पोहोचलं.
१
मेची रात्र!
वातावरणात
चैत्र असूनही
वैशाखवणवा.
विमानाची
वेळ पहाटे पाच वाजता म्हणजे
रिपोर्टिंग रात्री (की
पहाटे?)
२
वाजता.
कोण
इतक्या रात्री पोहोचवायला
येणार?
आमच्या
झोपेचं खोबरं ठीक आहे बाकी
कोणाच्या कशाला?
तसही
रात्री कितीही वाजता खाली
उतरलं की शिवाजी पार्कला
टॅक्सी मिळते.
उन्हाळा
मी म्हणत होता.
त्यात
यावेळी आंब्याचा सीझन म्हणून
आंब्यांचं ओझं बरोबर.
जाड
जाड स्वेटर्सचं (
त्याला
जॅकेटस म्हणतात!
गावंढळासारखं
स्वेटर्स स्वेटर्स करू नका
इति, दुसरं
कोण असणार?
चिरंजिवांशिवाय)
काय
करायचं?
सामानात
त्यांचं वजन होतं आणि अंगावर
वागवता येत नाहीत अशी असून
अडचण नसून खोळंबा अशी गत!
सामानाला
अडकवले तर लोळतात म्हणून सरळ
कमरेला बांधून बसलो टॅक्सीत.
तिकिटं
काढताना उजवी बाजू बघून तिकिटं
काढण्याची सवय.
यावेळी
तर हट्टाने रॉयल जॉर्डेनिअनचं
तिकिट काढलं होतं.
ऐकल्यावर
राजू म्हणाला होता "पोहोचलास
की फोन कर रे बाबा!
काही
खरं नाही.
आपल्या
वायुदूतच्या तोडीची कंपनी
आहे ही.
मधेच
दरवाजा वगैरे
उघडायचा!”
मी
उत्तराला बोललो नव्हतो पण
आता सगळं व्यवस्थित झाल्यावर
म्हटलं सांगायला हरकत नाही.
अम्मानला
बसल्या बसल्या डोळ्यापुढे
हे सारं तरळून जात होतं.
खरोखरच
कसा होता अनुभव?
एका
शब्दात,
उत्तम.
विमान
छोटं होतं पण व्यवस्था चांगली.
नाश्ता
या सदरातलं जेवणाचा ऐवज
आणि त्याची क्वलिटी चांगली
होती.
विमान
वेळेत होतं.
अम्मानला
ते जेव्हा उतरलं तेव्हा बारीकसा
हिसकाही बसला नाही.
इतक
अलगद आणि स्विफ्ट लॅन्डिंग
आतापर्यंत मी अनुभवलेलं नाही.
एकूणच
मन प्रसन्न होतं.
विमानतळाची
इमारत जुनाट आहे त्यात खाली
उतरून बसने जायचं म्हणजे
प्रिमिटिव्ह आहे असे विचार
डोक्यात यायच्या आत विरूनही
गेले. बसने
आलो हे खरं पण विमानतळाची ही
इमारत सुंदर आहे.
वाळवंटी
वातावरणात मिसळून जाईल अशी.
रंग
मातकट सिमेंटचा.
कमानींचं
डिझाइन,
सिडनीच्या
ऑपेरासारख्या कमळाच्या
पाकळ्या.
प्रकाश
आत येण्यासाठीचे झरोके आणि
त्यातून झिरपणा-या
प्रकाशाच्या विविध आकृतीने
सजलेल्या भिंती!.
श्रीमंती
आणि अभिरुचीमधला फरक दर्शवणारी
एकूण रचना.
एकापुढे
एक अशी डिपार्चर गेट्स.
आणि
तसही स्वस्त पडत असल्यामुळे
असेल कदाचित,
पण
असंख्य भारतीय लोकांनी निवडलेला
मार्ग.
फार
परक्या ठिकाणी आहोत असं लोकांकडे
बघून वाटतच नव्हतं.
त्यातून
"त्यां"चे
कानावर पडणारे खल्लास वगॆरे
परिचित शब्दही कुठलातरी समान
धागा जाणवून देत होते.
आपण
प्रवास कुठून कुठे करतो हे
खूप महत्वाचे,
कोणत्या
वेळी करतो हेही.
आम्ही
ऐन उकाड्याच्या
भरातून निघालो तरी ती मुंबई
होती.
कितीही
झालं तरी आपलं शहर.
मुंबई
हिरवी नसेल पण वैराण
नाही.
अम्मानला
उतरण्यापूर्वी आम्हाला
क्षितिजापर्यंत दिसत होतं
ते फक्त वाळवंट.
मधेच
एखादा गवताचा वाटावा असा
पट्टा,
त्याला
हिरवा तरी कसा म्हणावा?
फारच
झालं तर खुरटी झाडं!
एकूण
फार उत्साह वाटावा अशी परिस्थिती
नाही.
अम्मानचा
विमानतळ आवडला तरी भवतालचा
परिसर काही नेत्रसुखद निश्चित
नव्हे.
पुढच्या
प्रवासाकरता विमानाने
अॅमस्टरडॅमकरता
झेप घेतली.
सिनेमा
कोणते आहेत ही लिस्ट पुनः
बघितली.
आशादायक
काहीच नव्हतं.
world cinema या
सदरात असणारे हिंदी सिनेमा
प्रामुख्याने अक्षय कुमारचे,
इम्रान
हाश्मीचे म्हणजे त्यापेक्षा
झोप बरी वाटणारे.
इतर
जागतिक भाषांमधले सिनेमा पण
सबटायटल्स मात्र अरेबिक (किंवा
जी कोणती अपसव्य लिपीतली असतील
ती) तेव्हा
ते उपयोगाचे नव्हते.
काही
वेळ डोळे मिटून काही वेळ
विमानाचा मार्ग बघत असा टाइमपास
सुरू होता.
अधेमधे
त्यांचं सुग्रास जेवण,
खाणं
झालं. एकूण
प्रवास,
दोन्ही
वेळी खूप चांगला झाला.
विमानाची
उंची कमी होते आहे असं वाटलं
म्हणून हळू खिडकी वर केली.
या
विमानातून ही खिडकी बंदची
सक्ती का कोण जाणे!
पण
यावेळी कोणाची आक्षेप घेणारी
हाक आली नाही म्हणजे अॅमस्टरडॅम
जवळ आलं!
खरतर कोणी सांगायची आवश्यकताच नव्हती. सर्वदूर पसरलेली हिरवीगार कुरणं! हिरवा सोडून कोणताही रंग या देशाच्या मातीला मान्यच नाही असं एकूण वातावरण. श्रीशैल पहिल्यांदा आला होता इथे त्यावेळी तो म्हणाला होता बाहेर खिडकीतून हिरवागार रंग दिसला की नेदरलॅन्डस आलं म्हणून समजायचं, हे किती सार्थ होतं त्याचा पुनःप्रत्यय आला.
खरतर कोणी सांगायची आवश्यकताच नव्हती. सर्वदूर पसरलेली हिरवीगार कुरणं! हिरवा सोडून कोणताही रंग या देशाच्या मातीला मान्यच नाही असं एकूण वातावरण. श्रीशैल पहिल्यांदा आला होता इथे त्यावेळी तो म्हणाला होता बाहेर खिडकीतून हिरवागार रंग दिसला की नेदरलॅन्डस आलं म्हणून समजायचं, हे किती सार्थ होतं त्याचा पुनःप्रत्यय आला.
हा
प्रवास उकाड्यातून सुखद
गारव्याकडे होता तसाच तो
कल्लोळातून शांततेकडेही
होता. या
दोन टप्प्यांमधलं वैराण
वाळवंट हेसुद्धा याच
जीवनतलं एक सत्य आहे हे
दाखवण्यासाठी तर आमचा अम्मानचा
थांबा नव्हता ना?
खरं
काय आणि खोटं काय या संभ्रमात
पडावं असे हे क्षण!
पण
हेच तर आयुष्य असतं की.
या
प्रवासाने मला काय काय दिलं
होतं याचे विचार तरळत असताना
विमानाने जमिनीवर झेप घेतली.
मात्र
ती अम्मानसारखी स्विफ्ट
नव्हती.
मला
सत्यात आणणारा तो झटका होता.
आम्ही
अॅमस्टरडॅम
विमानतळावर उतरलो होतो.
Travelling through various national airlines offers an opporutunity to taste different cousines at not extra cost. Please share your experience.
ReplyDeleteI travelled through Turkish Airways and savoured excellent Turkish Cousine and not to mention of Raki.