पावसाने
धारण केलेले रौद्र
रूप,
संपूर्ण
रिकामी झालेली बस आणि तो हायवे!
एखाद्या
हॉरर चित्रपटातला प्रसंग.गांभीर्य
वाढवणारा वगैरे
वगैरे.
इथे
मात्र तसं काही घडणार नव्हतं.
थोडा
वेळ गेला.
ड्रायव्हर
त्याच्या समोरच्या आरशातून
आमच्याकडेच बघत होता.
त्याने
खूण केली आणि बस रस्त्याच्या
कडेला घेऊन थांबवली.
.
आम्ही
उतरलो तो हमरस्ता होता.
शेजारी
एक हॉटेल वगळता दुसरं काहीच
जवळपास दिसत नव्हते.
वाहनांचा
सुसाट वेग,
भणाणता
वारा,
हातात
पावसापासून संरक्षण होण्यासाठी
छत्र्या आणि सामान अशा
जाम्यानिम्यानिशी आम्ही
रस्त्याच्या कडेला उभे!
त्या
हॉटेलमधे जाऊन चौकशी
करायला श्रीशैल
गेला पण त्याचा काही उपयोग
झाला नाही.
गूगलवर
सर्च मारल्यावर उतरण्याचं
ठिकाण बरोबर आहे हे जरी कळलं
तरी तसेच पुढे जाण्याकरता ते
दाखवत होतं.
या
हायवे वरून दोन्ही बाजूंनी
वेगात जाणा-या
गाड्यांबरोबर छत्र्या आणि
सामान सांभाळत चालणे केवळ
अशक्य होते.
तरी
श्रीशैल
म्हणतो आहे तर जाऊ म्हणून थोडे
गेल्यानंतर त्याच्याच लक्षात
त्याचं वैय्यर्थ
आले आणि मग त्याने शेवटचा
उपाय,
जो
खरातर सुरवातीलाच वापरला तर
उपयोगात जास्त येतो,
फोन!
तो
लावला.
अगदी
निघतेवेळी
बुकिंग केले होते त्यामुळे
पत्ता हातात होता तरी फोन नंबर
घाईत घेतला तो त्या साइटचा
निघाला.
त्यांनी
१० मिनिटात फोन करा सांगितले.
त्याप्रमाणे
संपर्क साधल्यावर आम्ही जिथे
उतरणार होतो तो फोन नंबर मिळाला.
आम्ही
बसमधून जिथे उतरलो होतो
त्यापासून थोडे पुढे एक रस्ता
गावात जात होता त्या रस्त्यावर
पहिलेच घर होते.
घराचं
नाव Wiesen
Hof. घर
जुने,
शेतात
असावे तसे.
दोन
मजली होते.
आतापर्यंतच्या
आमच्या सगळ्या अपार्टमेटसमधलं
हे डावं.
कदाचित
एकूण वातावरण असं ढगाळ,
पावसाळी
झाल्यानंतर आम्ही इथे आल्यावर
आमची थकलेली मनं हे इम्प्रेशन
घेऊन आली असतील.
पण
एकूण प्रसन्नपणाची कमतरता
वाटली खरी.
तसं
खरं अपार्टमेंटमध्ये आवश्यक
त्या सगळ्या गोष्टी होत्या,
कमतरता
होती ती वातावरणाची आणि त्याला
पर्याय कोणाचाच नव्हता.
थोडा
वेळ कंटाळत इकडे तिकडे करून
झालं.
इथे
एक बाल्कनी होती उघडली तर
पाऊस,
वा-याचा
हा झोत आत आला.
तसच
दार बंद केलं.
थोडा
वेळ गेला.
चैन
पडे ना.
पुनः
दार उघडलं तर वारा नव्हता.पावसाची
रिपरिप सुरूच होती.
बाहेर
आलो.
लांबवर
पसरलेली शेतं.
मघा
आम्ही आलो तो हायवे दूरवर दिसत
होता.
लांब
खालच्या बाजूला एका चर्चचं
टोक दिसलं.
भोवती
घरांची कौलं.
हे
घर गावाबाहेरचं शेवटचं.
त्यातून
त्याला जवळपास शेजार कोणी
नाही त्यामुळे फारच केविलवाणं
वाटत होतं.
घराची
मालकिण कुठे ते बघत होतो.
आम्ही
आलो तेव्हा स्वागताला पुढे
आली होती नंतर कोणत्या खोलीत
गडप झाली तेच कळलं नाही.
आपले
गावाकडचे वाडे जसे भूलभुलैय्या
असतात त्याची आठवण झाली.
तिला
भेटून गावात खाण्यापिण्याची
व्यवस्था काय होऊ शकेल असं
विचारलं तर म्हणाली हा ऑफ सीझन
आहे त्यामुळे एखाद दुसरं हॉटेल
यापलिकडे काही सोय नाही गावात.
तुम्ही
रस्त्याने सरळ गेलात की एक
ड्रॅगनचं चित्र दिसेल.
ते
हॉटेल उघडं असतं.
तिथे
चांगलं फूड मिळेल.
नोंद
घेण्यासारखी बाब म्हणजे या
सगळ्या अपार्टमेंटसची व्यवस्था
बघणा-या
त्या घरातल्या गृहिणी होत्या.
त्यांना
कामचलाऊ का होईना इंग्रजी
येत होतं.
आम्ही
निघालो.
तसेही
या पावसात ना कुठे फिरता येणार
ना कसली मजा मग निदान लवकर
जेवण
आटोपून
घेऊ.
उद्याचं
फ्लाइटही लवकरचं आहे तेव्हा
झोपून जाता येईल.
असा
विचार करून तिथून बाहेर पडलो.
गावासारखं
गाव ते.
रमतगमत
रस्त्याने जात होतो,
थोडा
वेळ गेला आणि अचानक वातावरणात
बदल झाला.
थोडसं
उघडलं होतं.
पाऊस
होता पण रिमझिम होती.
त्रासदायक
नाही.
गाव
तसं सुस्त.पावसामुळे
असेल कदाचित पण चहल पहल नव्हतीच.
कदाचित
शहरात गेले असतील.
ड्रॅगनचा
उभा मोठा फलक दिसला.
आत
गेलो तर एकदम लाऊड म्युझिक.
लोकं
पीत बसली होती.
आतला
काळोख सुंदर मोठ्या झुंबरांनी
उजळून टाकला होता.
आम्ही
त्या गोंधळापासून लांब खिडकीपाशी
गेलो.
बाहेर
खाली उतरत गेलेलं गाव,
मघा
बघितलं ते चर्च आणि काय काय.
कसं
आपण इतकं बोअर झालो होतो मघाशी?
पाऊस
आहे म्हणून कॅमेरा घेतला नाही
ही चूक केली असं मनात येईपर्यंत
"मी
पटकन जाऊन कॅमेरा घेऊन येतो"
असं
म्हणून श्रीशैल
निघाला लगेच,
पण
आम्ही त्याला थांबवलं.
एकतर
तसं हे खूप लांब.
घर
निदान २० मिनिटांवर तरी होतं.
ऑर्डर
देऊन टेबलावर पदार्थ यायला
अर्धा तास तरी लागलाच असता
त्यामुळे त्याने ऑर्डर दिली
आणि तो बाहेर पडला.
इतक्या
छोट्या गावात इतकं छान हॉटेल
कसं चालत असेल?
कोण
येणार इथे स्कीइंग सीझनशिवाय?
या
प्रश्नांचं उत्तर दोन चिनी
मुली येऊन पुढच्या टेबलाशी
बसल्या त्यात मिळालं.
आणखी
दोन जोडपीही आली.
म्हणजे
तसा प्रश्न नसावा.
खाण्याचे
पदार्थ आले आम्ही सुरवात करत
होतो तोपर्यंत श्रीशैलही
आला.
फोटो
वगैरेना
सुरवात झाल्यावर पुनः पूर्वीचाच
momentum
आला.
तेच
ठिकाण,
तेच
वातावरण आता इतकं काही उदासवाणं
वगैरे
नाही,
आपल्याच
मनाचे खेळ सगळे असं वाटू लागलं.
इथे
तिथे फिरलो.
उद्या
बस कुठे मिळेल त्या स्टॉपचा
शोध घेतला.
तिथल्या
टाइमटेबलमधली आम्हाला सोयीची
बस बघितली.
घरी
आलो.
आमच्या
मालकिणीला नाश्त्याची वेळ
सांगणं गरजेचं होतं.
उद्याचा
नाश्ता मालकिणबाई काय देणार
हा विचार अर्थातच मनात येऊन
गेला कारण तो खाऊन नंतरच मग
एअरपोर्टकरता बस पकडायची
होती आणि विमानात काहीही खायला
मिळणार नव्हत,#
म्हणजे
दामदुप्पट पैसे
मोजल्याशिवाय.!
पण
अर्थात त्याची चिंता नव्हती
कारण यावेळी आम्ही आमच्या
घरच्या (!)
एअरपोर्ट्वर
उतरणार होतो.
त्यामुळे
एअरपोर्टवर उतरून घरी
पोहोचण्यासाठीचा रेल्वेचा
कंटाळवाणा प्रवास नव्हता.
मन
प्रसन्न असलं की असे मुद्दे
पण पॉझिटिव्ह वाटायला लागतात
याची गंमत वाटता वाटता
आजच्या
दिवसातल्या शिणवट्याला मग
वाट करून दिली आणि मनातली
उदासी मागे टाकत छान झोपून
गेलो.
# Low cost flights या संकल्पनेत खाणे पिणे या गोष्टींना फाटा दिलेला असतो.
वाचणा-याला बरोबर घेऊन जायची शैली तुला चांगली जमलीय. शिवाय अपलोड केलेले फोटोसुद्धा तू जे पाहिलंस ते अधिक स्पष्ट करतात,
ReplyDelete