इटली नेपल्स (३)
आंम्ही
ग्रोटो अझ्झुराची गुहा बघून
आलो त्या छोट्या बोटीने परत
फिरलो.
उन्हाची
तीव्रता आता सतावत होती.
मला
कान्हाची आठवण झाली.
एकदा
का वाघाचं दर्शन झालं की इतर
प्राणी बघण्यात कोणालाच रस
रहात नाही तसं मग मघा जाताना
ज्या म्हणून गोष्टी औत्सुक्याने
बघत एकमेकांना दाखवत होतो
त्यांच्याकडे परतीच्या
प्रवासात ढुंकूनही न पाहता
आम्ही काप्रीच्या किना-याला
लागलो.
पाच
वाजण्याचा सुमार असावा.
काप्री
गावही सुंदर आहे असं ऐकलं
होतं.
आता
आलोच आहोत तर चक्कर टाकू या
म्हणून चौकशी केली.
गावात
म्हणजे सिटी सेंटरला जाण्याकरता
बस आणि फ्युनिक्युलर असे
पर्याय होते.
दुसरा
आम्हाला माहित नसलेला.
भाषेची
बोंब.
त्यामुळे
समोर दिसलेल्या बसमध्ये चढलो.
खेळण्यातली
वाटावी अशी छोटी बस,
वळणा
वळणाचे रस्ते,
गिरक्या
घेत घेत वर गेलो.
उतरून
जरा फिरावं म्हणून निघालो तर
त्या सेंटरचा जीव एवढासा.
परत
फिरण्यापेक्षा छोट्या
रस्त्यांवरून जाण्याचं ठरवलं.
झाडांनी
गच्च असा रस्ता,
उंच,
सखल
साधारण आपल्या माथेरानची
आठवण यावी.
रस्त्यात
गंध भरून राहिलेला.
फुलं
म्हणावीत तर तसा नैसर्गिकही
वाटला नाही.
दुकानांमध्ये
आयुर्वेदिक चूर्ण वगैरे असावी
असं काहीतरी दिसत होतं,
पण
हा वास वेगळाच होता.
पुढे
गेलो तर जरा वरच्या बाजूला
उंचावर असा एक मोठा तांब्याचा
बंब आणि उभट भांडं दिसलं.
वाफ
त्या उभट भांड्यातून नळ असलेल्या
बंबात जाऊन गार होत असावी.
त्या्तून
थेंबथेंब पाणी पडत होतं.
त्या
पाण्याचा आणि या वासाचा काही
संबंध होता का?
इतका
वेळ आम्ही त्या भांड्याच्या
आकाराच्या प्रेमाने आंधळे
झालो होतो बहुधा.
कारण
मागे स्वच्छ पाटी होती ANTICA
OFFICIN DEL PROFUMO. अत्तराने
सुगंधित केलेल्या रस्त्यावरून
पूर्वीचे राजे रजवाडे जायचे
अशी वर्णनं आपण वाचतो.
आम्हालाही
आज तसच वाटलं.
पुढेही
मग तसाच आणखी एक बंब दिसला.
कारखाने
असावेत बहुधा.
समुद्राची
दुसरी बाजू दिसत होती.
आरामात
फिरता येण्यासारखा माहोल
होता.
पण
नंतर असं वाटू लागलं की शेवटच्या
फेरीपर्यंत इथे थांबण्याइतकं
काय असेल?
पुनः
हवामानावर सगळं अवलंबून तर
वेळेत परत फिरावं.
आम्ही
पोहोचलो होतो त्यापुढे संरक्षित
भागच होता.
म्हणजे
तसही परतच फिरायचं होतं.
तो
सुगंध मनात साठवत आम्ही परत
फिरलो.
मघा
पाहिलेल्या त्या पाट्या
वाचताना,
परफ्युमला
प्रोफुमा म्हणताना,
ज्ञानेश्वरीतल्या
लडिवाळ शब्दांची आठवण झाली.
परतताना
माझी
फेरीची हौस मात्र
पूर्ण झाली.
दुमजली
मोठी बोट.
तिच्या
पोटात तळमजल्यावर गाड्या
स्कूटर्स वगैरे वाहनं व्यवस्थित
उभी करून ठेवलेली.
गाडीत
कोणीही बसून रहायचं नाही हा
नियम लिहिला होता आणि प्रत्येकजण
तो पाळताना दिसत होते.
गाडी
पार्क करून बाजूच्या किंवा
मागच्या जिन्याने वर जाऊन
बसत होते.
या
बोटीच्या खिडक्या उघड्या
नव्हत्या आणि काचा धुरकट
होत्या त्यामुळे बाहेरचं
दिसण्याची शक्यता नव्हती आणि
इच्छाही.
शांतपणे
बसू म्हणून मधल्या गॅंगवेच्या
जवळच आम्ही बसलो होतो.
बोटीच्या
मध्ये जिना आणि दोन्ही बाजूना
माणसं बसलेली.
थेटरप्रमाणे
खुर्च्यांच्या
ओळींमधे दोन ठिकाणी मोकळी
जागा,
येण्याजाण्याकरता.
बसल्यानंतर
काही वेळाने एक इटालिअन
म्हाता-यांचा
ग्रूप आला.
सगळ्यांना
एका ठिकाणी बसणं काही शक्य
नव्हतं म्हणून विखरून बसल्या.
पण
बसल्या तिथून एकमेकींशी बोलणं
सुरू होतं.
इटालिअन
भाषा बहुधा हळू बोलताच येत
नसेल आणि त्यांच्याकडे स्मित
याला पर्यायी शब्दच नसेल कारण
कधीही गडगडाटी हसायचं,
दिलखुलास!
बोट
सुरू झाल्यावर जरा स्थिरस्थावर
झाल्यावर मग थोडं काही काही
ऐकू येण्याजोगी शांतता अनुभवली.
आम्ही
जिन्याजवळच्या दारासमोरच
बसलो होतो.
तिथे
एक मुलगी तिच्या हातात एक छोटं
बाळ घेऊन उभी आणि ते बाळ बेंबीच्या
देठापासून ठणाणा करत आहे असा
पुढचा सीन सुरू झाला.
सगळेच
अस्वस्थ.
तिच्या
शेजारी असलेला तिचा बॉय फ्रेन्ड
की नवरा हताशपणे त्या रडण्याकडे
बघत काही न सुचल्यासारखा उभा
होता.
ती
मुलगी कातावली होती.
या
बायकांनी ते रडणं ऐकलं होतं
पण होइल बंद थोड्या वेळात
म्हणून त्यांच्या गप्पा सुरू
होत्या.
बाळाने
आता शेवटच्या पट्टीतला सूर
लावला आणि त्या आजींचा संयम
सुटला.
सरळ
तिच्याकडे गेल्या आणि त्यांनी
ते मूल स्वतःकडे घेतलं.
छातीशी
धरून जोजवल्यावर तेही हळू
हळू हुंदकत हुंदकत शांत झालं.
त्या
मुलाने निःश्वास टाकला असावा,
त्याचं
आणि त्याच्या आईचही टेन्शन
संपलं.
ती
आजी संपूर्ण तासभर त्याला
घेऊन उभी होती आणि तो तिचा
नातू/
नातही
निवांतपणे तिच्या हातात पहुडला
होता.
त्या
ग्रूपमधल्या दोघी बायका एक आमच्या
शेजारी आणि एक पुढच्या रांगेत अशा बसल्या होत्या.
आमच्या
शेजारी बसलेल्या बाईला उत्तराशी
बोलायची खूपच उबळ.
काहीतरी
ती सांगत होती उत्तरा हसून
हो म्हणत होती.
एवढ्यात
तिने हातातलं फूल पर्समध्ये
ठेवायला घेतलं.
सायलीचं
ते फूल बघून उत्तराने
काहीतरी विचारलं तर लगेच या,
जस्मिना
जस्मिना म्हणून तिने ते तिला
देऊनही टाकलं.
पुनः
हसण्याचा धबधबा.
आम्हाला
काही कळेना .तिच्याकडे
बघितलं तर ती तिच्या मैत्रिणीला
वरून पडणारं एसीचं पाणी आणि
नको तिकडे झालेलं ओलं हसून
दाखवत होती.
या
लोकांचा हा दिलखुलास स्वभाव
प्रेमात पडावा असा आहे.
भाषेची
अडचण असेल पण समजण्याची नाही
हे मात्र इथे चांगलच जाणवतं.
to be contd.