स्वित्झर्लंड फ्रायबुर्ग
इंटरलाकेनमधला
शेवटचा
दिवस.
मनसोक्त
हिंडून
झालं
होतं.
आता
फिरण्याने
मन
भरलं
होतं.
पण
स्वित्झर्लंडमध्ये
आता
पुरे
असं
म्हणायची
सोयच
नाही.
खरतर
जेव्हा
या
ट्रीपचं
आम्ही
ठरवत
होतो,
यातला
आम्ही
हा
उगाच
आहे,
खरतर
श्रीशैल
ठरवत
होता
आणि
मेलवरून
आम्हाला
हे
tentative
आहे
तुम्ही
एकदा
हो
म्हटलत
की
मग
पुढे
जाऊ
असं
सांगत
असे.
त्याला
उत्तर देताना
मेलमध्ये
आम्ही
मम
म्हणत
असू
एवढाच
संबंध
आमचा.
पण
याला
एक
मोठा
अपवाद
आहे.
इंटरलाकेन
शेवटचं.
तिथून
बर्न ही त्यांची राजधानी.
तिथे
दोन दिवस राहून
बाझलला
(Basel)
येऊन
आपल्याला
आइंडहोवनपर्यंत
थेट
गाडी
आहे
असं
त्यानी
सांगितलं
मात्र,
उत्तराच्या
अॅटिनाने
काम
करायला
सुरवात
केली.
आत्तापर्यंत
वीणा
पाटील,
केसरी
आणि
तत्सम
यांच्याबरोबरीने
सीरिअलमधील
हनीमूनर्समुळे
झालेल्या
ज्ञानाप्रमाणे
युंगफ्राऊचं
नाव
आलं
पण
माऊंट
टिटलिस
काही
हा
म्हणायला
तयार
नाही हे तिच्या
लक्षात आलं.
ते
विचारल्यावर
श्रीशैल
म्हणाला
ते
खूप
आऊट
ऑफ
द
वे
आहे
आणि
इथल्या
साइटसवरून
काही
फार
छान
असेल
असं
वाटत
नाही.
तो
रीजनच
वेगळा
आहे.
एकतर
हा
युंग
फ्राऊ
रिजन
किंवा
माऊंट
टिटलिस.
तुम्ही
काय
ते
ठरवा
आणि
सांगा.
आमच्याकडे
टप्प्याटप्प्याने,
नेगोशिएशन
वगैरे
शब्दच
कोशात
नाहीत.
थेट
तलवार
काढून
लढाईला
सुरवात!
माऊंट
टिटलिसला
जाता
येणार
नसेल
तर
मग
स्वित्झर्लंड
नको
दुसरा
देश
बरा.
श्रीशैल
अवाकच
झाला
असावा.
त्याने
आतापर्यंत सगळं ग्राऊंडवर्क
पूर्ण केलं होतं.
तसा
tentative
प्रोग्रॅम
आम्ही हो म्हटला होता.
कालपर्यंत
यावेळी फक्त स्वित्झर्लंड,
त्याशिवाय
काही नाही म्हणणारी आई ती हीच
का असा प्रश्न त्याला पडला
असेल.
तो
म्हणाला ठीक आहे
मी
कसं
बसवता
येईल
ते
बघतो
आणि
सांगतो.
सगळं
बघून
एक
दिवस
इकडचा
तिकडे
करून
मग
त्यात
हे
माऊंट
टिटलिस
जेव्हा
आलं
तेव्हा
तिचा
जीव भांड्यात पडला!
तिचीही
परिस्थिती बिकट होती.
आत्तापर्यंत
जाऊन आलेल्या प्रत्येकाने
माऊंट टिटलिसला गेला नाहीत
तर मग आयुष्य फुकटच असा सूर
लावला होता.
अखेरीस
तिच्या इज्जतका सवाल होता!
तर
मांडवली कसली सपशेल शरणागती
देऊन ते टिटलिस आमच्या प्लॅनमध्ये
समाविष्ट झालं.
तर
इतक्या कष्टाने मिळवलेल्या
या ठिकाणाविषयीची उत्सुकता
ताणलेली निश्चित होती.
त्याला
आणखी एक कारण होतं इंटरलाकेनला
उर्सुलाही पटकन म्हणाली होती
You
are visiting Mt Titlis also? Strange! कदाचित
श्रीशैल म्हणत होता ते खरं
असावं.
असावं
नाही होतच.
नंतर
जेव्हा आम्ही परत आल्यावर
नेट सर्च केला (हे
असं उलटं गाडं असतं आमचं)
तेव्हा
हे आमच्याही लक्षात आलं.
आम्ही
इंटरलाकेनहून ट्रेनने निघालो.
प्रवासाचा
हा तसा शेवटचा टप्पा.
आम्हाला
बर्न (Bern
या
शहराच्या नावाची,
म्हणण्यापेक्षा
उच्चाराची गंमत आहे.
आपण
बरा मधला ब न घेता हिंदीतल्या
बहकावामधला ब चा उच्चार त्यांना
अभिप्रेत असतो आणि आपला चुकलेला
उच्चार ते आपल्याकडून बरोबर
म्हणेपर्यंत म्हणून घेतात
हा आमचा स्टेशन काऊंटरवरचा
गमतीशीर अनुभव.)
या
त्यांच्या राजधानीच्या
शहराच्या जवळ असलेल्या
फ्रायबुर्ग (Fribourge)
ला
जायच होतं.
तिथे
स्टेशनजवळचं एक अपार्ट्मेंट
आम्ही बुक केलं होतं.
ट्रेनच्या
या प्रवासात सोबतीला नेहेमीप्रमाणेच
बर्फाचे पर्वत,
खळखळणार्या
नद्या,
गायींची
खिल्लारं,
त्यांची
पिक्चर परफेक्ट गावं वगैरे
वगैरे.
प्रवास
खूपच छान होतो इथला.
वातावारणामुळे
आणि अर्थातच सोयीसुविधांमुळेही.
बर्न
आलं आणि श्रीशैलने त्याच्या
कामाकरता त्याला शहरातच एका
ठिकाणी जायचं असल्याकारणाने
आम्हाला निरोप दिला.
आम्ही
दोघं आता फ्रायबुर्गच्या
दिशेने दुसर्या गाडीने
निघालो.
अगदीच
जवळ असलेलं ते उपनगर.
उतरलो
आणि आपली अक्कल चालवण्यापेक्षा
कोणा माहितगाराला विचारावं
म्हणून विचारलं आणि त्याप्रमाणे
निघालो.
जवळ
असलेलं ते ठिकाण 20
मिनिटानंतरही
आलं नाही तेव्हा जरा काळजी
वाटून आम्ही थांबलो.
एवढ्यात
मघाचा तो माणूस मोटरसायकलवरून
परत येताना दिसला.
आमच्याकडे
थांबून म्हणाला मी बहुधा
तुम्हाला चुकीचा रस्ता सांगितला.
पण
मला खात्री वाटत नाही.
तुम्ही
जरा मला पत्ता पुनः दाखवाल
का?
मी
तिथे जाऊन येतो तुम्ही मात्र
इथून कुठे जाऊ नका.
आम्ही
गारच झालो.
त्याला
पत्ता दाखवला,
तो
गेला आणि आम्ही असेच रस्त्यावर
उभे.
एवढ्यात
एक मुलगी समोरून आली आणि थांबून
विचारू लागली काही मदत हवी
का म्हणून.
आम्ही
पत्ता दाखवला.
तिने
तो मोबाइलवरून बघून आम्हाला
सांगितला आणि ती निघून गेली.
एवढ्या
दरम्यान श्रीशैलचे दोन तीन
फोन,
बाबा
त्या बाईला कामावर जायला उशीर
होतो आहे जरा लवकर पोहोचा.
आम्ही
निघालो शेवटी त्या मोटरसायकलवाल्या
माणसाची वाट न पहाता.
तेवढ्यात
पुनः श्रीशैलचाच फोन ती बाई
स्टेशनवर तुम्हाला नेण्यासाठी
आली आहे तेव्हा तिला भेटून
तुम्ही को ऑर्डिनेट करा.
ती
स्टेशनबाहेर भेटली आणि आम्ही
घरी गेलो.
शहरातलं
घर.
नेटकं,
व्यवस्था
असलेलं.
तिने
किल्ली दिली.
जाताना
दाराबाहेरच्या डोअर मॅट खाली
किल्ली ठेवून जाण्याच्या
सूचना दिल्या.
तिची
आणि आमची आता पुनः भेट होणार
नव्हती.
महत्वाचं
सांगायचं राहिलं.
ही
बाई या फ्लॅटच्या मालकिणीची
मैत्रीण.
ती
आणखी कुठेतरी रहात होती.
ही
मालकीण सध्या पोर्तुगालला
गेली होती,
तशी
ती कायम तिच्या कामानिमित्त
जगभर फिरतच असते.
ती
जेव्हा इथे नसते तेव्हा हे
अपार्टमेंट भाड्याने देतात.
म्हणजे
इन्कम सोर्स सुरू.
घरात
बघितलं तर तिच्या भरलेल्या
वॉर्डरोबसकट सगळ्या गोष्टी
होत्या.
कुठेही
कुलूप नव्हतं.
आणि
हे सगळं येणार्या कुठल्यातरी
देशाच्या माणसांवर भरोसा
टाकून ती जगभर निवांतपणे
हिंडत होती.
हा
माणसांच्या ठायी असलेला
विश्वास तिने कसा कमावला असेल?
आम्ही
आश्चर्य करत होतो.
ती
बाई गेल्यानंतर आम्ही आपले
चहा पिऊन बाहेर पडू या असा
विचार करत होतो.
आवरायचं
म्हणून उत्तरा टॉयलेटला गेली
ती मला हाका मारत सुटली.
म्हटलं
प्रॉब्लेम काय झाला असावा
आत्ता?
मी
जाऊन बघितलं तर ती हसतच सुटली.
" हे
बघा काय आहे इथे"
मी
थंड पडलो.
त्या
कमोडच्या फ्लश टॅंकवर एक
गणपतीची तस्बीर विराजमान
झालेली होती.
हे
काही आपलं घर नाही.
कुठे
काय ठेवावं हा त्या मालकिणीचा
प्रश्न.
वगैरे
तात्विक विचार मनात आले.
पण
तिला या गोष्टी कळणार नाहीत
हेही आम्हाला समजत होतं.
शेवटी
गणपती बाप्पांना म्हटलं जरा
आम्ही असेपर्यंत तरी आमच्याबरोबर
लिविंगरूममध्येच आम्हाला
सोबत करा.
बाहेरच्या खोलीत आलो तर घरात विविध देवांचे फोटो ठिकठिकाणी होते. अगदी तिच्या वॉर्डरोबमध्येही फोटो चिकटवलेला होता. त्याव्यतिरिक्त खूप काही बघायला मिळालं. ती जगभर हिंडत होती ती योगप्रसाराच्या निमित्ताने. आमच्या आजवरच्या अनेक यजमानांपैकी ही बाईसुद्धा भारतात खूप वेळा योगसाधना आणि शिक्षण यासाठी येवून गेलेली होती. असं जरी असलं तरी देवाधर्माच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या असतात. अगदी घाटावरल्या माणसांच्या आणि कोकणातील माणसांच्या सोवळ्या ओवळ्याच्या कल्पनांमधे फरक पडतो तर तिला फ्लश टॅंकवर गणपती ठेवण्यात काय गैर हे कळण्याची आपण अपेक्षा करणं जरा जास्तच हे आम्हाला पटत होतं.
पुढील मंगळवारी माउंट टिटलीस
पुढील मंगळवारी माउंट टिटलीस
No comments:
Post a Comment