स्वित्झर्लंड शिलथॉर्न (३)
केबल
कार जसजशी पुढे जाऊ लागली तसं
आम्ही कुठे होतो ते बघितलं. बाप रे ती शिळा ज्यावर ते स्टेशन
आहे तिचं अवाढव्य रूप नजरेसमोर
आलं आणि या लोकांच्या इंजिनिअरिंग
डोक्याला लवून सलाम केला.
वरील दोन्ही चित्रं गूगलच्या सौजन्याने
या
शेवटच्या टप्प्यात आता बर्फ
आणि फक्त बर्फच दिसणार होतं.
अर्थात
आता आम्ही ज्या सुमारे दहा
हजार फुटांच्या उंचीवर होतो
तिथे आणखी काय अपेक्षित असणार?
चहुबाजूंनी
बर्फाच्छादित डोंगरांनी
वेढलेला तो परिसर.
याचकरता
उर्सुला सांगत होती का की युंग
फ्राऊ सुंदरच आहे. ते तुम्हाला
शिलथॉर्नहून समोर दिसेलच पण
तिथे जाणारा मार्ग बराचसा
बोगद्यातून गेल्यामुळे
आजूबाजूचा परिसर दिसत नाही.
शिलथॉर्नचं
तसं नाही त्यामुळे तुम्हाला
शिलथॉर्नचा हा प्रवास नक्की
आवडेल.
आम्ही
तिला मनोमन दाद दिली.
केबल
कार थांबली आणि आम्ही बाहेर
आलो.
शिलथॉर्न
आलं होतं.
त्यांची
सगळीच स्टेशनं छान आहेत.
आता
त्या अजस्त्र चाकांचं,
लोखंडी
जाड दोरांचं कुतुहल जरा कमी
झालं होतं.
आम्ही
बाहेर पडलो ते एक सुंदर गोलाकृती
हॉटेल होतं.
संथपणे
स्वतःभोवती फिरणारं.
तुम्ही
या,
इथे
निवांत बसा आणि आमचा धंदा
चालवा.
आम्ही
तुम्हाला कसलेही कष्ट म्हणून
देणार नाही.
तुम्ही
मान फिरवण्याचीसुद्धा गरज
नाही.
तुम्हाला
एखादं शिखर पुनः पहावं वाटलं,
ते
थोड्या वेळात तुमच्यासमोर
आम्ही हजर करू!
आम्हाला
ही असली श्रीमंती उपभोगण्यापरीस
बाहेरचा बर्फ खुणावत होता.
बर्फाची
चादर नाही तर दुलई होती.
हिमशुभ्र
म्हणतो त्याचा अनुभव आम्ही
इथे घेत होतो.
आम्हाला
त्या बर्फात जाण्याची आता ओढ
होती.
इथे
येताना एक गोष्ट आम्ही कटाक्षाने
केली होती,
गरम
कपड्यांचं ओझं हॉटेलमधेच
ठेवून आलो होतो.
भन्नाट
वारा होता,
हवा
थंड होती पण जोडीला ऊन होते
त्यामुळे काही प्रश्न आला
नाही.
आम्ही
त्यांच्या व्ह्यूइंग गॅलेरीत
गेलो.
इथे
एक गोष्ट चांगली असते की चारी
दिशांना दुर्बिणी होत्या.
त्यातून
तुम्ही फोकस केलेल्या ठिकाणी
कोणतं शिखर दिसत आहे त्याचं
नाव येत होतं.
कोणाला
विचारा वगैरे भानगड नाही.
काय
बघू आणि किती बघू अशी आपली
अवस्था होते.
समोर
पर्वत शिखरांची रांग दिसते,
हिमाच्छादित.
दुर्बिण
रोखावी,
हे
टिटलिस(Titlis)
हे
युंगफ्राऊ (Jungfrau)
हे
म्यॉन्ख (Mönch)
हे
आयगर (Eiger)
ही
रांग बर्निज आल्प्सची ही युरा
वगैरे वगैरे.
नंतर
नंतर तर ते लक्षात रहाणं अशक्य
आहे म्हटल्यावर सोडून दिलं.
आपलं
काम फक्त बघण्याचं.
इथे
कोणा लेकाला परीक्षेला बसायचं
आहे?
थोडं
खाली उतरून गेलं की एक पायवाट
होती.
काही
ठिकाणी तर एकावेळी एकच माणूस
जाईल इतकी अरूंद,
खाली
उतरत जाणारी.
पायवाट
वगळता सर्वत्र पांढराशुभ्र
बर्फ होता.
पण
उतार इतका होता की कोणी त्या
बर्फावर जाण्याचं धाडस करत
नव्हतं.
खालच्या
बाजूला आणखी एक छोटी गोल
व्ह्यूइंग गॅलरी दिसत होती.
वरच्या
गॅलेरीतून दिसणारा हा
हिमसाम्राज्याचा श्रीमंती
भाग खालून दिसणार नव्हता.
तिथे
होतं दुसर्या दिशेचं दगडी
साम्राज्य.
विविध
आकाराचे कातीव,
उभे
कडे असणारे ते महाकाय पर्वत.
एखादं
चुकार बर्फाचं निशाण निसटून
तिथे बसलेलं,
पण
तुरळक.
मधेच
दिसणारा हिरवा रंग,
तोही
नीट बघितला तरच लक्षात यावा
असा.
इथेही
या परिसराचं जवळून आकाशदर्शन
घेणारे ग्लायडर्स वीर खूप
दिसत होते.
इतक्या
उंचीवरून खाली बघताना त्यांना
काय वाटत असेल या कल्पनेनेच
आम्हाला थरथरायला होत होतं.
दूर
एका शिळेच्या टोकाला घरासारखं
काहीतरी दिसत होतं.
इथून
आता वरचं हॉटेल आणि त्याच्या
पुढची खूप मोठी गॅलेरी संपूर्ण
दिसत होती.
भणाणता
वारा आणि जोडीला थंड हवा यामुळे
जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं.
सगळ्या
परिसराला डोळेभरून बघत साठवून
ठेवत आम्ही परत फिरलो.
पुनः
जेव्हा वर आलो तेव्हा तिथला
समुदाय जरा हटला होता.
त्यांचं
फोटो सेशन आटोपलं असावं.
बरं
झालं मघा थांबलो नाही ते!
या
शिलथॉर्नची माहिती देताना
सगळ्यात आधी तो जेम्स बॉन्ड
येतो!
आपल्याकडे
जबलपूरजवळ नर्मदा नदीतील
भेडाघाटला गेल्यावर ज्याप्रमाणे
ते संगमरवरी सौंदर्य रहातं
बाजूला आणि इथे या सिनेमाचं
शूटिंग झालं होतं,
तेव्हा
ती हिरॉइन आली होती किंवा हे
गाणं इथे शूट झालं अशी मौलिक
माहिती मिळत रहाते तसं हे
होतं!
अर्थात
ही फिरती गॅलेरी हा त्या
सिनेमाच्या कर्त्यांचं
कर्तृत्व आहे हे मान्य!
इथे
त्याचा जेम्स बॉन्डचा कट आऊट
आहे आणि हातात बंदूक धरल्याप्रमाणे
प्रत्येक जण त्या कट आऊटबरोबर
फोटो काढतो त्यामुळे तिथे
कायम गर्दी असतेच.
मला
तो प्रकार पिसाच्या मनोर्याला
तोलून धरण्याच्या पोजमध्ये
फोटो काढून घेण्याइतकाच पोरकट
वाटला पण इतकी लोकं त्या प्रेमात
पडतात म्हणजे त्याचही काहीतरी
आकर्षण असणारच.
तर
या सिनेमाच्या शूटिंगकरता
म्हणे इतके मिलिअन किंवा
काहीतरी खर्चून स्फोट घडवून
आणून त्या ढासळणार्या बर्फाचं
की डोंगराचं शूटिंग केलं होतं.
अवदसाच
ही!
आता
असं कोणी करू गेलं तर त्याविरुद्ध
किती आरडाओरडा होइल याची
कल्पना केलेली बरी.
आम्हाला
अर्थात त्या बॉन्डमध्ये माहिती
जाणून घेण्यापलीकडे रस नव्हताच. त्याचे फोटो आकर्षक आहेत ते बघून आम्ही पुढे झालो.
पुनः
एकदा संपूर्ण गोल फिरून घेतला.
सगळी
शिखरं डोळे भरून पाहिली.
यातल्या
माऊंट टिटलिसला आम्ही जाणारच
होतो पण बाकिच्यांचा (शिखरांचा)
इथूनच
निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला
सुरवात करायची होती.
निघताना
उर्सुलाची आठवण झाली.
खरोखरच
आम्ही इथे येण्याचा प्लॅन
करणं कठीण होतं.
गतानुगतिक
बनत आम्हीही युंग फ्राऊला
जायचे,
ते
तिच्यामुळे इथे आलो.
या
पुढेही तिच्या सल्ल्याचं
महत्व आम्हाला पटणार्या
आणखी खूप गोष्टी अनुभवायच्या
होत्या.
स्वित्झर्लंड शिलथॉर्न भाग चौथा पुढील मंगळवारी
या आधीच्या भागावरील प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे हा भागसुद्धा पटकन संपल्यासारखा वाटणं साहजिक आहे. पण काही वेळेला सुसंगतपणाकरता तर काही वेळा एखादाच भाग खूप मोठा आणि म्हणून कंटाळवाणा होऊ नये म्हणून ही खबरदारी घेत आहे. पूर्वानुभवाप्रमाणे साधारण 1200 शब्दांच्यापेक्षा मोठा भाग वाचताना त्यातील रस कमी होण्याची शक्यता जास्त असते. हे सर्व लक्षात घेऊनच लेखाकरता या मर्यादा ठरवल्या आहेत. अर्थात तुमच्या या निरीक्षणाचीही दखल घेतली आहे आणि तो प्रयोगही करून बघण्याचा विचार आहे.
No comments:
Post a Comment