स्वित्झर्लंड : झरमॅट मॅटरहॉर्न (१)
आम्ही
झरमॅटला उतरलो तेव्हा स्टेशनमधे
काहीसा काळोख होता.
हे
शेवटचे स्टेशन त्यामुळे
रहदारीला मर्यादा पडत असावी .
गाडीबरोबर
निघून जाणार्या गर्दीबरोबरच
स्टेशनही निवांतपणा अनुभवतं.
थोडावेळ प्लॅटफॉर्मवर उभे
होतो तेवढ्या वेळात गेलेल्या
गर्दीनंतरचा स्टेशनचा निवांतपणा आम्हीही अनुभवला.
नजरेत भरण्यासारखी गोष्ट म्हणजे जगभराच्या विविध भाषांमध्ये केलेलं प्रवाशांचं स्वागत. हिंदीमधलं सुस्वागतम वाचून जरा आपलेपणा वाटला खरा. तिथे लॉकर सुविधा आहेत का याची चौकशी करून आलेल्या श्रीशैलबरोबर आम्ही बाहेर पडलो. स्टेशनबाहेर समोरच काटकोनात आणखी कोणतीतरी रेल्वे होती. आता माझ्यावर कसलीच जबाबदारी नव्हती त्यामुळे कोणती, काय बघायचे कष्टही मी घेतले नाहीत. सरळ रस्त्याला लागलो.
चिंचोळा रस्ता, वाहनं फक्त इको फ्रेंडली म्हणजे बॅटरीवर चालणारी. रहदारी कमी कारण कार फ्री झोन. तरीही व्यवस्थित फुटपाथवरून चालणारे लोक. दोन्ही बाजूने फक्त आणि फक्त रहायची हॉटेल्स, रेस्तरॉं किंवा सुवेनिअर्सची दुकानं. स्विस नाइफचे असंख्य प्रकार लटकवलेले. आम्हाला त्याच रस्त्याने हॉटेलपर्यंत जायचं होतं. स्टेशनहॉर्न असं त्या हॉटेलचं नाव. आरामात पुढे जात असता रस्त्याला मोरी असते तशी लागली. पाण्याचा ओहोळ खालून झुळझुळताना दिसला. आम्ही दोघे तिकडे बघत असताना श्रीशैलने आमचं लक्ष समोर वेधलं.
समोर तो उभा होता. पांढरे शुभ्र पंख पसरून. ध्यानस्थ! एकटक, नजरबंदी झाल्यासारखा दिसणारा. मॅटरहॉर्न नाव त्याचं आणि आपण त्याला भेटणार आहोत उद्या. आमच्या मार्गदर्शकाने(!) आठवण दिली. आतापर्यंत आम्ही अगदी हा सिमल्याचा मॉल रोड किंवा मनालीमधला रस्ता दिसतो वगैरे बोलत जात होतो त्यात एकदमच ट्विस्ट येऊन गेला त्याच्या दर्शनाने. पण त्याच्यात आत्ता गुंतायला वेळ नव्हता. आधी हॉटेलवर जाणं महत्वाचं होतं त्या दिशेने आम्ही कूच करते जालो!

मघा
म्हटलं तसं खरोखरच आपल्याकडल्या हिल स्टेशनची प्रकर्षाने
आठवण होत होती.
आमच
हॉटेल म्हणजे खाली रेस्तरॉं
आणि वर आपल्याकडे लॉज असतं
त्या प्रकारचं अर्थात ते
तिथल्या वातावरणाला साजेसं
फक्त रचनेची कल्पना यावी
म्हणून स्पष्ट केलं.
बॅगा
टाकल्या की निघालं असाच एकूण
आमचा खाक्या असतो प्रत्येक
वेळी.
आजतर
तसे उशीराच पोहोचलो होतो.
अपवाद
कसा असणार?
इतर
ठिकाणांपेक्षा इथे गर्दी
खूपच होती.
आपले
लोकही खूप दिसत होते.
आम्हाला
डोसा कुठे मिळतो ते शोधणारं
एक आंध्रातलं नवीन लग्न झालेलं
जोडपंही भेटलं!
पुन्हा
मागे वळून स्टेशनवर जाण्यात
काही अर्थ नव्हता.
हे
गाव तसं छोटं त्यामुळे मग
गल्ल्या बोळ,
दुकानं
हे सगळं फिरून घेतलं.
दुसर्या
दिवशी जायच होतं मॅटरहॉर्न
बघायला.
अतिशय
वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि
पुनः डेस्टिनेशनइतकाच तिथवरचा
प्रवास रोमांचक.
काल
तसा त्याला बघितला ते दूरदर्शन
होतं.
दुरून
डोंगर साजरे म्हणतात पण हे
बर्फाच्छादित शिखरं असलेले
पर्वत ऋषीमुनींप्रमाणे वाटतात.
दराराही,
आदरही
आणि त्यांच्या प्रत्येक
दर्शनात काहीतरी नव्याने
सापडतं,
हा
निदान हिमालयातल्या शिखरांबाबतचा
माझा अनुभव.
आज
आल्प्समधली शिखरं बघताना हा
अनुभव ताडून पहायची संधी
मिळणार होती.
सुदैवाने
सकाळी हवा,
आकाशवाणीच्या
भाषेत,
स्वच्छ
आणि सूर्यप्रकाशयुक्त(?)
होती.
ढगाळ
हवामान हा इथे शाप असतो.
पर्यटकांच्या
दृष्टीने तर फारच.
त्यांचा
पूर्वनियोजित कार्यक्रम तर
ते बदलू शकत नाहीत आणि ढगाळ
वातावरणात काय कप्पाळ ती शिखरं
दिसणार?
आम्ही
आमच्या नशिबाला स्वच्छ
हवामानाकरता धन्यवाद दिले.
काल
झरमॅटच्या स्टेशनवर उतरलो
तेव्हा बाहेर पडल्यावर समोरच
गॉर्नरग्राट बाह्न (Gornergrat
Bahn) अशी
पाटी बघितली होती.
त्याच
गाडीतून आम्ही मॅर्टरहॉर्न
बघायला जाणार होतो.
आतापर्यंतच्या
आमच्या गाड्या फार सुंदर
होत्या.
ही
गाडी सुंदर म्हणावी अशी नव्हती.
रंग
लाल.
कदाचित
बर्फ पडत असता उठून दिसावा
म्हणून हा रंग घेत असावेत.
तरीही
आमची सेंट मॉरित्झची गाडी
निश्चितच देखणी होती.
यावेळी
एक गोष्ट नजरेत आली की वर दोन
पेंटोग्राफ होते आणि दोन
रूळांमध्ये एक आणखी रूळासारखं
काहीतरी दिसत होतं (magnatic?).
ही
पर्वतीय रेल्वे.
चार
हजार फुटांपासून ते चौदा हजार
फुटांचा पल्ला गाठणारी.
एकूणच
हा चढ कठीण त्यात पुन्हा आत्ता
नसला तरी हिमवर्षावातसुद्धा
ही सुरू असणार त्याकरता कदाचित
काही सोय असू शकते.
स्त्रीचं
सौंदर्य बोहोल्यावर उठून
दिसतं अशा प्रकारची एक म्हण
(निदान
समजूत तरी)
आहे.
गाडीच्या
सौंदर्याबाबत ती जेव्हा झोकदार
वळण घेते तेव्हा तिचा डौल
बघावा.
या
गाडीला तर उंच पूल,
बोगदे,
अतिशय
कठीण,
उभे
चढ,
तीव्र
उतार आणि वळणं यांच नुसतं
वरदान लाभलेलं आहे.
संपूर्ण प्रवासात आपण कंटाळायला वावच नाही. आणि त्यातही खाली दूरवर धूसर होत जाणारं झरमॅट आणि दूरवर ध्यानस्थ बसलेला तो मॅटरहॉर्न म्हणजे नजरबंदीच असते. मार्गावरची स्टेशनं ही मुख्यत्वे पर्यटकांच्या सोयीकरताच आहेत. स्कीइंग करणारे, हायकर्स किंवा अगदी नुसते पर्यटकही, या सगळ्यांना या मधल्या स्टेशनवरून कुठे केबल कार पकडायची असते कुठे हायकिंगला जायच असतं. आम्ही मात्र या गाडीने थेट वरपर्यंत म्हणजे गॉर्नरग्राट स्टेशनपर्यंत गेलो. वर एक हॉटेल आहे, नेहेमीप्रमाणेच! स्टेशनचा परिसर सुंदरच आहे. परिसराची संपूर्ण आणि सविस्तर माहिती देणारा बोर्ड समोरच आहे. आम्ही तिथल्या पुलावरून बघत असताना खाली दूरवर गाडी वर येताना दिसत होती. गाडीत बसल्यानंतर आपल्याला मार्गातला खडतरपणा कळत नाही तो असा दूरवरून चांगला कळतो. ती गाडी वर येइपर्यंत मग आम्ही तिथेच उभे राहिलो. शेवटच्या टप्प्यातली तिची ती वळणं अगदी दृष्ट लागण्याइतकी सुंदर होती. पण असे इथेच उभे राहून चालणार नव्हते. मॅटरहॉर्न समोर खुणावत होता.

दुसरा भाग पुढील मंगळवारी
एक सूचना वारंवार करण्यात येत होती की फोटो मोठ्या आकारातच दिसावेत. यावेळेपासून ती अमलात आणत आहे. पूर्वीचे फोटोसुद्धा मोठ्या आकारात दिसावेत अशी व्यवस्था केली आहे. हा फरक कसा वाटला ते जरूर कळवा.
एक सूचना वारंवार करण्यात येत होती की फोटो मोठ्या आकारातच दिसावेत. यावेळेपासून ती अमलात आणत आहे. पूर्वीचे फोटोसुद्धा मोठ्या आकारात दिसावेत अशी व्यवस्था केली आहे. हा फरक कसा वाटला ते जरूर कळवा.
वा आनंद ,तुम्हाला जसा कंटाळा यायला अवधी नव्हता तसा आम्हा वाचकांनाही कंटाळायला अवधी नाही इतक सगळ वर्णन रोचक,उत्कंठावर्धक व माहितीपूर्ण झालंय .
ReplyDelete"स्त्रीचे सौंदर्य जसे बोहल्यावर खुलते तसे गाडीचे डौलदार सौंदर्य तिच्या झोकदार वळणावर खुलून दिसते. " वा ! एकदम समर्पक उपमा दिल्येस.
Matterhorn ची नजरबंदी कशी असेल याचा अंदाज आम्हाला अप्रतिम फोटो मुळे येतोय . ' नजरबंदी' या शब्दा मुळेच योग्य तो पंच आलाय .वा वा आनन्द.
छान वर्णन ,उपमा,शैली.
ReplyDeleteछान वर्णन ,उपमा,शैली.
ReplyDeleteअप्रतिम! लिखाणाशी आपण एव्हडे एकरूप होतो की मुंबईची गरम हवा विसरायला होते!
ReplyDeleteपुन:प्रत्ययाचा आनंद अवर्णनीय आहे!