इटली वेनेझिया (व्हेनिस) (४)
गांधी
नावाबरोबर त्याने विचारलं
How
is Sonia Gandhi and her son? माझं
उत्तर काय असावं ते निश्चित
होत नव्हतं.
मग म्हटलं
तुला कोणत्या दृष्टीतून उत्तर
हवं आहे?
म्हणाला
आम्ही ऐकतो की Right
wing fanatics are taking over and Sonia is losing to them. Is it
correct? And if it is correct is it in the interest of India? माझा
अभिमन्यू होणार बहुतेक असं
वाटत असताना मी त्याला म्हटलं
कोणताही बदल हा त्रासदायक
असेल असं वाटून खूपदा आपण तो
नाकारतो.
पण त्यात
सुधारणेची आशा पण असू शकते.
मुळात टीव्ही चॅनेल्स जे म्हणतात की Right
wing fanatics हे
चुकीचे आहे.
(उत्तरा
माझ्याकडे बघतच राहिली,
हा माणूस
चक्क मोदींची बाजू घेतो आहे!)
आमच्याकडे
फॅनेटिक्स नाहीत.
विचार
वेगळे आहेत.
त्या
वेगळेपणाचा विरोध करताना मग
अशी लेबलं लावली की सोपी असतात
म्हणून हे सगळं.
तसही
सोनिया आणि राहुल गांधी आणि
त्यांची कॉंग्रेस
यांनी १० वर्ष राज्य केलं.
खूप
चांगल्या,
तशा खूप
वाईटही गोष्टी
घडल्या.
आता जर
कोणी म्हणालं की बदल हवा तर
त्याला काय हरकत आहे?
इतकच, बाकी
काही नाही.
मला कसरत
बर्यापैकी जमली
असावी असं क्रिस्तिआनोच्या
चेहे-यावरील
भाव बघून तरी वाटलं.
माझं आणि
मोदींचं सख्य नाही (म्हणण्यापेक्षा
मला त्यांची चाल कधीच भरवशाची
वाटली नाही)
आणि
कॉंग्रेसशी वाकडं नाही पण
परदेशात जाऊन आपणच
आपले वाभाडे काढणं पटलं नाही
खरं!
उद्या
कदाचित जो माणूस देशाचा
पंतप्रधान होणार आहे (तसे
आज ते आहेतही)
त्याच्या
विरूद्ध परदेशात
आपण काही बोलणं हे मला कधीच
पटलं नसतं.
मी
आपली त्याच्याकडे बेलरुस्कानीची
चौकशी केली.
म्हणाला
एक नंबरचा चोर माणूस
(
हा या
लोकांचा नितळपणा
मला आवडतो.
कोणताही
मुखवटा नाही)
पण काही
वेळा कामं न करणार्यापेक्षा
चोरही परवडतो.
आताचे
आमचे लोक तसे आहेत.
आता आमच्या
मरीन्सनी तुमच्याकडे गोंधळ
घातला.
आमचं सरकार
ढिम्म!.
मी म्हटलं
अरे पण त्यांनी माणसं मारली
आमची.
त्याने
मला थांबवलं.
म्हणाला
मला पूर्ण बोलू दे.
आमच्याकडे
निदर्शनं झाली सरकारविरूद्ध
ते त्यांनी दखलसुद्धा घेतली
नाही म्हणून!.
त्यांना
सोडवा असं इथेही म्हटलं जात
नव्हतं.
आमचं
म्हणणं इतकच होतं की जर त्यांनी
खून केला असेल तर त्यांना
शिक्षा भोगू दे पण ते आपले
आहेत हे तरी तुम्ही म्हणा ना.
गप्प का
रहाता?
आपल्या
देशाच्या नागरिकांवर काय
संकट आलं आहे हे विचारा तरी!
हा विषय
इतका नाजूक की न बोलणं बरं
म्हणून मी गप्प राहिलो.
विषय
बदलण्याकरता मग म्हटलं अरे.
आम्ही
आलो ते फ्लोरेन्सहून One
of the most beautiful part of Tuscany! असं
डॅनिअल म्हणाला होता.
वाटेत
लागलं ते बोलोना (Bologna)
खूप सुंदर
आहे असं माझा मुलगा म्हणाला.
तुमचा
भाग कोणता?
“ आम्ही
वेनेशिअन आहोत.
आमच्यासारखे
आतिथ्यशील तुम्हाला कुठेच
मिळणार नाहीत.
(इटली
हा एकसंध देश नव्हता.
इथेही
आपल्याप्रमाणेच वेगवेगळी
राज्य होती.
त्या
प्रत्येक भागाला स्वतःची
अस्मिता आहे असं या लोकाबरोबर
बोलताना प्रकर्षाने जाणवतं.
एक
मात्र,
सगळे
आपल्या भागावर मनापासून प्रेम
करतात आणि ते मोकळेपणाने
व्यक्तही करतात.
) इथे आमचं
बेटावरचं आयुष्य तसं खडतर
होतं.
आमचंही
घर व्हेनिसमध्ये आहे.
पण आता
तिथे रहाणं कठीण आहे.
बेटावरच्या
रहाण्यात तसे खूप प्रश्न,
अडचणी
आहेत शिवाय टूरिस्टमुळे
महागाई इतकी आहे की इथे बाहेर
(बेटाबाहेर,
उपनगरात)
रहाणंच
सोयीचं पडतं."
तुम्ही
इथून कुठे जाणार पुढे?
म्हटलं
इथून मिलान आणि मग सेंट मॉरित्झ!.
:ओह!
स्वित्झर्लंड!
खूप शहाणे
समजतात ते (स्विस
लोक)
स्वतःला.
त्यांचं
सगळं पिक्चर परफेक्ट असतं.
कुठेही
इकडे तिकडे चालत नाही.
त्यांच्या
दृष्टीने आम्ही uncivilised,
गावंढळ
माणसं.
आम्ही
मोकळेपणाने बोलतो,
मोठ्याने
बोलतो,
हसतो हे
त्यांना गावंढळ वाटतं.
पण आम्ही
मनापासून जगतो.
आमचं
घर चित्रातल्याप्रमाणे दिसणार
नाही,
माणसं
कदाचित त्यांच्या सुसंस्कृतपणाच्या
व्याख्येत बसणार नाहीत पण
आम्हाला त्याची पर्वा नाही.
We enjoy thoroughly. आम्ही
आयुष्य रसरसून जगतो.
आयुष्याकडे
बघण्याची किती वेगवेगळी दृष्टी
असू शकते ते या अशा संभाषणातून
पदोपदी जाणवत राहतं.
लेकुरे
उदंड झाली मध्ये नाही का मूल
नसलेला नायक म्हणतो "घर
विस्कटुन टाकावं"
त्याची
आठवण झाली.
सगळ्याच
वेळी आखीव रेखीव सगळच बघत
बसण्यातही एक प्रकारची मोनोटोनी,
एकारलेपण
असतं !
माणसांवरून
निघालं म्हणून त्याला म्हटलं
आमच्याकडे सगळ्या
प्रकारचं हवामान आहे.
तशीच
वेगवेगळ्या वंशाची माणसं
आहेत.
हिमालयातली
लोकं खूप गोरी आहेत तशी दक्षिणेतली
लोकं खूप काळी आहेत.
दक्षिण
म्हणजे चेन्नई आणि बंगलोर का
असं त्याने विचारल्यावर मी
थक्क झालो.
तो गोव्याला,
मुंबईला
आणि कलकत्त्यालाही गेला होता.
पूर्वेकडली
आमची लोकं मंगोल वंशातली आहेत.
त्यामुळे
काश्मिरपासून ते राजस्थानातील
वाळवंट आणि केरळचा विषुववृत्तीय
प्रदेश अशी सगळी
व्हरायटी आमच्याकडे आहे.
भिंतीवर
एक छान छोट्या मुलीचा फोटो
होता.
मला वाटलं
होतं,
असेल
त्याची मुलगी वगैरे पण थेट
विचारणं गैर दिसलं असतं.
उत्तराने
विचारूनच टाकलं.
फोटो सुंदर
आहे.
फोटो की
चित्र?
म्हणाला
माझी आई आहे.
लहानपणचा
तिचा फोटो मोठा करून घेतला.
मला खूप
आवडतो.
आमच्याकडे
माझे वडील उत्तरेकडचे आणि आई
दक्षिणेतली त्यामुळे ती रंगाने
कमी गोरी.
मीसुद्धा
तिच्यासारखा आहे.
( त्याचा
रंग आमच्यापेक्षा गोरा आणि
हा म्हणतो आहे तिच्यासारखा
त्याचा रंग कमी आहे.
मग आम्ही?)
माझा भाऊ
मात्र चांगलाच गोरा आहे.
किती
सहजपणे हे लोक वैयक्तिक माहिती
देतात त्याचं आश्चर्य वाटतं.
हा मोकळेपणा
जर स्वित्झर्लंडच्या दृष्टीने
असंस्कृत किंवा गावंढळपणा
असेल तर मला ही असंस्कृत लोकंच आवडतील निश्चितपणे!
रात्र
खूप झाली होती.
रंगलेल्या
गप्पांमधून उठून जाणं जिवावर
आलं होतं पण उद्या लवकर बाहेर
पडून उरलेला भाग बघायचा होता.
आम्ही
त्याचा त्या दिवसापुरता निरोप घेतला.
उर्वरीत भाग पुढील मंगळवारी
ही माणसं कलासक्त आहेत का? असावीतच म्हणूनच तर इतक्या कलात्मक पद्धतीने या खाण्याच्या वस्तू त्यांनी मांडलेल्या दिसतात
छान अनुभव कथन आणि विचार मंथन
ReplyDeleteछान अनुभव कथन आणि विचार मंथन
ReplyDelete