Tuesday, 31 December 2013

निरोप-स्वागत

सरत्या वर्षाला निरोप
तुमच्याप्रमाणे माझाही
मनातल्या अगणित भावनांना मागे करत
हस-या चेहे-याने
घडणारा
कदाचित हा तसा एकच निरोप समारंभ
मनात असंख्य आशाअपेक्षांचे
न पेलणारे
परंतु न जाणवणारे ओझे
मनामध्ये घेऊन शुभेच्छा देतानाचा हा
आनंद
तुम्हाला
        आम्हाला
                  सर्वांना

भरभरून मिळावा!

No comments:

Post a Comment