गेल्या
वर्षी जुलैपासून सुरवात करून
डिसेंबरपर्यंत मी काही लेख
अपलोड केले. शेवटी "जाता
जाता"
आणि
"निरोप
स्वागत"
लिहिलं.
मनात
काय असतं आपल्या ते खूपदा
आपल्यालाही कळत नाही.
निरोप
सरत्या वर्षाबरोबरच लिखाणाला
होता का?
मलाही
आता संभ्रम झाला आहे.
पण
आता मी त्या संभ्रमातून बाहेर
पडायचा प्रयत्न करणार आहे.
अर्थात
गेल्या वेळेइतकं नियमितपणे
प्रत्येक आठवड्याला आपण भेटणार
आहोत का हे माझं मलाच निश्चित
होत नाही म्हणून या घडीला तरी
निश्चित काही न ठरवता आपण
पुनर्भेटीचा आनंद घेऊ या.
पूर्वीप्रमाणेच
आपले अभिप्राय जरूर लिहा.
मी
वाट बघत आहे.
'.नृसिंह ' लेख वाचला .
ReplyDeleteछान खूपच भावलं .
कमालीची निरीक्षणशक्ती दिसते.
पालकच शिस्तीच्या नावाखाली मुलांचे " निजरूप " बिघडवतात..
अगदी पटलं .
आणि गाभाऱ्यात बघितलेले जाणवलेले लगेच वेगळ्या संदर्भात मुलांकडे बघतांना आकळणे
याचे कौतुक वाटते.
मूर्तीचे यथासांग पूजेचे, त्याच्या वस्त्रालंकारा चे वर्णन फारच सुरेख.
डोळ्यासमोर घटना मूर्तिमंत उभी राहते. .
खूपच छान.
लिहित रहा . ते नक्की चांगलेच उतरेल.
Excellent insight into '' Nijaroop '' - you have become a seasoned, stylish author.
ReplyDeletekhup chhaan lihile aahes. vaachun aanand anubhavala.
ReplyDeleteshekhar khambete
ReplyDeleteFeb 18
आनंद
वा! छान! उशीरा वाचला. कारणं तुला माहिती आहेत. या विषयावर आपलं बोलणं झालेलं असल्यामुळे संदर्भ लगेच पोचले. पुन्हा एकदा छान!.
शेखर