Monday, 23 December 2013

जाता जाता


आज सोमवारचा दिवस. जुलै महिन्याच्या ३० तारखेपासून एक वेड लागलं होतं, ध्यास म्हणा ना. दर सोमवारी रात्रीचे १२ वाजण्याची वाट बघत मी शांतपणे लेखावर शेवटचा दृष्टिक्षेप टाकत असे. फोटो कोणते, हा की तो यावर  मनात  द्वंद्व  सुरू  असे.  त्या  अस्वस्थतेतही  एक  मनःशांती  होती.  मंगळवारी  सकाळी  ब्लॉग वाचणा-यांना आपण काहीतरी नवीन देण्याचं, वचन नाही म्हणत मी, पण आश्वासन दिलं आहे याचं भान सतत असे आणि एकदा का ते publish बटण दाबलं की खूप बरं वाटत असे. आजही असाच बसलो आहे पण थोडी गुगली टाकण्याकरता. गुगली वाचणा-यांकरता आहे की मला स्वतःला?

आज मी कोणालाही मेल करून हे कळवणार नाही की मी ब्लॉगवर काहीतरी अपलोड केलं आहे आणि तुम्ही वाचा. आज आपलं असच सहज अपलोड करून थांबणार आहे. कदाचित सवयीने वाचतीलही काहीजण. अस का कशाकरता? पुनः उत्तर माझं, कारणाविना!

तसं कारण अगदीच नाही असं म्हणत नाही. गेल्या मंगळवारी लेखाचा शेवट करताना टीप होती " इति बार्सिलोना अध्याय समाप्त " त्यावरची प्रतिक्रिया होती

लेखमाला संपली याची हुरहुर वाटते. असाच दूर देशी फिरत रहा आणि तुझ्याबरोबर वाचण्या-याच्या आनंदातही भर घालत रहा. जमलेली लेखमाला.

madhav joshi
To Aadim@yahoogroups.com
Dec 17 at 10:24 PM
अपुरा वाटतो .हुरहुर लागून राहिली .या नंतर काय? वाट पहात आहोत .


यावर आणखी एक कॉमेंट पण निनावी
बार्सिलोना अध्याय संपला.

नक्की काय सुचवायचं असेल? हे एक वाक्य आहे नुसतं की सूचना की भविष्य? मी सहज वाचून सोडून दिलेलं हे वाक्य इतरांना सूचक वाटलं, लिहिणा-याने स्पष्ट नाही पण अधिकारात सांगितल्यासारखं वाटलं की संपला तो फक्त बार्सिलोना अध्याय.

याच वेळी एक छान फोन आला. “मी ब्लॉग नियमित वाचते. मला आवडतोही त्यामुळे दर मंगळवारी वेळ काढतेच.” इथे मला वाटलं पूर्णविराम असेल पण नाही
संभाषण पुढे सुरू करताना मला वाटलं नवा मुद्दा आला. त्यांनी सुरू केलं पुढे. "माझा मुलगा आता ---वीत आहे. त्यांच्या शाळेची ट्रीप गेली होती दिल्ली आग्रा वगैरे. माझ्या नव-याने काही परवानगी दिली नाही. तो म्हणाला दिल्ली बघून झालेली आहे उरलेलं नंतर जाऊ. ते महत्वाचं नाही.” 
मला कळे ना हे सारं कुठे चाललं आहे
तर प्रश्न आला शाळेत निबंध लिहून आणायला सांगितला तेव्हा. विषय माझी ट्रीप. आता शाळेच्या ट्रीपला न गेलेला माझा मुलगा निबंध कसा लिहिणार? मुलाने सवयीप्रमाणे सर्वज्ञ असलेल्या बापाला विचारलं. आणि काय आश्चर्य! माझ्या मुलाचा बाप खराच हुशार आहे त्याने सांगितलं. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेला गेलो होतो ते लिहून काढ. मुलगा म्हणाला आता कसं आठवणार इतक्या दिवसांनी? तो म्हणाला काय कठीण आहे? इंटरनेटवर कितीतरी साइटसवर माहिती मिळेल ती उतरवून काढ म्हणजे झालं! तर मी माझ्या मुलाला म्हटलं अरे ते काका नाहीत का ब्लॉगवर उतरवून काढत तसच फटाफट लिहून टाकायचं! आहे काय आणि नाही काय!”

ऐकून मी अगदी कृतकृत्य झालो. तर अशीही गंमत! या फोननंतर आलेलं नैराश्य झटकण्यासाठी मी पूर्वीचा इ मेल व्यवहार बघत होतो तर  मला हे सापडलं आणि माझं नैराश्य कुठल्या कुठे नाहीसं झालं.

Deepak Joshi
To Podarites All
Nov 16

प्रिय आनंद ,

सगळे भाग एकत्रितपणे वाचून काढले आणि एखाद शैलीदार लेखकाने लिहिलेलं प्रवासवर्णन वाचतोय अस वाटलं. तसं विवेक नंतर तू नेहमीचा "आदिम कार्यक्रम वार्ताहर" झाला होतासच. पण वाटलं ते तेवढया पुरतच आणि तात्कालिक असावं . तेंव्हा हे कळल नाही की तू तुझ्या लेखणीला धार लावत होतास. तुझी "लंबीरेस" तू आता खेळायला बसला आहेस.

वाचताना असं वाटत रहात कि तुझ्याबरोबरच आम्ही फिरत आहोत. अगदी तब्बेतीत. कुठेही घाई नाही. एका वर्णानातून दुसऱ्या वर्णनात शिरताना कुठेही धक्का नाही. एखाद्या प्रसंगाचं, दृशाच, अनुभवाचं सांगोपांग शब्दचित्र उभं केल्याशिवाय पुढ सरकायचंच नाही. हे सगळ सांगतांना तू पुन:प्रत्ययाचा आनंद घेत राहतोस मग वाचकांच्या डोळ्यासमोर ते जीवंतपणे का उभं राहणार नाही? मुंबईत परतल्यावर आणि hangover (प्रवासाचा) उतरल्यावर एका सकाळी उठून अचानकपणे वाटलं "चला प्रवास वर्णन लिहू या" असायाचं स्वरूप निश्चितच नाही. त्यासाठी तू प्रवासात ठेवलेली दृष्टी आणि घेतलेली मेहनत जाणवते. प्रांताच नाव, नदीच नाव, त्या नदीच्या खोऱ्यात येणारी गावं, एकाद्या स्थळाचा भूगोल आणि प्रसंगी इतिहास, भेटलेल्या माणसांची नावं, गाडीचं गंतव्य स्थानच नव्हे तर उगमस्थानसुद्धा, इत्यादी तपशील प्रयत्नपूर्वक लक्षात / टीपून ठेवलेले असले पाहिजेत. त्याच्याशिवाय लेखनाला जो भरीवपणा आला आहे तो आला नसता.
तू तपशील तर देतोसच पण त्याबरोबर त्याप्रसंगाचा, दृश्याचा तुझावर होणारा परिणाम, मनात उठले तरंग आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या भावना याचाही उहापोह करतोस. लेखनाला जिवंतपणा आला आहेत यामुळे केवळ तपशिलामुळे नव्हे.

वाचकाला लेखनात रस वाटून तो पुढे पुढे वाचत जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिथल्या परिस्थितीची ,प्रसंगांची आणि एकंदरीत मानवी व्यवहाराची भारतातल्या तपशिलाशी केलेली तुलना. त्यामुळे त्या प्रसंगला किंवा घटनेला एक तऱ्हेचा perspective मिळून तो सहजपणे समजण्यासारखा होतो.

एखाद्या दृश्याचा आस्वाद घेताना मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात त्या विषयी आपण काय लिहिणार आहोत याचा विचार नकळतपणे येत असावा का? अम्मान विमानतळाच्या छताचा फोटो म्हणूनच तुझाकडून काढला गेला का? अर्थात हा प्रश्न तुझ्या लेखन- प्रक्रियेच्या संदर्भात. सहज, सुंदर आणि ओघवत्या शैलीतली मला आवडलेली काही खास "आनंद -छाप" वाक्य वानगीदाखल उदधृत केल्याशिवाय मला रहावत नाही

"रात्री येण्याचा हा एक फायदा! सगळं सौंदर्य सकाळी आश्चर्याच्या रूपात भेटीला येतं."
"या दोन टप्प्यांमधलं वैराण वाळवंट हेसुद्धा याच जीवनतलं एक सत्य आहे हे दाखवण्यासाठी तर आमचा अम्मानचा थांबा नव्हता ना?"

"तिस-या सीटवरच्या माणसाला आत ढकलून चौथी सीट बळकावण्याच्या पेक्षा थोडी कळ सोसणं आणि अधिक सुविधा निर्माण करणं हा त्यांचा चॉइस आहे."

"अपरात्रीसुद्धा त्याच हळू वेगात गाड्या तेथून धावतात, बहुधा त्यांना मानवी जीवनाचं मूल्य माहीत असावं "

"अस्वस्थपणा हा आपला स्थायी भाव झाला आहे. इथे नेमकं मला तेच आपल्याकडे जे कमी आहे ते मिळाल्याचा आनंद मिळतो "

"याप्रकारे लीन होवून मेट्रो स्टेशन शोधायला लावणारे ते स्पॅनिश धन्य होत

या लेखनाच्या साहित्यिक मुल्यांवर बोलायचं तर एकाद्या चाणाक्ष संपादकाची नजर या लेखनावर पडली किंवा पाडली गेली तर हे पुस्तकरूपाने प्रकाशित व्हायला वेळ लागणार नाही.

आता तू बार्सिलोनाला आला आहेस . अनिकेत /मालाविकाच्या confarance च्या वेळी बेबी-सीटर म्हणून गेलो असताना दिवसभर नंदिताला बाबागाडीत घालून आम्ही दोघं चार दिवस बार्सिलोना फिरलो आहे. त्यामुळे गौडीच घर ,पार्क आणि म्युझीयम, राम्बला रस्ता ,पिकासो म्युझीयम, कोलम्बस मॉन्यूमेंट इत्यादी बाबतीत तुझाकडून ऐकायला उत्सुक आहे.

HAPPY BLOGGING

----दीपक

bmukund52
To Aadim@yahoogroups.com

Nov 16

Dear Deepak,

I am still not comfortable with Marath keyboard and hence I avoid to write long messages in Marath. Therefore I thank you for expressing my exact feelings about Anand's style of writing. You have covered beautifully every comment that I would have liked to cover about Anand's fantastic "Pravas Varnan". I also could visualizer every seen myself. No doubt, it is a worth publishing stuff. Keep it up Anand.

Regards.




Jayant Gune


Nov 16

आनंदा,

तू हात धरून मला तिकडे फिरवतोयस असं वाटलं.

जयंत गुणे

Regards

Jayant Gune
91-9619016385 / 22-65516995

madhuri Deo


Nov 17

दीपक,

आनंदचे लिखाण मी नियमित वाचत आहे. तो इतके सुरेख लिहतो आहे, कि जवाब नही. शब्दचित्र म्हणजे काय ते त्याचे प्रवास वर्णन वाचून समजते.

आज तुझी मेल वाचून खूप बरे वाटले. कारण तो जितके सुरेख लिहित आहे, तितकीच सुरेख तुझी प्रतिक्रिया असणार हे नक्की होते. आनंदचे लिखाण वाचल्यावर जे विचार माझ्याही मनात येतात ते तू अगदी सुरेख व्यक्त केले आहेस.
खूप वाट पाहिल्या नंतर आलेली या विषया वरची मेल वाचून वाटले कि जे वाटते व्यक्त करण्यासाठी सुद्धा ...."तेथे पाहिजे जातीचे" .....

माधुरी



Uday Thakurdesai
वाचन कसे करावे ह्याचा एक सुंदर वस्तुपाठच.


थोडं माझ्या श्रीमंतीचं वैभव दाखवावं म्हणून हे आपलं! भेटू या पुनः फक्त थोडा प्रश्न आहे सरत्या वर्षाचा. वर्षातून एकदाच येणारी ही वर्ष अखेर. तिच्या मागण्याही पु-या करायला हव्यातच ना? मग आपले ध्यास, आपले हव्यास काही काळासाठी थोडे बाजूला ठेवायचे! काय? खर ना?







































No comments:

Post a Comment