रोबानोव
कोटचं हे हॉटेल
सुंदर होतं.
खोलीला
दोन बाजूला टेरेस होती त्यामुळे
आत्ता जरी काही दिसत नसलं
तरी उद्या छान व्हयू मिळण्याची
शक्यता होती.
आत्ता
खाली दूरवरून कानावर येणारी
पाण्याची झुळझुळ मात्र
कानाला सुखवत होती.
दिवसभराच्या
थकव्यानंतर आता काहीतरी
पोटपूजा व्हावी इतकी माफक
अपेक्षा होती.
इथे
निरामिष जेवण काय असणार?
मिळेल
ते पूर्णब्रह्म म्हणायचं !
सकाळ
उगवली पण इथे आमच्या राशीला
ढगाळ हवामान आणि पाऊस असणार
होता.
दुर्दैव!
आणखी
काय?
एरवी
हा समोर दिसणारा डोंगरांच्या
रांगेचा नजारा लखलखत्या
सूर्यप्रकाशात बघायला किती
मजा आली असती.
समोरच्या
बाजूला उताराची जमीन होती.
सर्वत्र
हिरवंगार गवत.
आमच्या
समोरच नदीच्या प्रवाहाचं
अस्तित्व आवाजावरून जाणवत
होतं.
समोरच्या
डोंगरापर्यंतच्या कुरणावर
असंख्य गुरं वासरं चरत होती.
ते
गोधन नेत्रसुखद होतं.
समोरच
प्रवाहावर फिरणारी पाणचक्की
दिसत होती.
वातावरणातला
शिरशिरी आणणारा गारवा,
समोरचे
ते अर्ध्या डोंगरावर तरंगणारे
ढग आणि त्यापलीकडे दिसणारी
बर्फाची शिखरं!
वर्णनातीत
हा एकच शब्द.
कॅमेरा,
शब्द
सारेच अपुरे.
कॅमेरा
झाला तरी तो फोटो काढणार,
त्याला
वातावरणाची जोड कशी देता येईल?
आपण
आपलं डोळ्यांच्या माध्यमातून
त्याला आपल्या आत खोलवर ओढून
घ्यायचं.
हा
भाग आता नो डेव्हलपमेंट झोन
म्हणून जाहीर केला आहे.
इथे
खूप कमी पर्यटक येतात,
याचं
एक कारण तसा हा भाग अडचणींचा.
त्यातून
नवीन बांधकामांवर बंदी असल्याने
नवीन हॉटेल्स नाहीत.
म्हणजे
सुखसुविधांवर मर्यादा
येते.
तरीही
इथे येणारे ऍडव्हेंचर प्रिय
लोक चालण्यासाठी,
हाइकसाठी
पोहोचतातच.
हाईक
करता आम्हाला तेवढा
वेळ नव्हता पण मनसोक्त
भटकंती करायची हे मात्र ठरवलेलं
होत.
ब्रेकफास्ट
करून निघालो.
माहितीपत्रकात
सांगितल्याप्रमाणे सोलकावा
गावात गेलो.
अगदीच
जवळ हे गाव.
नदीचं
नाव साविन्या!
नाव
पण किती आपल्याला आपलं वाटावं
असं!
तिच्या
काठचं हे सोलकावा.
तिथल्या
माहिती केंद्रात जाऊन माहिती
घ्यायची होती.
खूप चित्रं आणि पक्षी,
प्राणी
वगैरेची माहिती होती पण त्यात
आम्हाला गम्य नव्हतं.
तिथून
पुढे गेल्यावर एका ठिकाणी
गाडी पार्क करून साडेसात
मैलावर (की
कि.मी.?)
एक
रिंका धबधबा होता.
तो
नेचर ट्रेल करायचं आम्ही
ठरवलं.
जाऊन
येऊन पंधरा कि.मी.
म्हणजे
काही फार नाही असं आम्ही दोघांनी
म्हटल्यावर मग प्रश्नच
उरला नाही.
सुरवातीचा डांबरी रस्ता ओलांडून आत झाडीत शिरताना ओलांडलेला साकव (हो, पुलाप्रमाणे उपयोगात येणारा झाडाचा ओंडका म्हणजे साकव नाहीतर काय म्हणणार?) पुनः कोकण, गोव्याची आठवण करून देत होता. आता हा हिवाळ्याचा, पानगळीचा मोसम. पर्णसंभार उतरवायची घाई झालेल्या वृक्षांच्या बरोबरीने हिरवेगार वृक्ष होते. काहींना पानगळीची चाहूल लागून कासाविशी येऊन पिवळे पडलेले तर काही त्या कल्पनेने मोहरून गुलाबी लालसर झालेले.
एकाच ठिकाणी असणारे सहयोगी आणि त्यांच्यात इतका फरक असावा? निसर्गाची कमाल वाटत होती. चालताना काही ठिकाणी झाडांचे ओंडके कापून पायऱ्या केल्या होत्या. झाडांच्या छायेतून जाताना वातावरणातला ढगाळपणा मग तितका जाणवत नव्हता. पण तरीही अधून मधून का होईना दिसणारा क्षीण सूर्य हवाहवासा होता.
(
धुकं
धुकं आणि फक्त धुक्याकडे घेऊन
जाणारी ही झोकदार वाट!)

पुढे
जात असता किलबिलाट ऐकू आला.
शाळेची
ट्रिप आली होती.
एका
ठिकाणी मुलं,
मुली
उभ्या होत्या त्यांच्या हातात
कागद,
पेन
आणि त्यांच्या बरोबरच्या
शिक्षक,
शिक्षिका
माहिती सांगत होत्या ती ऐकून
नोटिंग घेणं सुरु होतं.
आम्ही
त्यांनी अडवलेल्या वाटेवर
मागे शांतपणे त्यांना डिस्टर्ब्
होऊ नये या बेताने उभे होतो.
काही
क्षणानंतर त्यांच्या
शिक्षकांचं आमच्याकडे लक्ष
गेलं.
मुलांना
सूचना दिल्या गेल्या आणि रस्ता
मोकळा केला गेला.
पुढे
जाताना त्या मुली आम्हाला
चक्क नमस्ते नमस्ते
म्हणाल्या ते ऐकून आम्ही
थंडगार!
या
देशाविषयी आपल्या देशात किती
लोकांना माहिती असेल?
आम्ही
इकडे येण्यापूर्वी माहिती
करून घेतली होती.
पण
आम्हाला प्रत्येकजण हो माहित
आहे पूर्वीचा झेकोस्लोव्हाकिया
ना असच विचारत होता.
बरं
त्याचं नकाशातील
स्थान सांगावं तर माहितीचं
नाव ऑस्ट्रियाच्या दक्षिणेला
इतकच !
इथे
ही शाळेतली जेमतेम सहावी
सातवीतली मुलं आम्हाला आमच्या
दिसण्यावरून की उत्तराच्या
कुंकवावरून नमस्ते करत होती
!
एकाच
वेळी आश्चर्य आणि कौतुक वाटलं.
त्यांना
मागे टाकून पुढे गेलो आणि मग
चढाचा भाग लागला.
आतापर्यंत
चालणं खूप झालं होतं.
आता
चढाचा भाग, पण पायवाट पुसट
झाल्यासारखी वाटली.
इतक्यात
झाडात काहीतरी खसफसलं!
दूर
वर एक प्राणी होता का?
नीट
काही कळलं नाही.
आम्ही
थोडे मागे आलो.
नदीचं
कोरड पात्र आणि पलीकडून लांबून
जाणारा रस्ता दिसत होता.
पात्रातून
पुढे गेलो तर तो रस्ता पुनः
आमच्या वाटेत आला.
तिथे
एक जर्मन कि स्पॅनिश जोडपं,
सायकलवरून
आलेलं,
दम
खात उभं होतं.
त्यांना
म्हटलं अजून किती लांब? तर
म्हणाले, नाही आता पोहोचलातच
तुम्ही जवळ जवळ.
हा
शब्द खूप छान आहे.
यातून
काहीच स्पष्ट होत नाही आणि
सगळं सांगितलं जातं.
(ह्ये
काय आलं की,
असं
आपल्याकडे गावातली माणसं
म्हणतात त्याची प्रकर्षाने
आठवण झाली)
रस्ता
ओलांडला आणि पायवाटेने
पुनः निघालो पुढे.
खाली
नदीचा प्रवाह,
जाणारी
पायवाट आणि उजव्या बाजूला
चढाचा भाग.
त्यावरच्या
झाडीतून जाताना एका ठिकाणी
एक हिरवं जोडपं बसलेलं
दिसलं.
छान
लाल भडक रंगाचा टी शर्ट त्या
आजोबांनी घातला
होता.
खाली
खोलवर दिसणाऱ्या दरीकडे बघत
निवांत बसले होते ते दोघे जण.
उत्तराला
बोलायची लहर आली आणि तिने पुनः
त्यांना विचारलं,
रीन्का
स्लाप किती दूर आहे?
त्यावर
ते आजोबा उत्तरले,
कदाचित
जवळ,
कदाचित
लांब आहे,
पोहोचाल
किंवा नाहीसुद्धा.
आणि
मग डोळा बारीक करून गंमत
केल्यासारखा खोडकर चेहेरा
केला.
आजींनी
मग हसून निरोप दिला.
त्यांना
नवऱ्याच्या या स्वभावाची सवय
असणार!
आता
मात्र पाण्याचा आवाज येऊ
लागला.
धबधबा
दिसत नसला तरी तो
जवळ आल्याचं आम्हाला सांगत
होता.
तिथे
एक छान टपरी होती.
आत्ता
बंद होती.
(याहून सुंदर काय असणार?)
जरा वेळ थांबू या म्हणून आम्ही बसलो तर दोघेजण, "तरुणम्हातारे" सायकल दामटवत आले. दमलेले दिसत होते. तेही थांबले आणि त्या बाईने हॅलो केलं. बहुधा बायकांना बोलायला आवडत असतं. हीसुद्धा अपवाद नव्हती. "गेल्या वेळी आम्ही तीन महिने रजा काढून फिरलो होतो. क्रोएशिया, इटली असं फिरलो. दरवेळी एवढी रजा कशी मिळणार? माझा मुलगा इंजिनिअरिंग करतो. मुलगी जॉब करते" वगैरे. आतापर्यंत अॅक्सेंट वरून अमेरिकेची आहेत दोघे असा अंदाज श्रीशैलने मला सांगितला होता. तेवढ्यात त्या बाईने श्रीशैलकडे तिचा मोर्चा वळवला. कुठून आलास म्हटल्यावर नेदरलँडस सांगितल्यावर त्या देशाविषयी बोलून झालं. इतकं होईपर्यंत तो बावा धड हसू नाही असा स्थितप्रज्ञ होऊन बसला होता त्याने एकदम विचारलं तुझं प्रोफेशन आणि शिक्षण काय म्हणून. त्यात श्रीशैलच्या अमेरिकेतल्या शिक्षणाचा उल्लेख होताच त्याला माहेरचं कुत्रं भेटल्यागत कंठ फुटला. अमेरिकेच्या लोकांना त्या देशापलीकडे काही असतं याची बहुधा जाणीवच नसावी असं वाटायला लागतं हे अशा प्रकारचं वागणं बघून!

आतापावेतो
पुरेपूर छळून आमची परीक्षा
घेतली आहे आणि त्यात आम्ही
चांगल्या मार्काने पासही
झालो आहोत याची खात्री करून
घेतल्यावर "मग
त्याने"
आम्हाला
दर्शन दिलं.
स्लोवेनियन
भाषेत धबधबा याला शब्द आहे
स्लाप (slap
) आमच्या
दृष्टीने त्याचं
इंग्रजीकरणच योग्य होत.
परत
येताना कळलं की आपण जे आडबाजूने
आलो ते सरळ रस्त्यानेही येता
येतं.
फरक
इतकाच की सरळ गाडी घेऊन आलो
असतो तर त्याचे ७ युरो द्यावे
लागले असते.
त्या
पेक्षाही आमचं निसर्गवाचन
अपूर्ण राहीलं असतं
आणि वाटेत ती शाळेतली नमस्ते
करणारी ती मुलं ?
फायदा
तोट्याची गणितं
अशी गणिती पद्धतीने थोडीच
सोडवायची असतात?
आता
परतीच्या वाटेवर मग आम्ही
उगीच आडमार्गाने न येता सरळ
रस्त्याने निघालो.
या
रस्त्याचा फायदा म्हणजे इथली
वाटेतली घरं,
त्यांचे
घोडे असलेले स्टड फार्म्स
बघता आले.
गवताची
साठवण करण्याची त्यांची वेगळी
पद्धत कळली.
आणि
मुख्य म्हणजे या आमच्या परतीच्या
प्रवासात आम्हाला पाऊस भेटला
नाही.
लोगरस्का
डोलीना आल्यावर आता बाकी काही
शक्य नव्हतं.
आता
उद्या आपण पॅनोरामिक रूट आहे
तो बघू हे ठरवून माघारी फिरलो.
दमणूक
झाली होती हे एक आणि आपल्या
हिमालयाप्रमाणे इथेही दुपारी
दोन नंतर हमखास हवा बदलते.
त्यात
आम्ही आलो तेच धुके आणि पाऊस
दोघांना घेऊन त्यामुळे अशा
ठिकाणी जाण्यात अर्थ नव्हता.
दुस-या
दिवशी निघालो खरे पण निसर्गाची
साथ नसेल तर तो रूट कितीही
पॅनोरामिक असो तुमच्या दृष्टीस
येत नाही.
आमचं
नशीब की अधून मधून तरी निसर्गाला
आमची दया येऊन तो सूर्याला
थोडक्या वेळासाठी मोकळं सोडत
होता.
आम्ही
तेव्हढ्यात जे आणि जितकं मिळेल
ते डोळ्यात साठवत होतो.
पण
यातली खरी मजा आहे ती इथून या
घाटातून दिसणारं
खोरं आणि डोंगर
माथे ते मात्र आम्हाला दिसू
शकले नाहीत.
या
अशा हवामानाचा आणखी एक मोठा
दोष म्हणजे फोटोची शक्यता
कमी होते.
तरीही
आम्ही जी कुरणं
बघितली,
गाई
चरताना बघितल्या आणि वाटेतली
टुमदार गावं बघितली
ती नेत्रसुखद होती.
हा
भाग उन्हाळ्यात ट्रेकिंगला
निश्चित चांगला आहे.
पाऊस
आणि धुकं या वातावरणात किती
पुढे जायचं हे शेवटी ठरवायला
लागतं.
रस्त्यांवरच्या
खुणा अपुऱ्या होत्या आणि
कोणाला विचारावं तर तशी वस्ती
दिसत नव्हती.
त्यामुळे
मग आम्ही पुढच्या (?)
वेळी
नक्की असं म्हणत सोलकावाच्या
दिशेने परत फिरलो.
( प्रत्येक मंगळवारी पुढील भाग अपलोड होईल)
( प्रत्येक मंगळवारी पुढील भाग अपलोड होईल)
No comments:
Post a Comment