इटली मिलानो (मिलान)
क्रिस्तिआनोचा
निरोप घेऊन आम्ही बस पकडून
निघालो.
बसमध्ये
एक बांगलादेशी मुलगा होता
त्याला म्हटलं मेस्त्रे
स्टेशनला जायचं आहे.
त्याने
आश्वस्त केलं की सांगतो कुठे
उतरायचं ते.
एक काळजी
दूर झाली.
आम्ही
स्टॉपला उतरून त्याने
सांगितल्याप्रमाणे निघालो
पण ओळखीच्या खुणा दिसेनात.
काल तर
आम्ही याच स्टेशनला उतरून बस
पकडली होती.
मग आज समोर
असलेला हा भाग अनोळखी का वाटावा?
समोर एक
भुयारी मार्ग दिसत होता आणि
त्यावर स्टेशनचं नाव होतं.
आम्ही आत
शिरलो.
प्रत्येक
ठिकाणी प्लॅटफॉर्मवर जायला
असलेल्या जिन्याच्या प्रारंभीच
कोणत्या दिशेने जाणारी गाडी
ते लिहिले होते.
पण त्यात
मिलानचं नाव कुठेही नव्हतं.
नंतर अंदाज
आला.
स्टेशन
बरोबर आहे फक्त हे मेट्रो
लाइनचं आहे.
आता आपल्याला
बाहेर पडून ट्रेन इतालिआ कुठे
ते बघावं लागेल.
परत फिरावं
तर आम्ही आलो त्या बाजूलाही
विचारायला कोणी नव्हतं आणि
आम्ही एव्हाना सबवेमधून पलीकडे
पोहोचलो होतो.
काल
बोलता बोलता क्रिस्तिआनो
म्हणाला होता ते आठवलं.
स्टेशनपलीकडे
तितका सेफ भाग नाही कारण तिथे
आफ्रिकन्स आणि इंडियन्सची
वस्ती आहे.
जे होईल
ते,
असं म्हणून
आम्ही बाहेर येतो तो एक बांगलादेशी
मुलगा दिसला.
हसून
त्याच्याशी हिंदीत सुरू केलं
तर मानेनेच माहीत नाही म्हणाला.
पण त्याला
ट्रेन एवढा शब्द कळला आणि
खुणेने त्याने बोट दाखवले.
आमची दिशा
आणि अंदाज बरोबर होता.
दहा मिनिटात
स्टेशन आलच.
या गोष्टीतून
एक चांगला धडा मिळाला,
डोकं शांत
ठेवून कासावीस(hyper)
न होता
आपण वागलो तर फार काही अशक्य
नसतं.
गाडी
नेहेमीप्रमाणेच वेळेत आली.
सगळा
मिळून अडीच तासाचा प्रवास!
आता कधी
एकदा गाडी मिलानला
पोहोचते असं झालं होतं.
आठवडाभर
सतत फिरणं म्हणजे शेवटी शेवटी
कंटाळवाणं होतच.
त्यातून
दोघेच्या दोघे आणि आपले आपण
फिरताना येणारे ताण नकोसे
होत जातात.
अडीच
तासाचा हा प्रवास त्यामुळेच
कधी संपतो असं झालं असावं.
साडे सातला
मिलान आलं तेव्हा सूर्यप्रकाश
असला तरी कलता होता.
नेहेमीप्रमाणे
पहिल्यांदा स्टेशन बघितलं.
स्टेशन
चांगलं आहे पण आपलं
छ शि ट किंवा अमेरिकेतलं ग्रॅन्ड
सेंट्रल, बेल्जिअमचं अॅन्टवर्प
या स्टेशनांपुढे इथे आवर्जून
लक्षात रहावं असं काही त्यात
आढळलं नाही.
श्रीशैल
स्टेशनवरच भेटला त्यामुळे
इथून पुढे आमच्या डोक्याला
विश्रांती होती.
मिलान
बघायला आमच्याकडे
फारसा वेळ नव्हता.
स्टेशनहून
मेट्रो पकडून आम्हाला दुओमोला
उतरायचे होते.
तिथून
ट्रॅमने पुढे.
स्टेशनमधून बाहेर पडलो ते दुओमोच्या प्रांगणातच. इमारत अतिशय रेखीव आहे. मिलानची फॅशन कॅपिटल म्हणून जशी ओळख आहे तशी या दुओमोकरताही आहे.
तिथे जरा आजूबाजूला हिंडलो.
मोठ्ठ्या
शो रूम्स होत्या.
ब्रॅन्डसची
नावंही आम्हाला माहीत नसलेली
त्यामुळे ऐकून सोडून देत
निघालो होतो.
इथेही
आम्हाला ऐश्वर्या आणि दीपिका
भेटल्या!
त्या
परिसरातलं ते ऐश्वर्य बघून
झालं आणि तिथेच जेवून घेतलं.
इटलीतला
आजचा शेवटचा दिवस.
या आठवड्यात
या देशाने आमचं आगत स्वागत
चांगलं केलं होतं.
आमच्या
शाकाहाराच्या गरजा समर्थपणे
पुरवल्या होत्या.
उद्यापासून
अगदी चित्रातल्यासारखी घरं
आणि माणसं असणार्या
देशात जाताना इथला साळढाळपणा
नक्कीच स्मरणात रहाणार होता.
इथे भेटलेले
दुकानं चालवणारे बांगलादेशी
युवक विशेषकरून रोमचा हसन,
पाकिस्तानमधला
पेशावरचा पठाण आणि कराचीचा
मोहाजीर सगळ्यांच्या आपलेपणाची
आठवण घेऊन डॅनियल,
सिमोने
आणि क्रिस्तिआनो यांच्या
इटालिअन स्वागताच्या स्मृती
बरोबर घेऊन उद्या स्वित्झर्लंडमध्ये
प्रवेश करायचा होता.
हे आमचं
मोठच संचित असणार आहे.
ट्रॅम
आली. आम्ही निघालो.
शेवटच्या
स्टॉपला उतरून अपार्टमेंटपर्यंत
जातानाचे रस्त्यावरचे ओघळ
पाहून श्रीशैलला विचारलं
आपले लोक रहातात
का रे?
तर तो हो
म्हणाला.
आपण आणि
आफ्रिकन्स.
परदेशातही
भारताची आठवण देणार्या
"या"
खुणा नको
वाटतात.
घर मात्र
छान होतं.
टुमदार
बंगली,
मागे पुढे
झाडं आणि घरात सगळ्या सोयी.
एका
रात्रीपुरती चैन आहे म्हणत
दुसर्या दिवसाची
वाट बघत ताणून दिली.
सकाळी
फार काही वेळ हाती नव्हता.
आज
स्वित्झर्लंडला जाण्याकरता तेच कालचं ट्रॅम मेट्रोचं सव्यापसव्य करून मिलान सेंट्रल स्टेशनला जाऊन, तिरानोची
गाडी पकडायची होती.
हे इटलीतलं
शेवटचं स्टेशन.
इथून पुढे
स्विस गाड्यांमधून प्रवास
होणार होता.
दोन अडीच
तासानंतर आलेलं तिरानो गाव
म्हणजे खेळण्यातला प्रकार
होता.
छोटसच,
टुमदार,
हिलस्टेशनचा
लुक असणारं.
बाहेर
पडल्यावर खेळण्यातली गाडी.
इथेच एखादा दिवस रहायला मजा आली असती असं मनात आलं पण बोलायची सोय नव्हती. येणार्या प्रत्येक गावाविषयी माझं हेच मत असतं आणि मी ते बोलून दाखवलं की आधी आपल्याकडे किती दिवस आहेत त्याचा हिशोब करा आणि मग किती गावांमध्ये मुक्काम करायचा त्याचं टाइमटेबल आखू या असा हल्ला होतो. आहे खरच! प्रत्येक ठिकाणी प्रेमात पडणं व्यवहार्य नसतं याची खूणगाठ आतातरी बांधून ठेवता यायला हवी!
इथेच एखादा दिवस रहायला मजा आली असती असं मनात आलं पण बोलायची सोय नव्हती. येणार्या प्रत्येक गावाविषयी माझं हेच मत असतं आणि मी ते बोलून दाखवलं की आधी आपल्याकडे किती दिवस आहेत त्याचा हिशोब करा आणि मग किती गावांमध्ये मुक्काम करायचा त्याचं टाइमटेबल आखू या असा हल्ला होतो. आहे खरच! प्रत्येक ठिकाणी प्रेमात पडणं व्यवहार्य नसतं याची खूणगाठ आतातरी बांधून ठेवता यायला हवी!
आम्ही
इटलीमधला शेवटचा ब्रेकफास्ट
स्टेशनला लागून असलेल्या
रेस्तरॉं मध्ये घेतला आणि
जाता जाता इटालिअन आइस्क्रीमची
चव जिभेवर घोळवत स्टेशनमध्ये
प्रवेश केला.
आता
मुक्काम स्वित्झर्लंडमधील
सेलेरिना स्टाझ.
पुढील मंगळवारपासून स्वित्झर्लंड
छान पण छोटा.आम्ही आपल्या उभयतांच्या प्रवासी वृत्तीच्या प्रेमात पडलेले आहोत.
ReplyDelete