स्वित्झर्लंड
(सेंट
मॉरित्झ) (१)
इटलीचा
निरोप घेऊन निघताना वाईट जरूर
वाटत होतं.
मिलानहून
तिरानोपर्यंतचा प्रवास, त्यामुळेच असेल, बराचसा गप्प
गप्प रहाण्यात संपला.
तिरानो
हे इटलीचं शेवटचं स्टेशन.
स्वित्झर्लंडला
घेऊन जाणार्या गाड्या
इथे आम्हाला दिसत होत्या.
त्यांचा
अतिशय सुंदर,
तेज
असलेला (bright)
लाल
रंग खुणावत होता.
त्यांचे
फोटो काढायचे होते पण
प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता
गेट होतं आणि ते उघडण्याची
वाट बघणं आवश्यक होतं.
इटलीचा
निरोप घेताना इथल्या स्वस्त
आणि स्वादिष्ट पदार्थांची
आठवण आम्हाला बरोबर हवी होती
आणि त्याबरोबरच तिथल्या
प्रसिद्ध आइस्क्रीमलाही
आम्हाला सोडायचं नव्हतं.
स्टेशनबाहेरच
असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये
आम्ही खाऊन पिऊन आलो तोवर लोकं
प्लॅटफॉर्मवर आत जायला सुरवात
झाली होती.
आम्हीही
मग एक डबा धरला आणि आम्हाला
सोयीच्या वाटल्या (खरतर अस काही सोय गैरसोय असण्याचा प्रश्न नाही कारण आपल्यासारखी पूर्ण खिडकी अर्धी खिडकी ही भानगड इथे नाही. पण आपलं मुंबईत्व जात नाही. रिकाम्या गाडीत खिडकीत बसल्यावरसुद्धा समोर बसलेल्या माणसाची जागा आपल्याला खूप चांगली असल्याचा भास(?) होत रहातो!) अशा
समोरासमोरच्या चार जागा
पकडल्या.
थोडा
वेळ गेला आणि अचानक एक मोठा
ग्रूप आला.
मंगोलिअन
वंशाच्या खुणा,
गोरा
रंग, गालाची हाडं बसकी आणि हसरा
चेहेरा.
आमच्या
शेजारीच मध्ये गॅंग वे सोडून
त्यांच्यामधलं एक जोडपं बसलं.
. बसण्यापूर्वी
त्यांनी कमरेत वाकून
हसून हॅलो केलं.
काही
वेळा प्रथमदर्शनीच आपली काही
मतं होतात,
बर्याचदा
ती खरी ठरतात!
यां
दोघांच्याविषयीही तेच
झालं.
थोड्या
वेळाने गाडी सुटली.
त्या
ग्रूपपैकीच असावी अशी एक बाई,
हातातली
यंत्र सगळ्यांना देत फिरत
होती.
गाईड
असावी त्यांची.
आमच्याकडे
येऊन कटाक्ष टाकून गेली.
ते
यंत्र वाटण्याचं काम संपवलं,
काहीतरी
घोषणा केली आणि आमच्याकडे
आली.
नेहेमीचं
हाय हॅलो झालं आणि सांगायला
लागली.
हा
डबा आमच्या या ग्रूपसाठी
Reserved
डबा
आहे.
पुढच्या
डब्यांमध्ये खूप जागा आहे तर
तुम्ही प्लीज,
आता
गाडी सुटायची वेळ होइलच,
तरी
लगेच त्या पुढच्या
डब्यामध्ये तिथे शिफ्ट
व्हाल का?
आम्ही
दोघं जरा चिंतित आणि उठण्याच्या
तयारीत.
श्रीशैल
शांत बसून होता.
म्हणाला
डब्याच्याबाहेर
कुठे तसा रिझर्वेशनचा
वगैरे काही बोर्ड लावलेला
नाही.
ती
जरा चमकलीच,
कदाचित
अपेक्षा नसावी तिला तशी.
तो
पुढे म्हणाला आणि तसही या
गाडीला रिझर्वेशनच नसतं.
असं
म्हटल्यावर मात्र
ती गडबडली आणि म्हणाली की
रेल्वे ऑथोरिटीजनी तिला तसं
प्रॉमिस केलं आहे.
तो
म्हणाला ठीक आहे.
आम्ही
आता इथे बसलोच आहोत तर ऑथोरिटीजची
प्रतिनिधी (म्हणजे
टीसी)
आल्यावर
तिला आपण विचारू आणि ती सांगेल
त्याप्रमाणे ठरवू.
यावर
तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं.
हे
सगळं अगदी शांतपणे सुरू होतं. आपल्याकडे सुरवातीलाच दोन्ही
पक्षांचे आवाज चढतात आणि मग
मुद्दा बाजूलाच रहातो.
ती
शांतपणे पण मनात तडफडत निघून
गेली.
गाडी
सुरू झाली तरी वेग वगैरे काही
फारसा नव्हता आणि तो असण्याची
शक्यता डोंगराळ भागातल्या
प्रवासामुळे अजिबातच नव्हती.
स्थिरस्थावर
झालं होतं.
तो
ग्रूप जपानहून आलेला होता
आणि आम्ही या डब्यात येऊन
बसल्यानंतर डब्यात चढला होता.
तशीही
गाडी खच्चून भरली वगैरे नव्हतीच.
त्या
ग्रूपमधल्या आमच्या सरळ रेषेत
बसलेल्या जोडप्याच्या
एक्सप्रेसिव्ह चेहर्यावर
सतत हास्य आणि आमच्याबरोबर
बोलण्याची उत्सुकता दिसत
होती पण भाषेचा प्रश्न असावा.
इंदिया?
हे
नेहेमीचे वाक्य झाल्यावर
आम्ही संपूर्ण वाक्यात
विचारलेल्या तुम्ही कुठून
आलात या प्रश्नाला उत्तर
देताना तिची भंबेरी उडत होती.
पण
अतिशयच लाइव्हली वाटावं असं
ते जोडपं होतं.
बॉडी
लॅन्ग्वेज हा शब्द आपण नेहमी
वापरतो पण हे दोघं त्याच्या वापराचं
मूर्तिमंत उदाहरण आमच्यासमोर
ठेवत होते.
गाडी
मी मघा म्हटलं तशी खूप सुंदर
लाल भडक रंगाची होती.
थोड्या
अंतरावर जाऊन लगेच स्टेशन
आलं.
आम्ही
स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश
केला होता.
नंतरही
खूपशी स्टेशनं जवळ जवळ असणार होती.
गाडीचा
मार्ग वळणा वळणाचा,
घाटातला.
निसर्गसौन्दर्य
हात जोडून उभं आणि खिडकीच्या
बाहेर काचांमधून बघताना फोटो
काढता येणार नाहीत म्हणून
आम्ही चडफडत होतो.
गाडी
वळताना पुढल्या डब्यातल्या
लोकांच्या माना खिडकीबाहेर
आलेल्या बघितल्यावर आमच्या
डब्यातल्या खिडक्याही खटाखट
उघडल्या गेल्या.
इतका
वेळ शांतपणे चाललेला प्रवास
आता अतिशय vibrant
उत्कंठापूर्ण
झाला.
डब्यातल्या
सीटसची आवश्यकताच नव्हती
कारण उठून उभे राहिल्याशिवाय
ती वरून खाली उघडणारी खिडकी
आम्हाला बाहेर डोकावू देणार
नव्हती.
स्वतःचे
दोन डोळे आणि कॅमेर्याचा
किंवा मोबाइलचा तिसरा डोळा
यांचा अतिवापर आता सुरू झाला.
टी
सी आली.
अगदी
लहानसर बाई.
तिकिटं
बघितली.
हॅपी
जर्नी वगैरे केलं.
कुठे
जाणार असं आम्हाला विचारल्यावर
श्रीशैल म्हणाला आम्ही या
गाडीने सेंट मॉरित्झला जाणार
तिथून गाडी बदलून सेलेरिनाला
उतरणार.
आमचं
हॉटेल बुकिंग सेलेरिनाला
आहे.
तिने
हॉटेल बुकिंगचा कागद विचारला.
दाखवल्यावर
म्हणाली.
सेंट
मॉरित्झच्या आधीचं स्टेशन
सेलेरिना स्टाझ.
तिथे
उतरा आणि तिथून तुमचं हॉटेल
जवळ पडेल.
आमच्याकडच्या
कागदावर हा उल्लेख कुठेच
नव्हता.
तिला
तसं विचारल्यावर म्हणाली
दोन्ही एकाच गावातली पण वेगळ्या
ठिकाणी असलेली स्टेशन्स आहेत.
उगीच
तुम्ही तुमचा दोन अडीच तासाचा
वेळ प्रवासात फुकट घालवू नका.
त्यापेक्षा
तुम्हाला तिथे फिरायला जास्त
मजा येईल.
आम्हाला
धन्य वाटलं.
सगळ्यात
शेवटच्या पायरीवर असलेल्या
अशा लोकांना भेटल्यावर पर्यटन
विकास म्हणजे काय असतो त्याची
कल्पना येते.
अन्यथा
आम्ही कुठे जाणार आहोत याच्याशी
तिला काहीच कर्तव्य नव्हतं.
तिकिटं
चेक करून तिचं काम संपलं असतं,
पण
नाही.
आपल्याकडे
आलेल्या परदेशी प्रवाशाचं
महत्व तिला पूर्ण माहित होतं.
त्याला
संपूर्ण माहिती देऊन आणि
सर्वतोपरी मदत करूनच पर्यटनाला
हातभार लागू शकेल याची
जाणीव,
याचं
ज्ञान शेवटच्या पायरीपर्यंत
percolate
झालं
होतं,
पोहोचलं
होतं.
याला
टोटल कमिटमेंट म्हणतात!
पर्यटक
स्नेही वगैरे शब्द आपण वापरले
तरी अशा तर्हेने
प्रत्येक पातळीवर जाणीव
निर्माण करण्याबाबतीत अजून
आपल्याला खूप मोठा पल्ला
गाठायचा आहे याची कल्पना आली.
गाडीचा
मार्ग वळणावळणाचा,
त्यामुळे
प्रत्येकवेळी वळणावर दिसणारे
पुढचे डबे हे सुद्धा सुरवाती
सुरवातीला लहान मुलाच्या
कुतुहलाने बघितले जात होते.
इतक्या
आडनिड्या जागी एखादा मार्ग
असणं हीच केवढी मोठी achivement
असं
वाटत असतानाच आम्हाला पलीकडे
लांबवर दुसर्या
गाडीच दर्शन झालं आणि या लोकांची
कमाल वाटली.
कोकण
रेल्वे प्रकल्प हा निश्चितपणे
आव्हानात्मक पण ते आव्हानच
आपल्याला अजून खिळवून ठेवते
आहे.
दर
पावसाळ्यात कोसळणार्या
दरडींनी आणि वाहून जाणार्या
मार्गाने आपण जेरीस आलो आहोत.
अशा
परिस्थितीत या इथे बर्फाळ
प्रदेशात अडचणींच्या डोंगरातून
मार्ग काढून हे सगळेजण वर्षाचे
१२ महिने वाहतूक कशी सुरू ठेवत
असतील?
त्याहीपलीकडे
एकापेक्षा अधिक मार्ग कसे
चालवत असतील?
यांना
फायदा तोट्याची गणितं नसतील
का?
पुढील भाग पुढच्या मंगळवारी
This comment has been removed by the author.
ReplyDeleteआनंद छान .मराठी मालिके प्रमाणे कथानक पुढे सरकले नाही पैन गाडीचा प्रवास आणि उप कथानके यांन मुळे मजा आली.
ReplyDeleteआनंद छान .मराठी मालिके प्रमाणे कथानक पुढे सरकले नाही पण गाडीचा प्रवास आणि उप कथानके यांमुळे मजा आली.
ReplyDeleteआनंद छान .मराठी मालिके प्रमाणे कथानक पुढे सरकले नाही पण गाडीचा प्रवास आणि उप कथानके यांमुळे मजा आली.
ReplyDeleteआनंद ,भेटलेल्या व्यक्तींचे तपशीलवार वर्णन व मोजक्या शब्दात ते लेखणीतून उतरवणे दोन्ही कौतुकास्पद आहे. त्यामुळे तिकीट तपासनीस बाई, जपानी पर्यटकांचा ग्रूप,खिडक्यांमधून बाहेर बघण्या साठी ची त्यांची लगबग हे सारे आम्ही बघत आहोत असा भास होत होता. मस्त!
ReplyDeleteवाचनातून अनुभवानंद अनुभवला ! ...एक उत्सुकता... तुम्ही गाडीत चार सीट्स कुणासाठी पकडल्यात ? ...
ReplyDeleteवाचनातून अनुभवानंद अनुभवला ! ...एक उत्सुकता... तुम्ही गाडीत चार सीट्स कुणासाठी पकडल्यात ? ...
ReplyDeleteगाडीचा लाल रंग आणि गवताचा कोवळा हिरवा ....सुरेख फोटो .
ReplyDeleteगाडीचा लाल रंग आणि गवताचा कोवळा हिरवा ....सुरेख फोटो .
ReplyDelete