इटली रोम (रोमा) (३)
खरतर
खूप दमायला झालं होतं.
थोड्या
विश्रांतीची आवश्यकता होती
आणि ती त्या हिलवर निश्चित
मिळाली होती.
कुठेतरी
वाचलं होतं की इथून स्पॅनिश
स्टेप्स,
त्रेवी
फाऊंटन आदी ठिकाणी जाण्यासाठी
ट्रॅम सोयीची आहे.
आम्ही
चौकशी केली.
हो,
इथे
लोकांकडे चौकशी केलेली त्यांना
चालते त्यामुळे आम्ही निःसंकोचपणे
त्यांना विचारत असू.
पण
कोणालाच अशी काही माहिती
नव्हती.
त्यांनी
आम्हाला माहित असलेली माहितीच
पुनः सांगितली. त्याप्रमाणे मेट्रो
पकडून आम्ही बार्बेरिनी
स्टेशनवर
उतरलो आणि चालायला लागलो.
या
चालण्यातली एक गंमत सांगायलाच
हवी.
इटली
आपल्याप्रमाणेच आहे,
अतिशय
बेशिस्त,
हॉर्न्स
वाजत असतात,
लोकं
कुठेही रस्ता ओलांडतात,
सिग्नल
वगैरे काही बघत नाहीत वगैरे
ऐकलं वाचलं होतं.
इथे
आल्यावर वाटलं इटली जर
आपल्याप्रमाणे असेल म्हणजे
आपण जर याबाबतीत त्यांच्याप्रमाणे
असू तर मला खरोखरच चालेल.
म्हणजे
लोकं सिग्नलशिवाय रस्ता
ओलांडतात हे जरी खरं असलं तरी
येणा-या
मोटारी पादचा-यांचा
मान राखतात.
आपल्याकडची
हॉर्न संस्कृती शांतता झोन
वगैरे निर्माण करायला लावण्याइतकी
वाईट आहे.
आपल्यामधे असलेला हॉर्नच्या उपयोगातला उर्मटपणा / अरेरावी मला इथे दिसली नाही.
इथे
त्यांच्याकडे तारतम्य दिसते.
आणि
तसेही सर्वसाधारणपणे सिग्नलला
उभी असणारी माणसे हा इथे अपवाद नाही,
युरोपच्या
एकूण शिस्तप्रिय प्रतिमेपुढे
इटली थोडी कमी इतकच.
त्यांच्याविषयी
प्रवादच
जास्त आहेत.
तर
स्टेशनला उतरून बाहेर आलो.
लांब
आहे, चालायला लागणार वगैरे
ऐकलेल होतं.
आमच्यापुढेच
एक जोडपं चाललं होतं.
त्यांनी
कोणालातरी त्रेवी कुठे
विचारल्यासारखं ऐकू आलं.
त्यामुळे
आम्हीही सरळ ती दिशा धरली.
पर्यटकांचे
लोंढेच्या लोंढे गल्ल्या
बोळातून फिरताना दिसत होते.
त्यामुळे
इथे ब-याच
गोष्टी सापडतील याविषयी वाद
नव्हता.
बरं
या गल्ल्याही कशा, तर छान फरसबंदी
म्हणाव्या अशा.
दगडी
पेव्हर ब्लॉक्सच ते पण भक्कम.
रमत
गमत चालण्य़ाचाही आनंद लुटावा,
ठिकठिकाणचे
रस्त्यावर असणारे विक्रेते
न्याहाळत जावं असं वातावरण. या टेहळणीत अनपेक्षितपणे काही सुंदर गोष्टी दिसतात. त्यातल्याच काही दुकानातल्या लाकडी वस्तू, बघत रहाव्या अशा!
पॅन्थिऑन
याच भागात आहे हे माहीत होतं
पण काय कोण जाणे आमच्या नजरेस
काहीच पडत नव्हतं.
म्हणजे
चर्चेस बघितली,
कारंजीही
बघितली पण ती ही नव्हेत इतकं
तर कळत होतच आम्हाला.
एका
गल्लीत काहीतरी लाइन दिसली
पण तिथे तर सगळं झाकून ठेवलेलं
दिसत होत मग रांग कसली?
म्हणून
पुढे झालो तर ते त्रेवी फाऊंटन होतं.
सध्या
दुरुस्तीकरता बंद आहे हे
सिमोने काल म्हणाला होता
त्याची आठवण झाली.
( I am afraid you may not be able to see Trevi. Some repairs are
under way इति
सिमोने,
हा
आमचा हॉटेलमधला अटेन्डन्ट)
हे
खूप सुंदर आहे असं म्हणतात.
इथे
नाणं टाकल्यावर इच्छा पूर्ण
होते.
एकदा नाणं टाकलं की प्रेम जमतं, दुस-यांदा
लग्न आणि तिस-या
वेळी घटस्फोट हे वाचलेलं
आठवलं.
तसही
भारतातलं नाणं आत्ता माझ्याकडे
नव्हतं आणि युरो टाकले तर मग
खाणार काय?
तेही
रांगेत उभे राहून नाणं टाकून
कोणाचं प्रेम /
लग्न
किंवा घटस्फोट मिळवायचा होता?
आम्ही
काढता पाय घेतला.
मघा
येताना एक काहीही आकर्षक
नसलेलं असं चर्चसारखं काहीतरी
बघितलं होतं.
आत
जाऊन पाहू तरी म्हणून आत गेलो.
बाहेर
कोणतीही पाटी नाही.
आकर्षक
म्हणावं असं काहीच नाही तरी
इतकी लोकं का जाताहेत हा एकच
निकष मनात धरून आत गेलो अणि
चकितच झालो.
हे
पॅन्थिऑन होतं.
बाहेरून अनाकर्षक वाटणारं पॅन्थिऑन
वर छताच्या ठिकाणी आकाशाकडे तोंड केलेलं एक मोकळं आकाशाबरोबर थेट संवाद करणारं भलमोठं विवर म्हणावं असं. भिंतींवरची चित्रं नेहेमीप्रमाणेच ग्रेट वगैरे. पण या रचनेमागचं उद्दिष्ट मात्र कळलं नाही. पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होत असेल? वगैरे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. एक वेगळं काहीतरी बघितलं इतकच समाधान घेऊन बाहेर पडलो. (नंतर विलास आणि पद्मजा या आर्किटेक्ट मित्रांबरोबर बोलताना "या सगळ्यांनी आम्हाला आर्किटेक्चरल हिस्ट्रीमध्ये खूप छळलं आहे" ऐकलं तेव्हा आम्हाला आमच्या या शोधयात्रेतल्या छळाची (?) आठवण झाली.)
आता
आपल्या हिशोबाने संध्याकाळ
उलटून रात्र झाली होती.
आठ
वाजत होते.
परतायला
हवं होतं पण आज स्पॅनिश स्टेप्स
बघितल्याशिवाय जायचं नाही
हेही पक्क होतं शिवाय हीच वेळ
त्यांना भेट देण्याची.
निवांतपणे
पाय-यांवर
बसलेले लोक ही त्याची ओळख.
या
लोकांना खरतर कसलही टूरिस्ट
डेस्टिनेशन करता येतं हे पटलं.
आपल्याकडे
टेकडीवर जाण्याकरता पाय-या
असतात तशा पाय-या,
थोड्याशा
आर्टिस्टिक वगैरे,
त्यांच्या
हिशोबातली गर्दी,
आपल्याकडे
ज्या गोष्टीपासून आपण कायम
दूर पळतो,
निवांतपणा
शोधतो तीच गोष्ट यांचा यूएसपी.
तशी
लोकं होती,
खरतर
हा जुलै महिना म्हणजे म्हणे
ओसंडून वाहणारी गर्दी असते
तस काही चित्र नव्हतं.
आम्हीही
काही क्षण विसावलो.
नंतर
सगळ्या पाय-या
चढून वर गेलो.
पण
इमारतींच्या भाऊगर्दीत तसं
उंचावरून दिसणारं शहर वगैरे
दिसणं शक्य नव्हतं.
जरा इथे तिथे हिंडलो. पुनः त्या बार्बेरिनी मेट्रो स्टेशनपर्यंत चालत जाण्याचं अगदी जिवावर आलं होतं. तोच आम्हाला मेट्रोचा M दिसला. हे बार्बेरिनीच्या पुढचं स्पॅग्ना स्टेशन. आमचीच ऑरेंज लाइन होती. त्यामुळे गाडी टर्मिनीला बदलणे वगैरे भानगड नव्हती. सगळ्या पाय-या चढून वर गेल्याचं सार्थक झालं.
जरा इथे तिथे हिंडलो. पुनः त्या बार्बेरिनी मेट्रो स्टेशनपर्यंत चालत जाण्याचं अगदी जिवावर आलं होतं. तोच आम्हाला मेट्रोचा M दिसला. हे बार्बेरिनीच्या पुढचं स्पॅग्ना स्टेशन. आमचीच ऑरेंज लाइन होती. त्यामुळे गाडी टर्मिनीला बदलणे वगैरे भानगड नव्हती. सगळ्या पाय-या चढून वर गेल्याचं सार्थक झालं.
परतीच्या
वाटेवर आमच्या घराजवळ एक
पित्झेरिया उघडा दिसला.
आतमध्ये
दोघंजण खात बसले होते.
काऊंटरवरच्या
बाईने आस्थेने चौकशी केली
आणि नवे आहोत म्हटल्यावर
शाकाहारीमधले तिच्याकडे
असलेले मोझोरिला,
मार्गारिट्टा,
याव्यतिरिक्त
फक्त बटाट्याचे काप घातलेला
प्रकार दाखवला आणि म्हणाली
की प्रत्येकाचा एक तुकडा देते
मग ठरवा.
प्रत्येकी
चार असे आठ तुकडे वजन करून
तिने आमच्याकडे दिले आणि बसून
घ्यायला सांगितलं.
खरतर
तिकडे एकूण चारच स्टुलं होती.
तीही
अगदी जवळ जवळ.
कुठे
बसणार असा प्रश्नच होता.
पण
त्या माणसाने माझं झालच आहे
म्हणून जागा करून दिली आणि
आमचं सुखेनैव जेवण झालं.
परतताना
हसन दुकानात दिसला.
बंद
करायच्या तयारीत होता.
उद्या
व्हॅटिकनला जाणार म्हटल्यावर
आस्थेने बरोबर फळं वगैरे घेऊन
जा म्हणाला.
त्याला
म्हटलं बाबा आज सकाळी तर नव्हतास
तू.
तेव्हा
उद्या नक्की असेन असं आश्वासन
तरी दिलं.
बघू
असलाच तर ठीक नाहीतर इतर
कु्ठूनतरी घेऊन जायला हवं.
काल
भेट झालेला हा मुलगा,
पण
त्याच्या वागण्याने,
सौजन्याने
किती आपलेपणा निर्माण करून
ठेवला आहे त्याने!
समाप्त
पुढच्या मंगळवारी व्हॅटिकन
अनेकजण रोमला जातात पण घाई घाईने -यात्रा कंपनीच्या सोयीप्रमाणे . आपण चावी चवीने आस्वाद घेत प्रवास करीत आहात या बद्दल आपला हेवा वाटतो व आपल्या दोघांच्या उत्साहाचे कौतुक वाटते.
ReplyDeleteआपल्या लिखाणातील सहज सुंदरता ,तपशील मनाला मोहवितात . जागोजागी मुक्तपणे केलेला भावनांचा शिडकावा आपल्या लिखाणाला रंजक करतात .
ReplyDelete