इटली
रोम (रोमा) (२)
रोममध्ये
मेट्रो आहे आणि आमचं हॉटेल
स्टेशनच्या अगदी जवळ त्यामुळे
फारसं टेन्शन नव्हतं.
सकाळी
उठून बाहेर पडलो.
जाताना
हसनच्या दुकानात डोकावलो
त्याला गुड मॉर्निंग घालू या
म्हणून, पण दिसला नाही.
संध्याकाळी
भेटेल म्हणत आम्ही पुढे गेलो.
स्टेशनवर
आलो आणि तीन दिवसाचं तिकिट
काढण्याकरता मशीनची बटणं
दाबली.
आमच्याकडे
होत्या त्या १०० आणि ५० च्या
नोटा टाकल्या आत.
सुरवातीला
वाटलं आमचं काहीतरी चुकतं
आहे. नंतर बघितलं तर स्क्रीनवर
सूचना येत होती २०च्या नोटा
टाका म्हणून.
१६
युरो प्रत्येकी म्हणजे ३२
रुपयाच्या सुट्ट्यांचा हिशोब
त्या मशिनला जमत नसेल तर इथल्या
माणसांमध्ये आणि मशीनमध्ये
फरक नसावा!
( १.९६*८
हे साधे गणित पण हे आठ वेळा ती
रक्कम मांडून दुकानात हिशोब करत असत त्याची आठवण
झाली)
आता
या २०च्या नोटा कुठून आणू काही
कळेना.
मग
आठवलं की न्यूजपेपर स्टॉलवर
बस, मेट्रो सगळी तिकिटं मिळतात.
पुनः
वर आलो आणि स्टॉल शोधायला
लागलो.
मिळाला,
जवळच
होता.
त्याला
म्हटलं बाबा तीन दिवसांचं
तिकिट हवं. तो म्हणाला
माझ्याकडे फक्त दिवसाचीच तिकिटं आहेत.
म्हटलं
मग मला ५० सुट्टे दे.
कोणतेही
आढेवेढे न घेता त्याने पैसे
काढून दिले आणि आम्ही तीन
दिवसांच्या तिकिटानिशी गाडीमधे
चढलो. (तीन
दिवसाचं तिकिट हे एक दिवसाची
तीन तिकिटं घेण्यापेक्षा
स्वस्त असतं म्हणून हा आटापिटा!)
गर्दीची
वेळ खरी,
पण
आज गाडी बदलायची नव्हती.
त्यामुळे
तसा प्रश्न नव्हता.
शिवाय
हात मोकळे होते,
सामान
नाही.
तसेही
इथल्या गर्दीला गर्दी म्हणायची
ती इथल्या प्रमाणात.
आपल्यासारखं
खेटून उभं रहाणं नाही.
अंतर
राखून सगळे असतात त्यामुळे
तसा आपल्याला प्रश्न नसतो.
कलोझियम याच नावाचं स्टेशन आहे.
बाहेर
आलं की समोर कलोझियम दिसतं.
खूप
गर्दी दिसत होती.
कोणती
गर्दी कशासाठी हा उलगडा करून
घेइपर्यंत कित्येक लोक सरळ
लाइन वगैरे न बघता पुढे जात
होते.
आम्ही
खात्री करून घेतली आणि तिकिट
काढण्याच्या लाइनमध्ये उभे
राहिलो.
साधारण चाळीस मिनिटानंतर तिकिट खिडक्या दिसायला लागल्या. आणखी दहा मिनिटानंतर आम्ही खिडकीवर पोहोचलो. तिकिट काढलं. गाइडकरता वेगळी व्यवस्था असेल असं वाटलं होतं पण ते तिकिटही त्याच खिडकीवर उपलब्ध होतं. तेही घेतलं आणि मग आमचा पुन्क्ट (punkt) म्हणजे इंग्लिश गाइडचा पॉइंट शोधून तिथे उभे राहिलो.

गाइडने
एक पेजरसारखं काहीतरी दिलं. गाइड होती प्रसन्न आणि माहिती
ब-यापैकी
असावी असं दिसत होतं.
ग्रूप
२० २२ जणांचा.
सगळ्यांना
प्रत्यक्ष बोलणं ऐकू येणं
कठीण तेव्हा ते प्लग्ज ती बोलत
असताना कानात घातले की ऐकू
येण्यासाठी तो पेजर.
आपल्याकडे
त्या गाइडचं बोलणं ऐकण्यासाठी
त्याच्या जवळ रहाण्याची धडपड
आठवली.
कलोझिअमची
माहिती वाचलेली निश्चित होती.
पण
मला अस नाही वाटत की गाइडविना
आम्ही ते एन्जॉय करू शकलो
असतो.
तसे
तर ते भग्नावशेष आहेत.
काय
बघायचं त्यात हा दृष्टिकोन
असू शकतो.
ती
माहिती तशीही आपण नंतर विसरून
जातो ही वस्तुस्थिती आहे पण
तरीही ते बघताना त्या काळात
इतकं भव्य बांधकाम उभारलं
होतं या पेक्षा आणखी काही
जाणण्याची इच्छा असेल तर
गाइडला पर्याय नाही असं वाटतं.
खूप गोष्टी आपल्याला कल्पनेने साकाराव्या लागतात. तिथे एक भव्य असा रंगमंच (एरिना) आहे. सगळ्यात समोर राजाचं आसन असलेली जागा त्याच्यासमोरील बाजूस महत्वाच्या माणसांनी बसायची जागा आणि मग वरवर जाणारे स्टेडिअमसारखे थर हे माणसांच्या सामाजिक स्तराप्रमाणे. पण इथे सर्वसामान्यांनाही प्रवेश होता ही त्याची चांगली बाजू. इथे खेळ चालत, द्वंद्व होत, प्राण्यांबरोबरच्या झुंजी चालत. बळी दिल्यानंतर रक्ताचे पाट वहात, चिखल होई. या सगळ्याचा विविध प्रकारे चर खणून वगैरे निचरा करण्याची व्यवस्था तिथे होती. प्राणी आणताना त्याला एका फळीवर उभे करीत आणि दुस-या फळीवर त्याच्यापेक्षा जास्त वजन (मग तो दुसरा प्राणीही असे) दुस-या फळीवर ठेवून लिफ्ट करत. अशा खूप गोष्टी त्या गाइडकडून कळल्या. दुर्दैवाने अंतर्गत रचना या बघण्यासाठी खुल्या नाहीत त्यामुळे ते कल्पनाशक्तीवर सोडून दिलेलं आहे. आपण साधारण दुस-या किंवा तिस-या मजल्यावरून खाली डोकावून हे बघत असतो. पण तसही या सगळ्या इतिहास आणि कल्पना एकत्र गुंफुन तयार झालेल्या गोष्टीच आहेत. एक मात्र खरं की इतकं उंच बांधकाम, सर्वसमावेशक स्वरूपाचं, त्या काळात उभारणं, ज्यात काही हजार प्रजाजन एकाचवेळी बसू शकतील हे विस्मयकारक आहे. त्याचा उपयोग मात्र कैद्यांची द्वंद्व वगैरे मनोरंजनपर (?) कार्यक्रमांसाठी होत असे हे वाचून वाईट वाटलं. काही असो, हा इतिहास आहे आणि तो बदलणे शक्य नाही त्यापासून काही बोध घेता आला तरी पुरे. त्याची ही बाजू काळी आहे म्हणून ती झाकून ठेवावी असं या लोकांना वाटत नाही ही समाधानाची बाब!

कलोझिअम अंतर्भाग
कलोझियम
हा एका मोठ्या कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे.
त्याच्या
तिकिटात आपण कलोझिअम बरोबरच
रोमन फोरम आणि प्लातिनिआ हिल्स
या भागात त्याच तिकिटात हिंडू
शकतो.
रोमन
फोरम हा एक प्रचंड विस्तार
असलेला भग्नावशेषांचा भाग.
‘त्या
इमारतींची रचना,
विस्तार
आणि त्या काळातलं आर्किटेक्चरल
किंवा बांधकामाविषयक ज्ञान
हे सर्वस्वी उच्च प्रतीचं
आहे हे निश्चित.
रोमन
लोक खूप पुढारलेले होते वगैरे
आपण ऐकलेलं असलं तरी त्याची
पोहोच इथे आल्यावर कळते.
असं
असूनही एखादं साम्राज्य का
विलयाला जात असेल?
अर्थात
याचा बोध आपण आपल्या इतिहासाच्या
अभ्यासातूनही घेऊ शकतो.
रोमन
फोरमच्या इमारती खरोखरच छान
आहेत.
तुमची
फक्त खूप पायपीट करण्याची
तयारी हवी.
जुनी
मंदिरं आहेत अर्थात नंतर
आलेल्या ख्रिस्ती धर्माने
या सर्व गोष्टींमधलं त्यांना
असलेलं Threat
ओळखलं आणि अदूरदर्शी लोक जे करतात
तेच त्यांनी केलं.
नष्ट
करा किंवा त्याची चर्च करा.
आपल्याकडे
जशा देवळांच्या मशिदी करण्यात
धन्यता मानली गेली तीच वृत्ती
वेगवेगळ्या पोपनीही दाखवली.
जितका
म्हणून लुटारूपणा करून स्वतःची
साम्राज्ये उभारता आली तेवढी
उभारली.
अतिशय -हस्वदृष्टीच्या
या माणसांमुळे एका संस्कृतीचा
संपूर्ण नाश झाला.
ग्रीकांपासून
चालत आलेली आणि रोमन साम्राज्यानेही
आपली म्हटलेली देवळं हा भागच
मोडीत निघाला.
कदाचित
काळ हा प्रवाही असतो असं त्यावर
म्हटल जाईलही पण आपण यातून
काय गमावतो किंवा काय गमावलं
आहे हे आतातरी मानवाच्या
लक्षात आलं तरी पुरे.
माझ्या
या वेदनेला अर्थातच बामियन
बुद्धाची आणि तशाच खूप काही
गोष्टींची पार्श्वभूमी आहे.
आम्ही
बघत बघत निघालो होतो.
शनीचं
देऊळ Saturn
Temple बघून
आम्ही पुढे आलो.
छान
कमान होती त्यावरची नक्षी
कॅमे-यात
पकडण्याचा वेडा प्रयत्न मी
करत होतो.
तो
अखेरीस सोडून दिला आणि छान
बघत बसलो.
या
भग्नावशेषांचही तुमच्यावर
एक प्रकारचं दडपण/
प्रेशर
येतं.
कदाचित
म्हणूनही असेल पण आम्ही तिकडच्या
दरवाजातून बाहेर पडलो.
आणि
खूप बरं वाटलं.
मागच्या
बाजूला एक नेहेमीप्रमाणेच
विस्तृत असा चौक होता त्यात
फुलांनी इटलीचा तिरंगा (
आपल्याप्रमाणेच
रंग असल्यासारखा फक्त उभे
पट्टे,
इथेही
आपल्यात आणि त्यांच्यात साम्य
आहेच)
होता.
समोर
पाय-या
दिसत होत्या.
चढून
गेलो.
पुतळे
दिसले.
जागोजागी
लिहून ठेवलेलं होतं की हे
सैनिकांचे स्मृतीस्थळ आहे
कृपया त्याचा आदर राखा.
सगळेच
वाचतात असे नाही.
सगळे
टूरिस्ट असतात त्यामुळे
त्यांना जरा मजाही करायची
असते.
इथे
येऊन विसावण्यासाठी या पाय-यांचा
आधार वाटून कोणीही बसले की
लगेच तिथले रखवालदार हटकत
त्यांना.
Not here म्हणून
तिथून हटवत.
त्या
हटवण्यात कुठेही हिणवण्याचा
भाग नव्हता,
अरेरावी
नव्हती,
फक्त
नियम नजरेस आणून देण्याचा
भाग असे.
हे
मात्र निश्चितपणे युरोपातील
वैशिष्ट्य म्हणायला हवे.
आपल्याकडे
वर्दीचा जो अंगभूत माज असतो
तसा तो इथे अभावाने दिसतो.
विस्तृत चौक आणि फुलांचा तिरंगा------------>
आम्ही
बाहेर पडलो खरे पण कलोझियम
आणि रोमन फोरमनंतर लगेचच
प्लातिनिया हिल्सला जाणं
अपेक्षित होतं.
कोणीतरी
म्हणालं होतं की इथून रोमचा
सुंदर नजारा दिसतो.
आम्ही
गेलो पण नजारा वगैरे काही
दिसला नाही.
रोम
ज्या सात टेकड्यांवर वसले
आहे त्या सात टेकड्यांपैकी
एक टेकडी इतकेच माझ्या लेखी
त्याचे महत्व नोंदले गेले.
to be contd.
टीप:- फोटो फीचर होण्याचा धोका टाळण्यासाठी रोमन फोरमचे फोटो इथे देण्याचा मोह टाळला आहे.
टीप:- फोटो फीचर होण्याचा धोका टाळण्यासाठी रोमन फोरमचे फोटो इथे देण्याचा मोह टाळला आहे.
Khup chhan. ...
ReplyDelete