Saturday, 2 November 2013



          दीपावलीनिमित्त
                           हार्दिक
                                 शुभेच्छा !

1 comment:

  1. आनंद ,
    कालच तुला म्हणाल्याप्रमाणे हे सर्व खोटं आहे. तुझं केव्हाचतरी स्वप्नरंजन आता मांडत आहेस. अरे असं कसं शक्य आहे ? असं कुठे असतं का ? अरे शहर आहे, माणसं आहेत म्हटल्यानंतर कमीत कमी बस किंवा रेल्वेची वापरून झालेली तिकिटे, सिगारेट/माचिसची रिकामी पाकिटे, माव्याची ( mouth freshner ) रिकामी पाकिटे, चण्या - फुटण्याच्या कागदी त्रिकोणी पुड्या, गेला बाजार झिजून गेलेले टूथब्रश आणि गंजलेली दाढीची पाती कुठल्यातरी कोपऱ्यात आणि अगदीच काही नाही तरी निदान सिगारेटची थोटक तर नक्कीच दिसायला पहिजेत. नाहीतर काय, सिगारेट ओढून संपलेली थोटक काय खिशात घालून बरोबर घेऊन जाणार ? काहीतरीच काय ?

    किंवा

    त्यांच्या स्थानिक नगरपालिकेची कचऱ्याची गाडी नुकतीच येउन गेली असणार. दोन मिनिटांनी फोटो काढला असतास तर तुला अगदी खरा फोटो मिळाला असता.
    असो, भाळून जायचं वय अजून संपलेलं दिसत नाही.

    आता पुढच्या वेळेस जर नीट लक्ष देऊन फोटो काढ. त्यात तुम्ही तिघंजण व्यवस्थित दिसूदेत. आणि तिकडचे लोकल ड्रेस घालून पण एक / दोन फोटो पाठव. पाठीमागचा आयफेल टॉवरचं अर्ध्या इंचाचं टोक दिसलं तरी पुरे, तुम्ही मात्र स्वेटर आणि गोंडेवाली लाल टोपी मध्ये असायला हवेत. किंवा पसरलेल्या दोन हातात चेपलेला आयफेल टॉवर किंवा सुर्य तरी दिसुदेत.

    सायकलींच कौतुक पुरे. भरल्या फिश मार्केटमध्ये सायकल वरून खरेदी करून दाखवा म्हणावं. उतारावर पायडल न मारता काय कुणीही जाईल, ब्रेक नसताना आणि सिग्नल नसताना लक्ष्मी रोडच्या सिग्नलला उलट्या दिशेने येउन दाखवा म्हणावं. समोर पोलिस असताना ब्रेक तोडून सटकून दाखवा, मग खरे.
    असो.
    तुला कळणार नाही, तुला देशाचा कसलाच अभिमानच नाही. सारखे चकाचक रस्ते कसले बाळगता. काय होतं त्याने. वरात जात नाही तो रस्ता कसला ? लाउडस्पीकर नाही तो नाका कसला ?

    ReplyDelete