स्पेन जिरोना II
तर
हे ओल्ड टाऊन!
या
पाश्चिमात्य लोकांनी या जुन्या
भागांचं महत्व ओळखलं आणि जपलं
आहे.
आपली
संस्कृती पुरातन म्हणून
जुन्या दिल्लीत परदेशी
लोक जुनं शहर बघायला येतात.
पण
आपण याबाबत करंटे!
कितीसं
जुनं शहर चांगल्या आणि मूळ
अवस्थेत राहिलं आहे?
आपण
सगळच
मुळी नवीन करण्याच्या ध्यासाने
(?)
झपाटून
व्यक्तिमत्वहीन शहरं
वसवत निघालो आहोत!
इथले
हे रस्ते सुंदर
आणि
फरसबंदी.
पेव्हर
ब्लॉक्सच पण जुने आणि
भक्कम.
जागोजागी
उखडलेले नव्हेत.
एकच
छोटी
गाडी जेमतेम जाऊ शकेल असा
रस्ता.
त्याच्या
दोन्ही बाजूंनी दुकानं.
चालणारे
पर्यटक,
त्यांच्यासाठी
पदपथ.
पदपथ
गाडीसाठीच्या रस्त्यापेक्षा
एक दगड उंच.
येणारी
गाडी अगदी
हळू येणार.
हॉर्न
हा वाजवण्याकरता नसतो ही
त्यांची श्रद्धा.
चालणारे
बाजूला गेले की गाडी जाईल तोवर
थांबायला काही हरकत नाही ही
धारणा.
अपरात्रीसुद्धा
त्याच हळू वेगात गाड्या तेथून
धावतात,
बहुधा
त्यांना मानवी जीवनाचं मूल्य
माहीत असावं!
त्या
छोट्या गल्ल्यांमध्येही
पुरेसे मोठे असे चौक
मात्र
आहेत.
काही
जे तुलनेने
लहान ते वाहनांना
बंद असतात.
चौकात
किंवा
फुटपाथवर
हॉटेल्सच्या खुर्च्या
मांडलेल्या.
निवांत
बसलेले अनेक लोक.
तसही
स्पेन हे सिएस्टासाठी (
वामकुक्षी/
दुपारची
झोप)
प्रसिद्ध.
अजूनही
ती प्रथा सुरूच आहे.
त्यामुळेच
संध्याकाळी तीननंतर हॉटेलंही
सुस्तावलेली असतात.
अर्थात
रात्री साडे सात आठपर्यंत.
पण
तुम्हाला निवांतपणे बसून
बियरचा आस्वाद घेत तापाज
(Tapas)
खाता
येतात.
तापाज
हा एक खास प्रकार.
इथे
तापाज बार असतात.
स्पॅनिशमध्ये
tapa याचा
अर्थ cover.
या
प्रथेबद्दल खूप कहाण्या ऐकायला
मिळतात.
शेरीच्या
ग्लासमधे वाळू जाऊ नये म्हणून
कोणा राजाला त्यावर हॅम घालून
दिलं,
दुस-या
कोणाला ग्लास ब्रेड स्लाइसने
झाकून दिला.
मग
नुसता ब्रेड कसा द्यायचा तर
त्यावर टोमॅटो काकडी किंवा
कुठलातरी सॉस घालून सजवून
द्यायचा.
तुम्ही
खा किंवा खाऊ नका पण ज्या
त-हेने
हे सारं सजवून आपल्या समोर
ठेवतात ते बघणीय असते.
वाइन,
बियर
किंवा इतर ड्रिन्कसच्या
बरोबरचं खाणं असही त्याचं एक
स्वरूप.
कारण
ड्रिंक्सबरोबर आपल्याकडे
पापड वगैरे फुकट देण्याची
जशी पद्धत आहे तसं इथेही काहीतरी
तापाज देतात.
तापाज
म्हणजे आपल्याकडचे च्याव
म्याव.
काहीतरी
फुटकळ खाणं.
उकडलेला
बटाटा त्यावर कसलातरी सॉस
किंवा तळलेला म्हणण्यापेक्षा
भाजलेला मासा आणि सॉस किंवा
भाजलेलं मटण वगैरे.
क्वांटिटी
कमी असते कारण हे जेवण नव्हे.
दुपारच्या
जेवणानंतर रात्री ९ च्या पुढे
११ वाजेपर्यंत यांची जेवायची
वेळ,
म्हटल्यावर
मधली गॅप भरून काढण्यासाठीचं
हे खाणं.
पण
आपण जसा ऊसाचा रस अर्धा किंवा
फुल घेतो तशी सोय असते.
त्यामुळे
या खाण्याचं जेवणात रुपांतर
होऊ शकतं.
पाश्चिमात्य
देशात अनेकदा पद्धती वेगळ्या
असल्याने गमतीदार प्रसंग
घडतात.
आम्ही
तिघजण दुपारच्या वेळी एका
हॉटेलमधे गेलो होतो.
तशी
प्रत्येक डिशची क्वांटिटी
बघता प्रत्येकी एक डिश जास्त
आणि कंटाळवाणी होते.
म्हणून
आम्ही तीन वेगळ्या डिश (पदार्थ)
मागवल्या.
कोणता
पदार्थ कोणत्या प्रकारच्या
डिशमध्ये द्यायचा याचेही
संकेत असतात.
त्याप्रमाणे
तीन वेगळ्या प्रकारच्या
डिशमध्ये पदार्थ आले.
आपल्या
पद्धतीप्रमाणे आम्ही तिघांनी
ते तीन पदार्थ वाटून घेतले.
एका
वेटरने आमच्या मागून येऊन
राऊंड घेतला.
तो
गेला.
एक
वेटर मुलगी
येऊन आमच्याकडे बघत बघत गेली.
आमच्या
लक्षात येतील अशा पद्धतीने
सगळ्यांच्या राऊंडस आणि
खाणाखुणा सुरू होत्या.
असेल
काहीतरी म्हणून आम्ही त्यावेळी
दुर्लक्ष केलं.
तापाज
खायला आम्ही येऊन बसलो तेव्हा
आम्ही नवीन आहोत हे
बघून त्या मुलीने
(
वेटरचे
काम करणा-या)
आम्हाला
सांगितलं की तुम्ही
वेगवेगळ्या डिश ऑर्डर करू
शकता आणि मेन
कोर्ससारखं
याचं नसतं.
या
डिश तुम्ही शेअर करू शकता!
दुपारच्या
वेळी सगळे वेटर्स आमच्या
भोवती का फिरत होते त्याचा
शोध हा असा लागला.
स्पॅनिश
लोकांचा जास्त करून भर असतो
तो मटण (कार्नेवर).
बाकी
सामिष म्हणजे
मासे वगैरे
असतातच
पण मुख्यतः मटण.
त्यामुळे
निरामिष खाणा-यांना
तसा इटालिअन खाण्यात
असतो
तितका
चॉइस नाही.
इथला
एक दोन प्रकारचा पायेआ (
Paella
) म्हणजे
आपल्याकडे
भाज्या वगैरे
घालून
केलेला
पुलाव.
याचेही
खूप प्रकार असल्याने आपल्याला
नक्की कोणता प्रकार हवा हे
नीट बघून त्यांना सांगावे
लागते.
पण
इथे
एक बरं आहे त्यांना जरी इंग्रजी
आलं नाही तरी मेनू कार्डवर
चित्र आणि त्याखाली त्याचं
इंग्रजीतून नाव व वापरलेले
पदार्थ (Ingredients)
देण्याची
पद्धत आहे.
त्यामुळे
तसा गोंधळ होण्याचा संभव
अजिबात
नाही.
चित्रावर
बोट ठेवलं की झालं.
तापाज
मध्येही त्यांची पताता ग्रासिअस
किंवा
पताता ब्रावाज
नावाची डिश छान आहे.
बटाट्याच्या
फोडी ओवनमधून काढून आपल्या
समोर येतात.
त्या
वेगवेगळे
सॉस आणि मीठ मीरपूड घालून
खायच्या.
छान
लागतात.
तर
अशी ही अन्नछत्र सुरू असतात
चौकाचौकातून.
रस्त्यावर
उन्हात बसून सुशेगाद
खायचं.
तुम्हाला
खाण्याची पिण्याची मजा लुटायची
असेल तर उत्तम संधी.
एरवी
आतली टेबलं रिकामी असतातच.
पण
उन्हाचं अप्रूप असणारे (म्हणजे
खरतर सगळेच)
पर्यटक
बाहेरच बसलेले आढळतात.
हे
पदार्थ शिजवले मात्र रस्त्यावर
जात नाहीत.
हा
युरो देश आहे.
पण
तसा गरीब म्हणायचा.
विशेषतः
क्रायसिसनंतर.
चलती
असलेला बांधकाम व्यवसाय ठप्प
आणि इतर म्हणावा असा निर्मिती
उद्योग नसल्याने बेकारी खूप
आहे.
पर्यटन
उद्योग त्यामुळे महत्वाचा.
परंतु
यातही बाहेरची लोकं,
विशेषतः
चीन फिलिपाइन्स हे पूर्वेकडचे
देश,
त्यातले
अनेकजण
वेटरसारखे जॉब्स करतात.
ही
मंडळी हसतमुख आणि कमी पैशात
कामं करणारी,
इंग्रजी
बोलणारी त्यामुळे
त्यांना प्राधान्यही मिळत
असावे असं त्यांचा सर्वत्र
संचार बघून वाटत रहातं
पुढच्या भागात पो(र)बाऊ (Port Bau)
पुढच्या भागात पो(र)बाऊ (Port Bau)
आनंद ,
ReplyDeleteकालच तुला म्हणाल्याप्रमाणे हे सर्व खोटं आहे. तुझं केव्हाचतरी स्वप्नरंजन आता मांडत आहेस. अरे असं कसं शक्य आहे ? असं कुठे असतं का ? अरे शहर आहे, माणसं आहेत म्हटल्यानंतर कमीत कमी बस किंवा रेल्वेची वापरून झालेली तिकिटे, सिगारेट/माचिसची रिकामी पाकिटे, माव्याची ( mouth freshner ) रिकामी पाकिटे, चण्या - फुटण्याच्या कागदी त्रिकोणी पुड्या, गेला बाजार झिजून गेलेले टूथब्रश आणि गंजलेली दाढीची पाती कुठल्यातरी कोपऱ्यात आणि अगदीच काही नाही तरी निदान सिगारेटची थोटक तर नक्कीच दिसायला पहिजेत. नाहीतर काय, सिगारेट ओढून संपलेली थोटक काय खिशात घालून बरोबर घेऊन जाणार ? काहीतरीच काय ?
किंवा
त्यांच्या स्थानिक नगरपालिकेची कचऱ्याची गाडी नुकतीच येउन गेली असणार. दोन मिनिटांनी फोटो काढला असतास तर तुला अगदी खरा फोटो मिळाला असता.
असो, भाळून जायचं वय अजून संपलेलं दिसत नाही.
आता पुढच्या वेळेस जर नीट लक्ष देऊन फोटो काढ. त्यात तुम्ही तिघंजण व्यवस्थित दिसूदेत. आणि तिकडचे लोकल ड्रेस घालून पण एक / दोन फोटो पाठव. पाठीमागचा आयफेल टॉवरचं अर्ध्या इंचाचं टोक दिसलं तरी पुरे, तुम्ही मात्र स्वेटर आणि गोंडेवाली लाल टोपी मध्ये असायला हवेत. किंवा पसरलेल्या दोन हातात चेपलेला आयफेल टॉवर किंवा सुर्य तरी दिसुदेत.
सायकलींच कौतुक पुरे. भरल्या फिश मार्केटमध्ये सायकल वरून खरेदी करून दाखवा म्हणावं. उतारावर पायडल न मारता काय कुणीही जाईल, ब्रेक नसताना आणि सिग्नल नसताना लक्ष्मी रोडच्या सिग्नलला उलट्या दिशेने येउन दाखवा म्हणावं. समोर पोलिस असताना ब्रेक तोडून सटकून दाखवा, मग खरे.
असो.
तुला कळणार नाही, तुला देशाचा कसलाच अभिमानच नाही. सारखे चकाचक रस्ते कसले बाळगता. काय होतं त्याने. वरात जात नाही तो रस्ता कसला ? लाउडस्पीकर नाही तो नाका कसला ?