भारतात
पकडलेल्या मरीन्सना ख्रिसमसकरता
इटलीला जाण्याची परवानगी
भारताने दिली ती खटल्याकरता
पुनः भारतात परत पाठवण्याच्या
अटीवर.
इटलीने
त्यांना परत पाठवण्यास नकार
दिल्यावर वातावरण गढूळ झाले
होते.
स्वाभाविकपणे
आमच्या इटलीला जायच्या निर्णयावर
त्याचा परिणाम झाला आणि आम्ही
इटलीला न जाता ऑस्ट्रियाला
गेलो.
परतीच्या
प्रवासात जेव्हा गाडी इटलीत
शिरून आली तेव्हा तेवढीच संधी
घेऊन श्रीशैल म्हणाला होता
नाही म्हटलं तरी इटलीला पाय
लागलेच तुमचे!
यावेळी
इटली नाही तर नाही आपण स्पेनला
तरी जाऊन येऊ या.
श्रीशैलचं
खरतर स्पेन आणि इटली या तुलनेने
सौम्य
हवामान
आणि स्वच्छ सूर्यप्रकाश
असलेल्या आणि आपल्यासारखी
साळढाळ माणसं असलेल्या देशांवरचं
प्रेम त्याला स्वस्थ बसू देत
नव्हतं ही
वस्तुस्थिती!
तर
ठीक
आहे चार दिवस
बार्सिलोना जिरोनाला जायचं
आपण
असं म्हणून त्याने हा
प्रश्न
(?)
सोडवला.
रजा
नसल्याकारणाने फक्त वीकएंडपुरता
म्हणजे
शनिवार रविवारी जिरोनाला तो
आमच्या बरोबर असणार होता.
नंतर
आम्ही दोघंच पुढे बार्सिलोनाला
जाऊन बुधवारी परतणार होतो.
जाता
येता जरी विमान असलं तरी जातेवेळी आइंडहोवन नव्हे
तर मास्ट्रिक्टहून फ्लाइट
होती त्यामुळे ट्रेनने
मास्ट्रिक्ट नंतर बसने एअरपोर्ट
तिथून जिरोना एअरपोर्ट नंतर
जिरोना गाव असा थोडासा द्राविडी
प्राणायामच होता.
आम्ही
नेहेमीप्रमाणे श्रीशैलबरोबर जायचे म्हटल्यावर at
ease होतो.
पासपोर्ट
वरच्या खिशात सहज मिळावा
म्हणून (लोकांना!)
सहज
दिसेल असा ठेवला होता.
त्याकडे
लक्ष गेल्यावर श्रीशैल लगेच
म्हणाला स्पेनला चाललो आहोत,
ते
हॉलंड नाही.
कधी
खिशातून गेला ते कळणारसुद्धा
नाही तुम्हाला.
तेव्हा
काळजी घ्या व्यवस्थित.
मुकाट्याने
मी पासपोर्ट आत ठेवून मोकळा
झालो.
अपार्टमेंटच्या
मालकिणीने इ मेलमध्ये
म्हटल्याप्रमाणे बसमधून
जिरोना स्टेशनला उतरल्यानंतर
follow the
railway line till River या
सूचनेप्रमाणे चालायला सुरवात
केली.
नदीपर्यंतचा
रस्ता म्हणजे कोणतही शहर असावं
तसा.
आखीव
रेखीव आणि उंच इमारती असलेलं
शहर .
यापलीकडे
काही त्याला व्यक्तिमत्व आहे
अशी शंका
घ्यायलाही जागा
नव्हती.
नदी
ओलांडली
मात्र !
समोर
आलं ते
एक भव्य चर्च आणि त्याच्या
उजवीकडून जाणारी अरुंद निमुळती
गल्ली.
आपल्याकडे
काळबादेवीला किंवा ठाकुरद्वारला
गेल्यानंतर जशा अगदी लागून
एकमेकासमोर उभ्या असलेल्या
इमारती आहेत तशाच या
इमारती.
कमतरता
फक्त अस्वच्छतेची.या
लोकांचं प्रेम असतं
त्यांच्या शहरावर,
त्या
ऊर्मीतून हे सार साध्य होत
असावं.
लागून
घरं असली तरी ड्रेनेजची
व्यवस्था,
पाणी,
गॅस
(पाइप
गॅस)
इ
सुविधा नेहेमीप्रमाणेच..
म्हणजे
आपण ज्या गोष्टींचा constraints
म्हणून
आपल्याकडे
उल्लेख करतो ते
सगळे constraints
इथेही
आहेत.
अधिक
आहे ती त्यांची वृत्ती आणि
सामाजिक जाणीव.
आपल्याप्रमाणे
तिस-या
सीटवरच्या माणसाला आत ढकलून
चौथी
सीट बळकावण्याच्या पेक्षा
थोडी कळ सोसणं आणि अधिक सुविधा
निर्माण करणं हा त्यांचा चॉइस
आहे.
हात
मारण्याच्या आपल्या वृत्तीपायी
आपण काय आणि किती गमावतो ते
इथे जाणवतं.
संस्कार
संस्कार म्हणून जप करताना
संस्कार कशाला म्हणतात याचाच
विसर आपल्याला पडतो आहे
असं खूप वेळा वाटतं.
.
त्या
बोळकंडीत शिरून नंबर बघत होतो.
दुस-याच
बिल्डिंगमधलं एक अपार्टमेंट
दोन दिवसांसाठी आम्ही
घेतलं होतं.
घराचा
नंबर बघितला आणि श्रीशैल
त्या बाईला फोन लावण्याकरता
फोन खिशातून काढत
होता तोपर्यंत
इमारतीचा दरवाजा उघडून एक
बाई हसत होला (स्पॅनिश
हॅलो)
करत
पुढे आली.
तिच्या
पाठोपाठ पहिल्या
मजल्यावर गेलो.
अपार्टमेंट
सुसज्ज होतं.
आम्ही
स्वयंपाक घराचा उपयोग करणार
नव्हतो कारण तेवढा वेळ नव्हता.
असं
जरी असलं तरी
स्वयंपाकाकरता
लागणा-या
सगळ्या गोष्टी म्हणजे चहा,
साखर,
तेल,
मीठ
इ होतं तशीच
जरुरीपुरती
भांडी आणि क्रोकरी
सगळं होतं.
ओवन
होता तसा मायक्रोवेव्ह होता.
टीवी
होता वगैरे
वगैरे.
तिने
चाव्या आमच्या
ताब्यात दिल्या आणि कधी जाणार
ती वेळ कळवा म्हणाली.
आमचं
सोमवारी सकाळी निघायचं पक्कं
होतं म्हणून सकाळी नवाची वेळ
तिला
सांगितली.
जरा
अवघडून ती म्हणाली मी
नऊ वाजता
सकाळी नाही येऊ
शकणार.
पण
माझी सासू येईल.
तिच्याकडे
तुम्ही
चाव्या द्या.
काही
लागलं तर असावा म्हणून
तिचा संपर्क नंबर देउन ती
निघून गेली.
या
अशा देखण्या
रस्त्यांच्या आम्ही प्रेमात
पडलो यात नवल ते काय?
जीरोनामध्ये फिरायला जायच्या तयारीने आले तर मोठ्ठा break! मंगळवारची आतुरतेने वाट बघत आहे!
ReplyDelete