निरोप
13
ऑक्टोबर
2014पासूनचा
प्रत्येक सोमवार हा मला
प्रेयसीच्या भेटीच्या उत्कंठेची
प्रकर्षाने आठवण करून द्यायचा.
सोमवारी
रात्री 12
नंतर
मी लेख अपलोड करत असे.
त्यात
कोणते फोटो असावेत यावर शेवटच्या
क्षणापर्यंत मनाचा निर्णय
होत नसे.
घरात
शांतता आहे आणि आपण फक्त जागे
आहोत.
कोणाला
न कळत आपण हे सगळं करायला हवं
अशी उगीचच एक भावना मनात असे.
आता
पुढच्या सोमवारपासून प्रेमभंगाचं
दुःख!
(उदासीनता
तुझा रंग कैसा अशी काहीतरी
संदीप खरेची कविता डोक्यात
घोळू लागली आहे.)
ते
विरहाचं ठरावं अशी मनोमन
इच्छा!
प्रवासासंदर्भात
माझी कोणत्याही प्रकारे नोंद
ठेवण्याची पद्धत नाही.
पण
सगळी तिकिटं,
सगळ्या
इ मेल्स(अपार्टमेंट
ओनर्सकडून आलेल्या)
मी
जपून ठेवतो.
आणि
सगळ्यात मोठं काम करतात ते
फोटो.
खूपदा
त्या वातावरणात घेऊन जाण्याकरता
फोटोंचा चांगला उपयोग झाला.
आपल्याला
आठवत नाही,
लक्षात
रहात नाही या माझ्या तक्रारींना
या लिखित आठवणी हे सणसणीत
उत्तर ठरावं.
कदाचित
आपण आठवायचा प्रयत्न करत नसू
त्यामुळे विस्मृतीचा आभास
निर्माण होत असावा.
अल्झायमरची
सुरवात अशीच होत असेल का?
तसं
असेल तर प्रत्येकानेच याप्रकाराने
मेंदूला चालना देण्याचा हा
उद्योग करायला हरकत नाही.
आम्ही
खूप फिरतो,
पायी
फिरतो.
तिघांपैकी
एकाने जरी कंटाळा हा शब्द
काढला असता तरी सगळं ओम फ़स
होण्याची भीती होती.
पण
"समानशीले"
असं
या फिरण्याबाबतीत तरी आमचं
आहे त्यामुळे हे सुखेनैव पार
पडतं.
या
पलीकडे एक महत्वाची गोष्ट
म्हणजे आपलं नशीब.
आम्ही
हा प्रवास केला तो 2014
सालच्या
जुलै महिन्यात.
त्यांचा
(युरोपमधे)
तो
समर असतो त्यामुळे फारसा
प्रश्न येत नाही.
तरीही
हवामानाची साथ नसेल तर काही
खरं नाही.
इथला
पाऊस बेभरवशी,
चिरचिरा
आणि उदासीन!
सगळा
उत्साह घालवून टाकणारा.
हतोत्साह
होणे म्हणजे काय ते तो शिकवतो.
आम्हाला
हे धडे त्याच्याकडून मिळाले
नाहीत हे आमचं मोठच भाग्य.
प्रवासात
आपल्या खाण्यापिण्याच्या
असलेल्या खोड्या,
विशेषतः
भारतीयच जेवणाची अपेक्षा
खूपदा प्रवासातील आनंद हिरावून
घेते.
जाऊ
तिकडे उपलब्ध पदार्थांवर भूक
भागवण्याची सवय असेल तर मग
हा अडथळा निर्माण होत नाही.
अशा
सगळ्या सकारात्मकतेतून हा
आनंद आमच्यापर्यंत पोहोचला.
तसाच
तो तुमच्यापर्यंतही पोहोचू
दे ही साठा उत्तराची कहाणी.....
No comments:
Post a Comment