स्वित्झर्लंड : माऊंट टिटलिस
त्या
बर्फातून पुढे गेल्यानंतर
तिथे एक छान तरंगता म्हणू की
टांगता म्हणू,
असा
पूल होता (suspension
bridge). आपल्याकडल्या
लक्ष्मण झुल्यासारख्या त्या
पुलावरून जाताना सतत बसणार्या
हेलकाव्याने एक वेगळीच गंमत
येत होती.
खाली
खूप खोलवर दरी दिसत होती
तिच्याकडे बघून पोटात खड्डा
पडावा.
असा
पूल म्हणजे आरडा ओरडा आणि फोटो
यांना ऊत येतो.
इथेही
फारसं वेगळं नव्हतं.
पुलावरची
गंमत संपते तिथेच मग बर्फाच्या
गुहेचं प्रवेशद्वार आहे.
की
निर्गमनद्वार?
काही
का असे ना, आम्ही तिथून बर्फाच्या
गुहेत शिरलो.
कृत्रिम
रित्या ठराविक तापमान राखलेली
ती गुहा,
आहे
सुंदर.
आत
फोटो काढता येतील अशा छान जागा
ठेवल्या आहेत.
नागमोडी
वळणाची,
काही
ठिकाणी उंची कमी असलेली,
काही
ठिकाणचा निळा प्रकाश सुंदर,
गूढ
वातावरण निर्माण करतो.
या
अशा कृत्रिम सौंदर्याचही एक
स्थान असतच आयुष्यात याबद्दल
जराही वाद नाही.
ते
त्याचं स्थान मान्य करूनही
मला वरून खाली येताना त्याच
पातळीवरचा अनुभव प्रत्ययाला
आला.
वर
असलेला अथांग हिमसंचय आणि
त्याचं हे कृत्रिम रूप यातून
निवड करायची झाली तर मनाच्या
गाभ्यापर्यंत पोहोचणार्या
त्या हिमशुभ्र चादरीलाच
माझ्याकडून झुकतं माप मिळेल.
गुहेतून
बाहेर पडल्यानंतर मग आम्ही
तिथल्या गॅलेरीत गेलो.
सभोवतालचे
सगळे पर्वत,
शिखरं
हे तर बघण्यासारखे आहेतच पण
माऊंट टिटलिसवर स्मारक आहे
ते आपल्या यश चोप्रांच्या
DDLJ
दिलवाले
दुल्हनिया ले जाएंगेचं.
शाहरुख
आणि काजोलचा एक मोठा कट आऊट
तिथे आहे.
शिलथॉर्न
शिखरावर ज्याप्रमाणे त्या
बॉन्डसोबत फोटो काढण्यासाठी
अहमहमिका होती तोच प्रकार
इथेही होता.
आमचा
अविनाशही याबाबतीत हौशी.
शाहरुख
काजोलबरोबरचा फोटो काढण्याची
संधी तो कसा सोडणार?
उत्तराच्या
मैत्रिणीने माऊंट टिटलिसला
काय होतं?
या
प्रश्नाचं उत्तर वडा पाव दिलं
होतं.
गमतीचा
भाग बाजूला,
पण
इथे खरोखरच भारतीय जेवण मिळतं.
इथे
वडा पाव काही मिळाला नाही.
तिथल्या
रेस्तरॉमधे गेलो तर एक सेक्शन
भारतीय जेवणाचा होता.
आपल्यासारख्या
थाळ्या आणि सेल्फ सर्व्हिस.
आपल्याला
हव्या त्या गोष्टी पानात वाढून
घ्यायच्या आणि काऊंटरवर जायचं.
तिथे
त्या थाळीतील पदार्थांचे
वजनाप्रमाणे पैसे द्यायचे. नाही, प्रत्येक पदार्थाचं वेगळं
वजन करत नाहीत तर सगळ्या थाळीतील
पदार्थांच्या एकत्रित
वजनाप्रमाणे पैसे द्यायचे.
पण
आम्हाला इतक्या सहजी अन्नप्राप्ती
होणार नव्हती.
आतून
ताजे पदार्थ आणण्यासाठी तो
माणूस गेला होता त्याची वाट
बघत प्रतीक्षा करावी लागली.
एकूणात
इथे आम्ही येण्यापूर्वी येऊन
गेलेल्या लोकांनी जेवणाचा
फडशा पाडला होता.
अर्थात
याकरता आमची अजिबात तक्रार
नव्हती कारण त्यांच्यामुळे
तर आम्हाला गरम आणि ताजे पदार्थ
खायला मिळणार होते.
रांगेत
मात्र आपल्याबरोबरीने गोरी
लोकंही दिसत होती.
त्यांच्यापर्यंत
आपल्या पदार्थांची चव आणि
कीर्ती पोहोचली असावी.
अगदी
प्रामाणिकपणे सांगायचं तर
स्वित्झर्लंडमधल्या गिरीशिखरावर
मिळालेलं भारतीय जेवण म्हणून
त्याचं कौतुक पण बाकी ते चवीला
सर्वसाधारण होतं.
अर्थात
ते तिथे उपलब्ध असणं हीच आमच्या
दृष्टीने मोठी गोष्ट होती.
जेवणानंतर
तस मग बाकी बघण्यासारखं काही
उरलं नव्हतं.
आम्ही
थोडं इथे तिथे थांबून परतीच्या
प्रवासाला लागलो.
पूर्वीच्याच
क्रमाने परत आलो, ते ठिकाण
जाण्याच्या ठिकाणापेक्षा
वेगळी बाजू होती.
इथे
गाड्या लागलेल्या होत्या.
आम्हाला
पाहून वडा पाव,
वडा
पाव म्हणून हाकाटी झाली.
म्हणजे
उत्तराच्या मैत्रिणीने थाप
मारली नव्हती तर!
आम्ही
कुतुहल म्हणून पुढे गेलो तर
अविनाश म्हणाला आपण खाऊयाच.
त्याला
म्हटलं अरे आपण आत्ता वरून
जेवून निघालो ना.
पण
त्याचं म्हणणं इथे आपण पुनः
कधी येणार आहोत.
आलो
आहोत तर इथला वडा पाव पण होऊन
जाऊ दे.
तिथल्या
वडा पावाची चवही चाखली.
आमच्यानंतर
येणारी आपली माणसही मग तिथे
येत राहिली.
गाडी
मराठी माणसाची नव्हती.
तो
होता राजस्थानचा पण त्या
गाडीवरचा माणूस मात्र मराठी
होता,
सातारकडचा.
थोड्या
गप्पा झाल्या त्यांच्याशी.
आता
इथे येऊनही त्या लोकांना 20-25
वर्ष
होऊन गेली होती.
आता
इथून एंगेलबर्ग आणि मग आमचा
आणि अविनाशचा मार्ग वेगळा
होणार होता.
त्याचा
इथे स्विसमध्येच प्रोजेक्ट
होता.
त्याचं
जाण्याचं ठिकाणही जवळच होतं
आणि आम्हाला वाटेत लुझर्न ला
थांबून पुढे जायचं होतं.
मग
आम्ही इथेच निरोप घेतला.
त्याला
एंगेलबर्गमध्ये थोडा वेळ हवा
होता.
इतक्या
थोड्या वेळात तो आमच्याबरोबर
आमच्यातलाच झाला होता.
किती
थोड्या वेळात आपल्याला माणसाची
सवय होते!
कोण
कुठला हा मुलगा,
महाराष्ट्रातला
म्हटला तरी भेटीचा प्रश्न
आला नसता तर तो इथे या स्वित्झर्लंडमधे
आणि तेही या माऊंट टिटलिसवर
भेटावा!
योगायोग
वगैरे शब्द ऐकल्यावर हास्यास्पद
वाटतात पण या अशा घटनांमुळेच
याची प्रचिती येत असावी.
एंगेलबर्ग
स्टेशनला आम्ही गाडीत चढलो.
गर्दी
खूप होती.
पण
आम्हाला बसायला मिळालं.
आमच्या
ठिकाणी एक जागा रिकामी होती.
एक
मुलगी इंग्रजीमधून कोरडेपणाने
विचारून गेली रिकामी आहे का?
नंतर
तिचा तो कोरडा वाटणारा उद्धट
स्वर कानावर आला,
मी
सामान आणते म्हटलं ना,
तिथे
जागा आहे आधी बसून घ्या!
एक
वयस्क गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर
त्यांची बायको दोघेही आले.
बाई
आमच्या इथे आणि ते पलीकडे
बसले.
मुलगी
सामान आणायला म्हणून पुनः
दुसर्या कंपार्टमेंटमधे
गेली होती.
मराठी
कानावर पडलं म्हणून उत्तराने
बाईंना विचारलं माऊंट टिटलिसला
जाऊन आलात का?
तर
थोड्या ओशाळ्या स्वरात त्या
म्हणाल्या,
"नाही
हो,
तिकिट
खूपच आहे ना.
तिघांचे
मिळून इतके पैसे खर्च करायला
जिवावर येतं ना!” ऐकतानासुद्धा
आम्हाला वाईट वाटलं.
त्या
मुलीचा राग,
राग
म्हणायचा की त्रागा म्हणायचा?
तिची
इच्छा जरूर होती दोघांना
फिरवून आणायची पण.....
आपण
अर्थात नंतर म्हणू शकतो की
इंटरनेटच्या युगात जी मुलगी
स्वित्झर्लंडमधे प्रोजेक्टकरता
आलेली आहे तिने आधी ही सगळी
माहिती काढायला हवी होती
म्हणजे हा त्रास आणि हिरमोड वाचला असता...
जाऊ
दे,
काही
गोष्टींवर विचार करून शिणायला
होतं फक्त.
आपल्याकडे
उपाय नसतो काहीसुद्धा.
त्यांच्या
त्या नाराजीचा संसर्ग आम्हालाही
थोडा वेळ झालाच.
पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड लुझर्न
No comments:
Post a Comment