स्वित्झर्लंड इंटरलाकेन (२)
आज्ञा
शिरसावंद्य मानून आम्ही बाहेर
पडलो.
उर्सुला
म्हणजे धबधबा होता.
तिला
विरामचिन्ह,
बोलण्यातली
आणि कामातली शिकवलीच नव्हती.
तिचा
नवरा आणि आईही मागच्या खोलीत
होते.
पण
एवढ्या मोठ्या तीन मजली घरातील
सगळ्या पाहुण्यांकडे तिचं
जातीने लक्ष होतं.
नवरा
दिसत असे तो कधीतरी स्वच्छता,
देखरेख
किंवा दुरुस्ती अशी मागील
कामं करताना.
उर्सुला
मात्र सगळ्या हॉटेलला व्यापून
राहिली होती.
वाटेत
जेवून मग पुढे जायचं म्हणून
ठरवून निघालो आणि आधी हॉटेल
शोधायला प्रारंभ केला.
दिसलेलं
पंजाबी हॉटेल बरं वाटलं.
तिथे
असलेली इतरही आपली हॉटेल्स
तशी सारख्याच तर्हेची होती
मग जाऊ इथेच म्हणून गेलो.
गेल्यावर
एक गोरा पान हात,
बांगड्यांनी
पूर्ण भरलेला,
कपाळावर
कुंकू,
पुढे
आला.
आम्ही
आपले हसून नमस्कार केला तर
तिने कोर्या चेहेर्याने
मेन्यू कार्ड पुढे करत हाय
केलं.
कदाचित
तिथेच वाढलेली पंजाबी मुलगी
असेल!
पण
श्रीशैल म्हणाला आपल्याकडलीच
आहे.
तिला
धड इंग्रजीही बोलता येत नाही
आणि इथे बोलल्या जाणार्याही
भाषा येत नाहीत.
कदाचित
गावठी वाटू नये म्हणून हा
प्रयास असावा.
आजवर
परदेशात जिथे कुठे गेलो तिथे,
मग
ते पाकिस्तानी किंवा बांगला
देशी इंडियन रेस्तरॉं असो,
संवाद
झाला नाही असं झालं नव्हतं.
इथे
ते पहिल्यांदाच घडलं होतं.
आम्हाला
आपल्याप्रमाणे पंजाबी थाळी
म्हणजे व्यवस्थित रोटी,
सब्जी,
डाळ,
भात
सगळं मिळालं आणि ते उत्तमच
होतं त्यामुळे तिला माफ करून
आम्ही भरपेट जेवून बाहेर पडलो.
आता
हार्डर कुल्म!.
बाजारातूनही
रस्ता आहे आणि तिथून तुम्ही
थोडं गावातून जाता असं काहीतरी
उर्सुला म्हणाली होती.
मग
आम्ही रमत गमत निघालो.
जेवण
अंगावर आलं म्हणतात तसा प्रकार
होता.
आत्तापर्यंत
आम्ही कधीही दुपारचं जेवण
इतकं जड जेवत नव्हतो कारण
सकाळी ब्रेकफास्ट चांगला
होत असे.
आज
भारतीय जेवण इतक्या दिवसानंतर
मिळाल्यावर जरा जास्तच हात
मारला होता.
बाहेर
ऊन मी म्हणत होतं.
आत्तापर्यंत
ऊन असं कडक नव्हतं.
इथे
तर तीसच्या आसपासचं तापमान
होतं.
सावलीत
असेपर्यंत ठीक पण जरा ऊन्हात
गेलं की जाणवत होतं.
कदाचित
त्या तेलकट मसालेदार जेवणानंतर
आम्ही लगेच बाहेर पडलो होतो
त्याचाही परिणाम असेल.
आम्ही
रमत गमत चाललो होतो.
वाटेत नदीचा प्रवाह होता. नेहेमीप्रमाणेच काठावर फुलांच्या कुंड्यांची सजावट होती. फार न रमता पुढे चालत गेलो. गाव पार करून आम्ही थोडे बाहेर आलो असू तर पाटी दिसली. हार्डर कुल्मला चालत जाणार्या लोकांसाठीचा तो रस्ता/ पायवाट होती. आम्ही पायथ्याशी पोहोचलो होतो. आता फ्युनिक्युलर वगैरे शोधत बसण्यापेक्षा इथून चालत जाण्याचा मार्ग दाखवला आहे तो घेऊ या. आपण सरळ चालत जाऊ. या बोर्डवर 15 मिनिटांचा अवधी दाखवला आहे. जाऊ या ना. तसही आज संध्याकाळी मोकळा वेळ आहे. आमच्यातली हायकिंगची सुरसुरी उफाळून आली. आणि आम्ही चढायला सुरवात केली.
वाटेत नदीचा प्रवाह होता. नेहेमीप्रमाणेच काठावर फुलांच्या कुंड्यांची सजावट होती. फार न रमता पुढे चालत गेलो. गाव पार करून आम्ही थोडे बाहेर आलो असू तर पाटी दिसली. हार्डर कुल्मला चालत जाणार्या लोकांसाठीचा तो रस्ता/ पायवाट होती. आम्ही पायथ्याशी पोहोचलो होतो. आता फ्युनिक्युलर वगैरे शोधत बसण्यापेक्षा इथून चालत जाण्याचा मार्ग दाखवला आहे तो घेऊ या. आपण सरळ चालत जाऊ. या बोर्डवर 15 मिनिटांचा अवधी दाखवला आहे. जाऊ या ना. तसही आज संध्याकाळी मोकळा वेळ आहे. आमच्यातली हायकिंगची सुरसुरी उफाळून आली. आणि आम्ही चढायला सुरवात केली.
दाट
म्हणावी अशी नसली तरी झाडांची
सावली होती त्यामुळे उन्हाचा
थेट उपद्रव नव्हता.
थोडं
चढून गेलो आणि झाडांमधून
दिसणारं शहर आमच्याकडे बघायला
लागलं.
तलाव
कसले,
विस्तीर्ण
नद्या वाटत होत्या.
दोन
बाजूंनी आलेल्या त्या तलावांमध्ये
एक चिंचोळा जमिनीचा पट्टा
दिसत होता.
आखीव
रेखीव असं त्या शहराच ते रूप
इथून फारच गोजिरवाणं वाटत
होतं.
शहराच
ते सुखावणारं
दर्शन आमचा चालण्याचा प्रयास
हलका करत होतं.
सगळीकडे
आकाशात उडणारे ग्लायडर्स
दिसत होते.
दूरवरच्या
डोंगरांवरचा बर्फ़ उन्हात
चमकून तजेलदार तांबूस दिसत
होता.
आज
वर जाताना मधून मधून थांबावं
लागत होतं आणि तहानही खूप लागत
होती.
झाडी
असल्याकारणाने उन्हाचा तसा
त्रास नव्हता पण तापमान
त्रासदायक होतं.
तासभर
गेल्यानंतर आम्हाला कळेना
अजून का येत नाही?
मघा
तर पंधरा मिनिटांचा बोर्ड
होता!
वाटेत
पाट्या होत्या त्यावर दाखवलेल्या
बाणावरून रस्ता तर बरोबर होता
पण संपण्याचं चिन्ह दिसत
नव्हतं.
बरं,
वाटेत
कोणी भेटेल तर तेही नाही.
आता
परतीचे मार्ग तर बंद होते.
थांबत
थांबत आम्ही पुढे जात होतो.
एवढ्यात
दोघे तरूण खाली उतरताना दिसले.
त्यांना
विचारलं तर म्हणाले की आमच्या
चालीने तास लागेल.
तुम्हाला
किती ते बघा.
कदाचित
पोहोचणारही नाही.
असं
म्हणून त्यांनी डोळे मिचकावले!
मग
तर आम्हाला चेव येणारच.
आम्ही
पुढे निघालो.
अर्धा
तास असाच गेला.
आता
मात्र काळजी वाटू लागली.
किती
वेळ चालणार?
त्यात
त्या भरपेट जेवलेल्या पंजाबी
जेवणाच्या तेलकट,
मसालेदार
गुणांचा त्रास वाटू लागला
होता.
थोडा
वेळ विश्रांती घे असं उत्तराला
सांगून आम्ही दोघं थोडे पुढे
गेलो काही शेवटाचा मागमूस
दिसतो आहे का ते बघायला.
श्रीशैल
म्हणाला आज कधी नव्हे ते आईची
काळजी वाटते आहे.
चालत
येण्यात चूक तर झाली नाही ना?
हे
संपण्याचं कुठे चिन्ह नाही.
माझ्याही
मनात तोच विचार होता पण आता
पुढे जाण्याव्यतिरिक्त पर्याय
नव्हता.
प्रत्येक
वेळी पुढे जाताना दिसणारं
मोकळं आकाश पाहून चला आलं शिखर
अशी आशा वाटत असे.
पुढे
गेल्यानंतर पुढचं वळण.
अशी
किती वळणं आणि किती आशा आणि
नंतरची निराशा.
पण
एक मात्र होतं की दमल्यावरही
काळजी वाटत असतानाही उगीच
चिडचिड वगैरे झाली नाही.
तरी
मी सांगत होते किंवा होतो असही
झालं नाही.
मजल
दरमजल करत चढताना एकदम एका
वळणानंतर आवाज आले.
कोणीतरी
मुलं खेळत असावीत.
म्हणजे
नक्की आलो.
आता
अंगात उत्साह भरला होता.
पुढची
पंधरा मिनिटं कशी गेली कळल
नाही.
थोडी
सपाटी होती.
तिथे
काही मुली हॅंडबॉल खेळत
होत्या.
वाळवंटात
फिरत असताना पाण्याची चाहूल
लागावी तस झालं हे!
अजून
चढ बाकी होता पण कुठेतरी आपल्या
डेस्टिनेशनपर्यंत पोचण्याच्या
बेतात आल्यावर मग मनाला उभारी
आली होती.
इतक्यात
श्रीशैल म्हणाला बाबा आपण
सिऑनला किल्ल्यावर गेलो होतो
त्याच्या प्रवेशाची वेळ
संध्याकाळी साडेपाचपर्यंतच
होती.
स्वित्झर्लंडमधे
सगळ्या गोष्टी साडेपाचला बंद
तर होत नसतील ना? मग?.............
पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड इंटरलाकेन 3
पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड इंटरलाकेन 3
उजव्या कोपर्यात झाडांच्या वरच्या बाजूला दिसणारा पॅरा ग्लायडर. बर्फावर पडलेल्या सुवर्ण किरणांचं दर्शन फारच अप्रतिम होतं.
No comments:
Post a Comment