व्हॅटिकन (३)
जाऊ
दे असं म्हणत आम्ही बाहेर आलो.
अजून एक
महत्वाचं आणि कष्टाचं काम
बाकी होतं.
तसं ते
आवडतं असल्यामुळे फारसा प्रश्न
नव्हता.
चढून वर
घुमटापर्यंत जायचं.
इथे खरतर
लिफ्ट आहे.
तिला थोडे
जास्त तिकिट आणि पायी जाणा-यांना
कमी तिकिट.
पण लिफ्ट्ला
इतकी गर्दी होती आणि त्यातून
आपण काही म्हातारे नाही
लिफ्टमधून जायला, ही ऊर्मी
(खर
म्हणजे माज)
होता.
आम्ही
चालायला सुरवात केली.
काहीतरी
दोन अडीचशे पाय-या
झाल्या आणि उजेड दिसायला
लागला.
हट इतकच
तर होतं लिफ्ट नाही घेतली ते
बरं झालं वगैरे म्हणून बाहेर
आलो.
इथवरचा
जिनाही खूप रूंद वगैरे होता
त्यामुळे काहीच कष्टदायक
वाटलं नाही.
बाहेर
पडून खाली बघितलं फोटो काढले
आणि कळलं हे जेमतेम अर्ध्यावर
आलो आहोत.
लिफ्टही
माणसांना इथवरच आणून सोडते.
पैसे
वाचल्याचा आनंद झाला.
पुढे सगळेच
चालणार होते.
आता
जिना थोडा अरूंद झाला होता.
आमच्या
मागे दोन बायका आणि एक छोटा
मुलगा होता.
असेल दहा
बारा वर्षाचा.
पाय-या
मोजण्याचा त्याचा उद्योग
सुरू होता.
उत्तराही
मोजत होती.
त्याचा
आकडा चुकला की त्याला सांगत
होती.
मग तो
खिदळत होता.
बरोबरच्या
त्या दोन्ही बायका दमल्या
होत्या त्यांना चिडवत याचं पटापट जिना चढणं सुरू होतं.
असाच काही
वेळ गेला.
आता तो
गोल जिना आणखी अरूंद झाला.
जेमतेम
एक माणूस एका वेळी.
त्यामुळे
वेग मंदावला होता.
कोणीही
पुढचा माणूस पुढे गेल्याशिवाय
जाऊ शकत नव्हतं.
पण कुठेही
अंधार किंवा कोंडलेपण नव्हतं.
मधे मधे
त्यांनी वारा-
प्रकाशाकरता
झरोके ठेवले होते.
दमलेल्या
लोकांना त्याच्या आधाराने
इतरांना पुढे जाऊ देता येत
होतं.
या सगळ्या
वर जाण्यात कुठेही आरडा ओरडा,
शिट्ट्या
किंवा उगीचच किंचाळणं, घाबरवणं
इ.
कोणताही
प्रकार नव्हता त्यामुळे हे
कष्टही सुखद वाटत होते.
तिस-या
टप्प्यात जेमतेम एका माणसाला
सामावून घेणा-या
त्या जिन्याची ती भिंत कलती
झाली.
त्यामुळे
आम्हालाही भिंतीला तिरके होत
जावे लागत होते.
अखेरीस
एकूण ६१२ पाय-यांचा
हा प्रवास संपून आम्ही एकदाचे
वर पोहोचलो.
शेवटच्या
टप्प्यात पोहोचल्याचा आनंद
होता तसा वरून व्हॅटिकन
बघण्याचासुद्धा.
सेंट पीटर्स स्क्वेअर, व्हॅटिकन
समोरचा
सेंट पीटर चौक देखणा खराच.
कंपासमधलं
वर्तुळ ठेवून काढलेला गोल
आणि बाहेर जाणारा तो रस्ता!
बघत रहावं
असा.
इतक्या
उंचावर बांधलेल्या त्या
गॅलेरीला अर्थातच जाळी होती.
त्यामुळे
कॅमेरा त्याच्या बाहेर काढून
तो चौक टिपावा लागत होता.
फोटो
व्हिडिओ सगळेजण इतके गुंगलेले
होते आणि त्यात नवीन येणा-यांची
भर पडत होती.
उत्तराला
म्हटलं मी जरा इतर बाजूंनी
बघतो आणि मी निघालो.
जेमतेम
माणूस जाऊ शकेल अशी रचना.
त्यात
खांबांचा अडथळा.
वाट काढत
काढत मी समोरून दिसणारा पूल
त्यावरून जाणारी रेल्वे गाडी,
किल्ला,
नदी सारं
काही आपल्याला डोळ्यात आणि
कॅमे-यात
बंदिस्त करता यावं या धडपडीत
होतो.
किती वेळ
झाला कोणास ठाऊक पण आवरून आता
निघू या असं वाटलं आणि बघायला
गेलो तर गर्दीच्या त्या गोंधळात
उत्तराचा कुठे पत्ता नव्हता.
मी पूर्ण
चक्कर मारली पण मधले खांब आणि
गर्दी दोन्हीचा अडथळा होता.
शिवाय
तीसुद्धा माझ्यासारखी फिरत
असेल तर?
शेवटी मी एका जागी शांत उभा राहिलो आणि
समोरून ती येताना दिसली.
"होतात
कुठे तुम्ही?
किती
शोधत होते तुम्हाला इतका वेळ.”
घायकुतीला
आलेला तिचा आवाज ऐकला तेव्हा
मला हसू आलं.
जाऊन जाऊन
कुठे जाणार होतो मी?
तसाही
खाली उतरल्यावर मी भेटलोच
असतो पण माणसाचा धीर सुटला
की विचारही सोडून जातो बहुधा.
आम्ही
बाहेर पडण्याच्या रांगेत उभे
राहिलो.
परतीचा
जिना सुदैवाने वेगळा आहे.
तितकाच
अरूंद एकामागोमाग एक असं
चालायला लावणारा.
पण परतीची
वाट नेहेमीच सोपी असते!
कदाचित
आपल्याला कुठे जायचं हे माहित
असतं म्हणूनही असेल पण तसेच
पाय-या
मोजत आम्ही मधल्या टप्प्यापर्यंत
आलो तेव्हा तोच मघा वर येताना
उड्या मारत वर चढणारा छोटा
मुलगा पुढे होता.
तशाच आणि
तितक्याच उत्साहात पुढे जात
होता.
मध्यावर
येऊन विसावलो.
तिथे पाणी,
टॉयलेट
सगळी सोय आहे.
उंचावर
असल्याने वारा छान होता.
दिवस
उन्हाळ्याचे.
स्वच्छ
आकाश आणि भोवतालचं सुंदर
वातावरण.
थोडा
निवांतपणा आला होता.
आजच्या
दिवसात आता आणखी काही उरकायची
(!)
घाई नव्हती.
आमच्या
जवळ प्लॅस्टिकचे ग्लास (पुनः
पाणी घालून धुवून ठेवलेले)
होते ते
काढले आणि थर्मासमधला चहा
ओतून पीत होतो.
झाल्यावर
नळावरून धुवून परत ठेवायचे
दुस-या
वेळेकरता.
उत्तरा
म्हणाली "मला
विचित्र वाटतं.
इतक्या
लोकांच्यासमोर तिथे जाऊन ते
ग्लास धुवून पुनः ठेवायचे
म्हणजे काय, मी ते टाकून देते.”
मी
म्हटलं "तुला
विचित्र वाटायला इथे ना ओळख
ना पाळख.
दे माझ्याकडे
मी आणून देतो.”
मी घेऊन
नळावर गेलो तेव्हढ्यात एक
मुलगा तिच्याबरोबर बोलायला
लागला.
"मराठी
कानावर पडलं आणि बरं वाटलं!”
(
हे मराठी
कानावर पडल्यामुळे होतं की
आमचा सुखसंवाद (!)
ऐकल्यामुळे
होतं कोण जाणे! लिहिलेले शब्द कोणत्या सुरात बोलले जातात त्यावर तर सारं ठरत असतं. )
कुठून
मुंबईहून का?
वगैरे
नेहेमीचे प्रश्न होईपर्यंत
मी तिथे पोहोचलो.
त्याने
मला हॅलो केले आणि म्हणाला
मी राकेश थापर.
माझी आई
मराठी आहे,
पार्ल्याला
माझं आजोळ.
मला पंजाबी
आणि मराठी दोन्ही तितकच चांगलं
येतं.
आमच्या
खूप छान गप्पा सुरू झाल्या.
त्याने
खूप वर्षापासून ओळख असल्याप्रमाणे
त्यांच्या लग्नाची हकीगत
सांगितली.
तारा
जुळल्या की माणसं किती जवळ
येतात !
आमच्याकडे
थर्मासमधे थोडाच चहा उरला
होता.
त्यांना
विचारलं तर पटकन हो आलं.
मला बरं
वाटलं उगीच आढेवेढे नाहीत.
आपल्यासारखा
चहा इथे कुठे मिळायला?
बरं वाटलं
चहा पिऊन.
अशी पावती
पण त्यांनी दिली.
इतका
वेळ बोलत असताना आमची नावं
सांगण्याचा प्रश्नच आला
नव्हता.
पण त्यांना
त्याची आठवण होती.
मघा
पार्ल्याचा विषय आला तेव्हा
उत्तराने तिचं पार्ले कनेक्शन
सांगितलं होतच.
तिचं नाव
ऐकल्यावर तो म्हणाला अरे!
माझ्या
आजीचं नावही उत्तरा आहे.
What a coincidence! लंडनला
रहाणारे ते दोघं लग्नानंतर
अजून आजीला भेटायला यायला
जमलं नव्हतं आणि आम्ही मुंबईहून
निघून व्हाया नेदरलॅंन्डस
इटलीमध्ये भेटत होतो.
या गोष्टीचं
अजब वाटत आम्ही एकमेकांचा
निरोप घेतला.
भाग चौथा आणि शेवटचा पुढील मंगळवारी
भाग चौथा आणि शेवटचा पुढील मंगळवारी
व्हॅटिकन टॉवरवरून दिसणारं |
आनंद ,मनाला खूप आनंद वाटतो हे वाचताना ! प्रत्यक्ष तिथे असल्याचा आभास होतो. थंडगार वाऱ्याची झुळुक आपणही अनुभवतोय व तुझ्याबरोबर पायऱ्या चढताना दमणुक होते आहे असे वाटते .
ReplyDeleteविनासायास आणि विनाखर्च युरोप दर्शन होते आहे तुझ्यामुळे . उत्तराचीही कमाल आहे .