Saturday 25 July 2020

REMEMBRANCE (आठवण)


हा लेख, याला मी लेख तरी कसं म्हणू? कागदावर उतरला म्हणून काहीतरी म्हणायचं इतकच, पण हे असं आतून. गाभ्यातून आलेलं, त्याला कधी नाव देता येतं का?

तर चेष्टे चेष्टेत , काय लेखकराव, आमच्यावर कधी लिहिता आहात? त्या निमित्ताने आम्हाला जागतिक प्रसिद्धी मिळेल, असं. तो  म्हणत असे. हे सगळं लिहिलं होतं तेव्हाच म्हणजे 2018 साली. त्याने ते वाचून नेहेमीप्रमाणे टीका टिप्पणीसुद्धा केली होती. त्याची हरकत नव्हतीच हे मी ब्लॉगवर टाकायला, तरीही   ते इथे देण्याचं मी टाळत आलो. आक्षेप त्यातला की हे फारच वैयक्तिक आहे. कालच्या राजूच्या जाण्याने,  (याच्यावर विश्वास ठेवणं कठीणच) आता या मर्यादेला, आक्षेपाला अर्थ उरला नाही.  आज हे इथे देताना, पुनः वाचताना त्याच्याबरोबरच्या सहवासाचा आनंद लुटण्याचा लाभ घेण्याचा हा (केविलवाणा) प्रयत्न.   







आमच्या स्कॉटलंड ट्रीपच्या शेवटच्या टप्प्यातील एडीन्बरा हा शेवटचा मुक्कामहॉटेलची एक गंमतच होतीप्रवेशद्वारापाशीच जमाव घुटमळत असेथोडं विचित्रच वाटलं सुरवातीलानंतर कळलं वाय फाय फक्त इथेच मिळतं खोलीत अजिबात रेंज नाहीतेव्हाच म्हटलं बोंबला आता.

 

कालपर्यंत मी आणि राजू दिवसातून निदान एकदा तरी बोलत होतोनकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न म्हणतात तसं त्याच्याकडे लंडनलाही नेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होतामला तर आता आमच्याविरुद्धच्या सार्वत्रिक कटाचीच खात्री वाटायला लागलीब्रिटीश टेलिकॉमने लंडनला राजूकडे आणि इथे या...... पण कल्पनाराज्यात रमायला वेळ नव्हताएडीन्बराला निघण्या आधी मी हट्टाने राजूकडून पत्ता विचारून घेतला होतात्याचं एकच म्हणणं पत्ता घेऊन तू पोहोचणार कसामीच तुला घेऊन जायला येणार आहे नापण तरीही मी निदान पत्ता तरी असावा जवळम्हणून तो घेऊन ठेवला होताब्रिटीश टेलिकॉमच्या कटाचा सुगावा लागल्याकारणाने केतकीपण सावध झाली होतीतिने मग तिचा नंबरऑफीसचा नंबर असं सगळं मला देऊन तो कट हाणून पाडायची पूर्ण व्यवस्था केली.

 

आम्ही हॉटेलमधून शहरात जायला निघण्याकरता बसची वाट बघत होतोही चुकली तर एक किलोमीटर चालत जाऊन दुसरी पकडावी लागली असतीतेव्हढ्यात फोन वाजलाराजूने लंडनच्या स्ट्रानस्टेडला उतरल्यावर कोणत्यातरी स्टेशनवर ट्यूबने या असं सांगितलंनाव मला कळलं नाहीम्हणून मी श्रीशैलकडे फोन दिला पण सिग्नल खूप वीक होतात्याने तो पुनः माझ्याकडे सोपवला इतक्यात बस आली म्हणून घाई करायला सुरवात झालीमाझ्या डोळ्यासमोर आत्ताची बस आणि लंडनला उतरल्यानंतर काय असा प्रश्न उभामी त्या दोघांना (श्रीशैल व उत्तरापुढे व्हा म्हटलं आणि मला काहीतरी मिले एंड लक्षात ठेव असं त्याने सांगितल्यासारखं वाटलंचला काहीतरी आपल्या हातात आलं या समाधानात मी शेवटच्या क्षणी बसमध्ये चढलो.

 

एडिंबरा स्टेशनआलो तेव्हाच मला आवडलं होतंआता निवांत बघता येईल अशा कल्पनेत होतो पण..... तसं हे स्टेशन एका सलग पातळीत नाहीखरतर आम्ही पाहिलेली कोणतीच स्टेशनं एका पातळीत नाहीतत्यामुळे प्लॅटफॉर्मची संख्या वीस पण सलग नाही तर तीन चार पातळीवररेल्वे खाजगीत्यामुळे प्रत्येकाचे प्लॅटफॉर्म वेगळेस्टेशनचा भव्यपणा नजरेत येण्याची काही शक्यताच नाहीत्यातून आम्हाला आत्ता राजू त्या स्टेशनवर वाट बघत असेल ही काळजीउगीचची!

 

लंडनला स्टेशनवर उतरलो आणि आपल्याकडची गर्दी आठवलीजनांचा चालला प्रवाहोआम्ही निर्धास्त होतो श्रीशैलमुळेतो असला की सगळी जबाबदारी त्याची हे आमचं डिव्हिजन ऑफ वर्क ठरलेलंपण इथे आमची भीती म्हणजे त्याच्यामागून गर्दीतून बरोबर चालत रहाण्याचीत्याने कुठला तो मार्ग बघितलाराजूने सांगितलेली लाईन ही नव्हतीमी हलकासा उल्लेख केलातर त्याचं उत्तर आलंआपल्याला त्या स्टेशनला जायचं आहे नामग कसाही गेलो तरी काय फरक पडतोआमची एक आजी म्हणायचीसत्तेपुढे शहाणपण नाहीते वाक्य आठवलं मी गप्पआम्ही आपले गाडीची वाट बघत बसलो.

 

गाडी माईल एंड स्टेशनमध्ये आलीराजूने कोणत्या बाजूने बाहेर पडा आम्ही कुठे असू वगैरे सूचना दिल्या होत्याआम्ही बाहेर आलोश्रीशैलने त्याला बघितलेमी शोधत होतो कुठे दिसतो आहे तेशेवटी त्यानेच हाक मारली आणि मला देवांगी आणि तो समोरच त्यांच्या गाडीपाशी उभे दिसलेचलाआता तुम्ही आणि तुमचा मित्रमी घरी जायला मोकळा असं श्रीशैल म्हणाला खरा पण ते उद्यापासूनआजतर त्यालाही राजूचा पाहुणचार घ्यायचा होताच.

 

हे डावीकडे दिसतं आहे ते कॅनरी व्हार्फलंडनचं फ़ायनान्शिअल हबदिव्यांच्या लखलखाटात ती इमारत उठून दिसत होतीलक्षात ठेवा कारण ट्यूबचं स्टेशन आहेमाईल एंड हे आम्हाला बसने जोडणार स्टेशन असलं तरी ते दूर आहेहे अगदी जवळचंआम्ही बघून ठेवलंरात्रीच्या अंधुक प्रकाशात त्याने बोट दाखवल्या ठिकाणी पाणी दिसत होतंही आमची तमसाआपल्या घराच्या मागल्या अंगाला (हा त्याचाच शब्द ती आपल्याला भेटतेमिळालेलं प्रत्येक मिनिट उपयोगात आणत होता तोइतक्या वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा तर आमचा चार रात्री पाच दिवसांचा मुक्काम पुरेसा नाही हे त्याने आधीपासूनच जाहीर केलेलं होतंत्याचा व्यवस्थित निषेधही नोंदवून झाला होतामाझ्यापाशी आणि श्रीशैलकडेसुद्धापण श्रीशैलच्या वाट्याला येणा-या उण्यापु-या दोन महिन्यातला आणखी वाटा देण्याकरता श्रीशैलही तयार नव्हता!

 

घरी पोहोचलोत्याआधी त्याने काही खुणा सांगीतल्याही पण सगळं लक्ष आता घराकडे होतंघराची गेटेड सिक्युरिटीते कसं उघडायचंत्याचं प्रात्यक्षिक हे सारं करून आम्ही कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश केलाडावीकडे गाडी पार्क करूनहे आपलं घर म्हटल्यावर आम्ही सामान घेऊन गृहप्रवेश करते झालो!

 

युरोपातली घरं आता ब-यापैकी परिचयाची झाली आहेतमहत्वाचा फरक होता तो तळमजल्यावरच्या झोपायच्या खोलीचासर्वसाधारणपणे दुर्मिळ असणारी ही गोष्ट याम्हणजे युरोपातील लोकांना म्हातारपणीसुद्धा आपण जिने चढ उतर करू शकू असा विश्वास कसा वाटतो हेच समजत नाहीसगळ्या घरांच्या शयनगृहाकरता कमीत कमी एक तरी मजला चढायला लावण्यात काय हशीलतर ही सोय इथे उत्तमवरच्या मजल्यावर छान बैठकीची खोलीम्हणजे आमचा अड्डा आणि दुस-या बाजूला स्वयंपाकघरत्यावर गेल्यावर मग दोन बेडरूम्स आणि पुनवर ते अॅटीकमला ते सगळं बघून केतकीलाच विचारायचा मोह झाला की बाई ग कुठे काय ठेवलं आहे ते कसं लक्षात ठेवतेस आणि किती वेळा साधारणपणे तुम्ही जिने चढ उतर करताराजू केतकी आणि देवांगी तिघेही जण अगदी मापात आहेत त्याचं श्रेय या जिन्यांच असावं असा निष्कर्ष काढून आम्ही मोकळे झालो.

 

आम्ही येणार म्हणून केतकीने दोन दिवस रजाच टाकली होती आणि नंतरच्या दिवशी जेव्हा आम्ही लंडन बघण्यासाठी बाहेर पडणार होतो तेव्हा आमच्या वेळांप्रमाणे वेळ बदलून घेतली होतीराजू काय त्याच्या कामाचा राजा त्यामुळे मी पूर्णवेळ तुमच्या सेवेत आहे असं जाहीर करून मोकळा झाला होतानंतरच्या चार दिवसातल्या त्यांच्या पाहुणचारानेहा शब्द मी वापरला तरी तो समर्पक निश्चित नाही कारण मी काय आणि उत्तरा काय आंम्ही घराच्या वरताण तिथे राहिलो आणि त्याहीपलीकडे या दोघांनी सासरकडची माणसं असावीत तशी आमची बडदास्त ठेवली.

 

मला वाईन आवडते म्हणून रेडव्हाईटरोसे अशा वेगवेगळ्या वाईन्स त्याने पोतडीतून काढल्यामनसोक्त आस्वाद घेण्याकरता आम्ही मोकळे होतो पण त्या दोघांना घराकडे लक्ष देण्याचीही जबाबदारी होतीदेवांगी सकाळी उठून शाळेत जाणार याचं भानही असणारच.

 

पण देवांगी खरच गुणी मुलगीआम्ही आलो आहोतकोणीतरी बाबाचेचुकलो बाबांचेहोतिला परदेशात जन्मली असली तरी मराठीतले पाठभेदअरेअहो आणि त्याहीपेक्षा खास नाईक घरातलं तिरकं बोलणं व्यवस्थित समजतं आणि तिने ते उत्तम त-हेने आत्मसातही केलेलं आहेआमच्या संभाषणात तिने फारच क्वचित इंग्रजीचा आधार घेतला असेलआम्ही होतो त्या दिवसात ती अभ्यास म्हणून किंवा इतर काही कारण काढून खोलीत निघून गेली असं झालं नाहीसगळ्यांच्यामध्ये असताना उगीच आगाऊपणा करून मध्ये तोंड घातलं आहे असही नाहीतिची शाळा सकाळची असेआम्ही लंडन बघण्याकरता जाणार होतो तेव्हा तिची शाळेची तयारी सुरु होतीकेतकीराजू बहुधा त्यांच्या खोलीत आवरत होते आणि मी स्वयंपाकघरात डोकावलो तर ही एकटीच तयारी करत होतीमला बघून तिचा पहिला प्रश्न काका चहा करून देऊ कामला आश्चर्यच वाटलंएकतर आपल्याकडे शाळेत जाणारी आणि त्यातून मुलगी म्हणजे ती किती बिझी असतेतिला कशाला वेळ मिळत नाही म्हणून मग मीच सगळी तयारी करून ठेवते असं अष्टसात्विक भाव चेह-यावर आणत सांगणा-या आपल्याकडल्या समस्त आई वर्गाचा चेहरा नजरेसमोर तरळलानंतरच्या आयुष्यात करायचं आहेच मग आत्ता कशाला जबाबदा-या असं म्हणणारे त्या मुलींचे बापही डोळ्यासमोर आणले आणि माझ्या डोळ्यात अगदी पाणी की हो आलं!!!

 

राजूमधला तिरकस गोलंदाजीला मात्र आम्ही देवांगीचं कौतुक करायला सुरवात केली म्हणजे बहार येत असेत्यावेळची त्या दोघांची जुगलबंदी ऐकण्याचं भाग्य आम्हाला लाभलंयावेळी राजूच्या आईची प्रकर्षाने आठवण झालीत्यांच्या सहज बोलण्यातही विनोदाची झालर असेचिमटे तर बसतील पण फार दुखणार नाही अशा त-हेने त्यांची टोलंदाजी असेत्यांच्या मुंबई भेटीदरम्यान दोन तीन वेळा त्यांची भेट झाली होतीपूर्वीचं त्यांचं टोप्या उडवणं जरी तेच होतं तरी दादरच्या माधववाडीतल्या त्यांच्या घरातल्या रंगलेल्या गप्पांची सर इतक्या मोठ्या गॅपनंतर येणं तसही कठीण!

 

एका गोष्टीचा उल्लेख मात्र इथे करायलाच हवामोकळेपणा आणि स्वैर यातला फरक जाणवत होताइथे बोलताना कोणताही विषय निषिद्ध नव्हतादेवांगीच्या मैत्रिणीच्या आईच्या दुस-या की तिस-या लग्नाबद्दल आणि त्यामागच्या पैशाबद्दल तिला माहिती होतीत्यांच्या वर्गात कोणीतरी लिंगबदल केलेली व्यक्ती होती मग तिचं जेंडर अमुक सेक्स तमुक हे आपल्याकडे सहसा चर्चा होऊ न शकणारे विषय ती सहजपणे बोलत होतीया दरम्यानच राजूने तिथल्या पालक आणि मुलांची गंमत सांगितलीइथले पालक ज्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आहे ते मुलांना त्यांची मागणी पुरवता येत नाही कारण पैसे नाहीत असं कारण सांगतात आणि मुलंही इतकी बावळट की त्यावर विश्वास ठेवताततेव्हा दोघंही महान वाटायला लागतात.

 

आमच्याकडे दादरला बालमोहन विद्यामंदिर घरापासून चालत पाचव्या मिनिटावर आहेपण आई बापधापा टाकत सिग्नल तोडून आणि कित्येकवेळा नो एन्ट्री असतानाही जाऊन मुलांना त्यांच्या श्रीमंती गाडीतून शाळेत पोहोचवतातइथे ही मुलगी तीन वेळा बसरेल्वे बदलून शाळेत जातेएकटीत्यांच्या शाळेतला एक चांगला भागही यानिमित्ताने कळलाआठवीत असताना त्या मुलींना वरच्या वर्गातली त्यांच्या जवळपास रहाणारी एक मुलगी एस्कॉर्ट म्हणून सुरवातीला देतातहळूहळू स्वतंत्र प्रवासाची सवय होतेआपल्याकडे हे बांधलेपण नाहीमुलांवर जबाबदारी टाकण्यात आपण कसूर करतो कारण आपल्यामधे आत्मविश्वासाची कमतरता असतेमुलांना वेळ पडल्यावर ती पेलता आली नाही की आपण दोष मात्र त्यांच्यावर टाकतो.

 

राजूचं मुलीचं कौतुक पहायला मिळालं तसा खास वडिलांचा आवाजही ऐकायला मिळालाकुठेतरी जाणार आहोत आम्ही मैत्रिणी असं सांगितल्यावर केतकीने राजूला सांग असं सांगितलंतेव्हा Are you just informing or asking for permission? हे विचारतानाचा त्याचा आवाज खास "आपलाहोताआणि देवांगीनेही त्यावर कोणतीही नाराजी किंवा आदळआपट केली नाहीत्यातलं त्याचं एक वाक्य या संदर्भातलं नसलं तरी मला महत्वाचं वाटलं मी तिला नेहेमी सांगतोतू ब्रिटीश असलीस तरी तुझी ओळख ब्रिटीश इंडियन अशीच असणार आहे हे विसरू नकोसवडील मुलगी हे नातं मैत्रीचं करताना बापाची बाप म्हणून भूमिका हरवू न देता कशी निभावता येते याचं प्रात्यक्षिक आम्ही बघत होतो.

 

केतकीला किती हात आहेत असा प्रश्न पडावा अशी एकूण कामाची गती होतीअष्टावधान कशाला म्हणतात ते आम्हाला प्रत्यक्ष बघतात्याहीपेक्षा अनुभवता आलंघरात एखादं माणूस जास्तीचं असेल तर तारांबळ उडते आपलीइथे ती शांतपणेहे विशेषण तिला कधीच लागू पडेल असं वाटत नाहीपद्धतशीरपणे कामाचा उरक पाडत होतीउद्या सकाळी आपण केम्ब्रिजला जाणार आहोतत्याआधी सकाळी सरावणा भवनमधे भरपेट खाऊन घेऊ आणि मग श्रीशैल तिथून ट्यूब पकडून विमानतळावर जाईल आणि आपण केम्ब्रीजाकरता सुटू हे तिने जाहीर केलंअर्थात त्याआधी श्रीशैलला साउथ इंडियन आवडतं याची खात्री करून घेतलेली होतीरात्रीचा त्याचा पाहुणचार घरी व्यवस्थित झाला होतासकाळी घरी करत बसलं तर केम्ब्रिजला न्याय देता येणार नाही अशा द्विधा मन:स्थितीतला तो सुवर्णमध्य सगळ्यांच्या पथ्यावरच होता.

 

विमानाच्या वेळेच्या गणितात कुठे गफलत होऊ नये याकरता त्या वेटरकडून त्याला लवकर डिश मागवून मोकळं केलंतोसुद्धा आता युरोपात नवीन नाही पणराजूच्या भाषेततिला स्वातंत्र्य असेल तर व्यवस्थित दुपट्यात गुंडाळून पावडर तीट करून पाठवेलहे खरं करून दाखवल्यासारखं ती त्यालाचुकायला नकोम्हणून स्टेशनपर्यंत पायी पोहोचवून आली.

 

खरं तर तिने या चारपाच दिवसात केलेल्या पदार्थांची यादी मी इथे द्यायला हवीम्हणजे त्यावरून वानोळा मिळावापण तो मोह मी टाळणार आहेनाहीमाझ्याकडे जरी याची नोंद नसली तरी उत्तराकडे निश्चित मला मिळू शकेलपण हा गृहिणी धर्म झालाआम्ही जेव्हा लंडन शहरामध्ये फिरणार होतो त्या दोन दिवसातम्हणजे आमचे आम्ही असताना पहिल्या दिवशी तिने दिलेल्या खाण्याच्या पदार्थातले निम्मे आम्ही परत आणलेदुस-या दिवशी मात्र मी नकाराधिकार वापरून त्यावर मर्यादा आणली.

 

तिच्या टाइम मॅनेजमेंटला मी विशेष दाद दिली ती आम्ही लंडन ब्रिज आणि कोहिनूर हि-याच्या लोभाने कॅसल बघायला जाणार होतो तेव्हासकाळी तिला लायब्ररी कार्ड रिन्यू करायला जायचं होतंआम्हाला ती कॅसलला सोडणार होतीआम्ही गेलो तर लायब्ररी बंदआता आमचा वेळ फुकट जाईल ही भीती आणि राजू आणि केतकी दोघांचाही कटाक्ष होता की तुम्हाला बघायच्या असतील अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघाल याची आम्ही काळजी घेऊतिने गाडी वळवलीम्हणालीमी तुम्हाला एका ठिकाणी सोडतेनदीच्या खालून काढलेला बोगदा आहेतो पार केलात की ग्रीनविच.समोरच्या बाजूने लंडन छान दिसतं हे एक आणि महत्वाचं म्हणजे तिथेच prime meridian म्हणजे रॉयल ऑब्झर्व्हेटरीमधे असणारी काल्पनिक रेषा आहेती खूप लांब आहेतेवढा वेळ आपल्याकडे नसेलतर तुम्ही पलीकडे जाऊन बघा आणि बसने घरी या नाहीतर मला फोन केला तर मी न्यायला येतेआम्ही आज्ञा शिरसावंद्य मानून पलीकडे गेलोगेलो ते थेट ताडताड सरळ ऑब्झर्व्हेटरीआत जाण्यासाठी भलीमोठी रांग होतीआम्हाला अर्थात आत जाण्यासाठी वेळही नव्हतापण तिच्यामुळे आमचं ग्रीनविचला येणं झालं जें एरवी कठीण होतंयेताना जरा श्वास घ्यायला वेळ होता तेव्हा एक सुंदर बोट बघितलीमघा जाताना इतकं लक्ष दिलं नव्हतंअरेही तर कटी सार्कमाधुरीच्या लेखाने तिचा परिचय आधीच करून दिला होताआता प्रत्यक्ष दर्शनही झालंभरून पावलोहे सगळं केतकीचं क्रेडीट.

 

हे सगळं वाचल्यानंतर राजूचा कमेंट मला आत्ताच कानात घुमतो आहे.

घरभेदीच्यायलामी आमंत्रण दिलंमी आणायला गेलोआणि माझ्याबादाल एक शब्द नाही इतक्या वेळातकाय माणूस आहे हाते खरंही आहेत्याच्याविषयी सगळे गुण अवगुण माहीत असल्यावर काय बोलणार आणि सांगणार (!) हा माझ्या पुढे गहन प्रश्न आहेकॉलेजची चार वर्ष तर दिवसाचे किती तास बरोबर जायचे याचा हिशोब नसायचाआम्ही मसणात (हा उद्गार=expression) राजूचाचफिरायला जात असू. (चौपाटीवर स्मशानामागील वाळूत तेव्हा फारसं कुणी नसे त्यामुळे आम्ही चौघे (उदयसारंग तिथे बसत असू. ) तिथल्या दोन तीन तासानंतर पुनउलट रानडे रोडने कोहिनूर थिएटरच्या सिग्नलला गप्पा होतआता आम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवर इतक्या दिवसांनी एकत्र आल्यावर सुटायला होणारचमग गप्पांचे विषयही चकाट्यापासून ते गंभीर विषयापर्यंत असणं स्वाभाविकतरीही या सगळ्यात उत्तरा केतकी किंवा देवूही कंटाळली असं झालं नाही.

 

समोर काचेच्या अल्मारीत विविध आकाराचे ग्लास होतेइतक्या प्रकारचे कशाकरता हा प्रश्न उत्तराचातर वाईन काय किंवा लिकर काय पिण्याची पद्धत असतेती व्यवस्थित पाळायला हवीबिअरच्या ग्लासमध्ये व्हिस्की पितो का? (तिला काय माहीतहे मी मनातम्हणजे त्यांचे काही ठराविक संकेत आहेतमाझ्याकडे विविध प्रकारची माणसं येतातत्यांच्या आवडीप्रमाणे मी त्यांना सर्व्ह करणार असेन तर त्यांच्या संकेताचं पालन होण्याची गरज आहेतर त्याकरता हे भांडार.

 

आम्ही इतका वेळ वर सोफ्यावर बसलो होतोत्याला आता कंटाळा आला असावामधे एक बुटकं टेबल होतंमांडी घातली की छान ग्लास किंवा डिश समोर येत होतीतिथे बसून तो म्हणालाआम्ही इथेच निवांत बसतोदिवाळी किंवा नाताळला इथे सगळे जमतातआम्ही इतकी वर्ष इथे आहोतत्यामुळे ओळखी तेवढ्याचअडीनडीला उपयोगी पडणारी माणसं सगळीसण साजरा करायला एकत्र तर येणारच.

 

तर आमची एवढ्या वर्षातली ही मोठी कमाई आहेपैसा किती मिळवला आणि जोडला हे सांगण कठीण पण आमची सम्पत्ती म्हणजे ही जोडलेली माणसंकितीतरी जण नोकरीनिमित्त एकटे असतात.त्यांना अशा प्रकारच्या आधाराची जरूरही असतेआम्ही आता इतकी वर्ष इथे राहून सीझन्ड झालो आहोत त्यामुळे कोणाचाही कुठलाही प्रश्न सोडवण्याकरता आमची मदत होऊ शकते आणि आम्ही ती देण्याकरता नेहमीच तयार असतोकेतकीने कधी मुंबईत असताना हळदी कुंकू समारंभ केले नसतीलइथे मात्र अगदी साग्रसंगीत साजरे करते.

 

लंडन आणि टोरंटो अशा टोकाच्या भ्रमंतीमधून आता जरा मोकळं होत इथे घरात वेळ मिळतो आहेइथे १६ वर्षापर्यंत मुलांना घरात एकटं ठेवायला बंदी आहेइतके दिवस आई आणि दादा (राजूचे आई वडील होते त्यामुळे हा प्रश्न कधी आला नाहीआता आम्ही आमच्या वेळा त्याप्रमाणे बदलून घेतोकेतकी नोकरी करतेती पहाटे लवकर घर सोडतेदुपारी घरी असतेएकदा देवांगी शाळेत गेली की नंतर ती येण्याच्या आधी केतकी घरी पोहोचलेली असतेमाझ्या मनातली शंका पण सरकारचा नियम असला तरी तो अंमलात कसा येतोतर काही हितचिंतक आसपास असतातपोलिसांना फोन केला की काम होतंअशा वेळी मुलांना फॉस्टर होम किंवा पेरेंटकडे पाठवलं जातंऐकूनच माझ्या अंगावर काटा आलाहे म्हणजे दुखण्यापेक्षा उपाय भयंकर आहे.

 

माधववाडीत राजू होता तेव्हाही त्यांच्या घरी त्याचे वडील त्याचा भाऊ संजू हे सगळे घरातील कामांमध्ये आईला मदत करीत असतते केतकीबरोबर लग्नानंतर बदललं असेल ही शक्यता नव्हतीचआणि ते सुरु आहे हे बघून बरंही वाटत होतंसकाळी त्या दोघांचा एकूण दिवसभराचा आढावा सुरु असताना आमचा चहा होत असेत्यानंतर मग सुका मेवा बरणी समोरखाण्याचे पदार्थ तिथे असतफळं तर होतीच आणि हे सगळं होत आहे तोवर राजू स्वतः आमचे दुधाचे ग्लास भरून समोर ठेवत असेत्याबाबतीत आम्हाला जराही वाव ठेवला नाही त्या दोघांनी.

 

पहिल्या दिवशी श्रीशैलला त्याच्या घरी जाण्याकरता सोडल्यानंतर आम्ही मोकळे झालोसरावणा भवनकडून निघून आम्ही थेट केम्ब्रिज गाठले तेव्हा लंडन शहरातून जावं लागलं नव्हतं हे एक आणि रविवार असल्याने तसं शहर शांत होतंपण दुस-या दिवशी ऑक्सफर्डला जातेवेळी मात्र शहराचं खरं रुप दिसलंबरं ती मुंबई नव्हेगाडी कुठूनही कशीही पुढे काढा आणि सुटासाहेबाचं शहर आणि त्याचीच शिस्तत्यामुळे शहराबाहेर पडण्याकरता भरपूर वेळ लागलात्या प्रत्येक क्षणाचा राजूने पूर्ण उपयोग केलाआम्हालात्याच्या भाषेतसिटी फॅमिलीअराझेशन टूर घडवली जेणेकरून आम्हाला दुस-या दिवशी स्वतंत्रपणे हिंडताना जड जाऊ नये.

 

पहिल्या दिवशीची त्याची गाडी छोटी होती कारण आम्ही पाच जण जाणार होतोदुस-या दिवशी ऑक्सफर्डला जायचं आहे म्हटल्यावर त्याला श्यामलची आठवण झालीतिचा मुलगा केदारचं घर तिथेच जवळ आहेश्यामल आणि प्रकाश दोघांना विचारू या म्हणजे आपल्या सगळ्यांची मस्त एकत्र ट्रीप होईल या त-हेने त्याने त्या दोघांना विचारून ठेवलं होतं आणि त्यांनीही लगेच हो म्हटलं होतंयाकरता मग सेवन सीटर गाडी काढलीराजूच्या शारीरिक मर्यादा कुठेही त्याच्या आड येत नाहीतना त्याच्या ड्रायव्हिंगच्या ना त्याच्या उत्साहाच्यारात्री किती वाजता झोपला आहे याचा सकाळी उठण्याच्या वेळेवर परिणाम होत नाही आणि पुनदिवसभर सदैव ताजातवाना.

 

याचं श्रेय मात्र त्याच्या नियमित व्यायामाचं असणारउत्साहाने त्याने आम्हाला त्यांच्या कॅंपसमधली व्यायामशाळातिथला स्टीम बाथ वगैरे दाखवल्यानंतर मागे संथ कालक्रमणा करणारी थेम्स दाखवलीनदी घराच्या इतक्या जवळ असेल ही कल्पना नव्हतीखरोखरच त्यांच्या परसदारीच नदी आहेया व्यायामशाळेचा उपयोग दोघं करत असावेत हे त्यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं.

 

ऑक्सफर्डच्या आमच्या पूर्ण प्रवासात एकटा राजू दिवसभर गाडी चालवत होताकुठेही कंटाळा हा शब्द काही त्याच्या तोंडून निघाला नाहीरात्री आम्हाला घरी पोहोचायला बाराचा सुमार असावात्यानंतर पुन्हा रात्र साजरी झालीगप्पा नेहमीच रंगतात पण केतकीला जाणीव होतीदुस-या दिवशी आम्ही दोघच लंडनमध्ये फिरणार होतोत्याची पूर्वतयारी करून मगच आमचा दिवस मावळला.

 

दुस-या दिवशी बाहेर पडताना आमच्याबरोबर काय काय होतं हा एक विषय पण त्यात पुन्हा राजूच्या सूचना होत्याथर्मासमध्ये गरम पाणी भरण्यापूर्वी आधी गरम पाण्याने तो व्यवस्थित धुवून घ्या म्हणजे पाणी जास्त वेळ गरम राहीलकाकडी टोमाटो वेगळे दे म्हणजे पाव ओला होणार नाहीफळं देऊन ठेव चटकन कुठेही खाता येतीलया आणि अशा असंख्यआमची पिशवी छान परिपूर्ण झाली होती.

 

दोन दिवस आमचे आम्ही फिरून आल्यानंतर मग रात्री अहवाल ऐकतानाही दोघांना उत्साह असे याचं आम्हाला खूप आश्चर्य वाटलंसर्वसाधारणपणे काय मजा आली ना इतपत चौकशी करण्याची पद्धत असतेयांच्याकडे वर्षाचे बारा महिने पै पाहुणा असतो मग हा उत्साह कुठून येतोत्यांचं परफेक्ट होस्ट पण हे त्याचं उत्तरकुठेही ते ओढून ताणून नव्हतंते अगदी आतून आणि उपजत(cultivated नव्हेहोतं.

 

दुस-या दिवशी त्यांचा निरोप घेताना म्हणूनच आमचे पाय जड झाले होतेभल्या पहाटे पाचची बस पकडून आम्ही विमानतळावर जाणार होतोबसची सूचनाही राजूचीचती बसही घरापासून दूर अंतरावर पकडायची होतीत्याकरता पहाटे उठून आम्हाला माइल एंड पर्यंत सोडून उशीरा आलेल्या त्या बसमध्ये बसवून आमची पाठवणी झाली.

 

पुन्हा नक्की जायचं मनात आहेकधी योग येतो बघायचं.

 


1 comment:

  1. youtube.com Archives: youtube.com - Videoslut.cc
    youtube.com - Videoslut.cc. This was the first time I ever watched any channel or TV channel or broadcast live stream. how to convert youtube to mp3

    ReplyDelete