Monday 28 September 2020

निरीक्षणं (OBSERVATIONS) निरीक्षणं

 

या सगळ्या काळात आम्ही एक पथ्य आवर्जून पाळलं. निसर्गामध्ये ढवळाढवळ नाही. ना आम्ही कधी फोटोकरता म्हणून शेजारील पार्टिशन उघडलं ना त्यांच्या दैनंदिन व्यवहारा आड आलो. त्यांना पुरवायचं ते  संरक्षण पुरवलं इतकंच.

जेव्हा लक्षात आलं की कॅमेरा जाऊ दे पण मोबाईल हातात घेतलेला लक्षात आला तरी ते पळून जातात तेव्हा आम्ही अगदी दुरून फोटो काढायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात अर्थातच फोटो मनासारखे येण्याला मर्यादा होत्याच. प्रत्येक वेळी हे फोटो प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने काढावे लागत त्यामुळे स्पष्ट प्रतिमा मिळत नसे. आणि दरवाजातून टप्प्यात येईल इतकेच कॅमेरा टिपणार होता. पण या इतक्या नाचर्‍या, अस्थिर आणि आकाराने लहान जीवापुढे आमचं काही चालणार नव्हतं. घरट्याचा खोपा काही आम्हाला मोबाईल फोटोत पकडणे शक्य झाले नाही कारण खोलीचा (depth) अंदाज फोटोत येत नव्हता. 

आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच त्यांच्या जवळ जाण्याचा मोहही टाळला.

एक निश्चित या पक्षांची स्वच्छतेची काहीतरी व्यवस्था असावी जी आम्हाला उमगली नाही. एवढ्या दिवसांच्या वास्तव्यानंतर घरट्यातून दुर्गंधी येते आहे किंवा विष्ठा पडलेली आहे असं कधी झालं नाही.

आणि हो, एक महिन्याभरात  आम्ही रोज जोडी जोडीने येणारे पक्षी बघत आहोत. ती “तीच” जोडी आहे की आणखी कोणती ते कळायला मार्ग नाही पण आता पुन्हा जास्वंदीच्या कळ्या खाल्लेल्या असतात, घरटं आम्ही अजून तसंच ठेवलं आहे. न जाणो इतर कोणी त्याचा वापर करण्याचं ठरवलं असेल?    


 हे आमचं कुंदाचं झाड आणि हीच ती  फांदी 
                                                                   ही घरट्याची सुरवात नाही, हा शेवट नाही. हा सगळा कचरा चुकलो, साहित्य आणून टाकलं. आता ते व्यवस्थित विणून घेणार.  दोरा कोणता?  ते गुंतवळ मग कशाकरता आहेत?
पक्षांच्या वावराने आनंदलेली, फुलारून आलेली जास्वंद. खरं तर निसर्ग चक्रच  हे. परागीकरणाचं काम या पक्ष्यांनी केलं त्याचा हा परीणाम।   

पिल्लांना भरवताना 


या व्हीडिओची तारीख आहे 28 ऑगस्ट. सकाळी 8 वाजून 36 मिनिटं.   ही अशी काय वेड्यासारखी घरट्यावर , इकडे तिकडे करते आहे?  ही निरवनिरव सुरू आहे याची जराही कल्पना आम्हाला आली नाही.


 तुम्ही इतका वेळ माझ्याबद्दल ऐकत होता. प्रत्यक्षात त्याच्या मानेकडे सुंदर मोरपीशी रंग होता. कदाचित आपल्याकडील जात वेगळी असेल. .
फोटो गूगलच्या सौजन्याने

3 comments:

  1. सुंदर छायाचित्रे.

    ReplyDelete
  2. किती रे छोटा तो जीव........

    ReplyDelete
  3. फोटो आणि व्हिडिओंमुळे कथा मनावर ठसली.तुझं हे पक्षीप्रेम तुला आणि आम्हांला आणखी अनुभव देऊन जावो.

    ReplyDelete