Tuesday 30 July 2013

प्रस्तावना

आनंद अनुभव! नक्की काय म्हणायचं आहे मला? हा आनंदाचा अनुभव आहे की अनुभवाचा आनंद? खरतर दोन्ही! आनंद घ्यावा आनंद द्यावा आनंद बहरावा अशी जर वृत्ती असेल तर.....?

खूप काही गोष्टींनी आपण भारावून जातो. त्या आपल्याला आनंद देतात. ते क्षण आठवण्यात ते कोणाबरोबर तरी share करण्यात आपण धन्यता मानतो. कदाचित तिथेच थांबतो. हेच क्षण जर आणखी खूप जणांपर्यंत पोहोचले तर? जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी दावावे इथवरच्याच वचनाशी माझं नातं आहे. शहाणे करून सोडावे वगैरे उद्दिष्ट दूरान्वयानेही मनात नाही कारण हे फक्त माझ्या मनी प्रकटले ते इतुकेच आहे.

या अतिशय मर्यादित उद्देशाने आपण भेटत राहू या, या माझ्या ब्लॉगवर. सध्या तरी आठवड्यातून एकदा असं मी ठरवलं आहे. पण ते स्थूलमानाने. आज या प्रस्तावनेनंतर मी जे अनुभव तुमच्याबरोबर share करणार आहे ते प्रवासवर्णन आहे का मला सांगता येणार नाही. प्रवास हे खूपदा निमित्त असतं. आपुलाचि वाद आपणासि अशी संधी उपलब्ध होते ती प्रवासात. अशा वेळी टिपलेल्या या गोष्टी हे अनुभव! नाव काहीही द्या.


आपल्या येणा-या प्रतिक्रिया दिशादर्शक असतील. मी त्यांची कायम वाट बघत असणार आहे.

6 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Padmaja has left a new comment on your post "ऒजरव्हीलग्राटन Außervillgraten":

    पुन्हा एकदा वर्णन enjoy केलं. अधूनमधून थोडे फोटो असतील तर आणखी मजा येईल.

    तुझी सूचना पुढच्या लेखाच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन.

    ReplyDelete
  3. प्रिय आनंद
    तुझ्याकडे सिध्धहस्त लेखकाचे गुण आहेत. अनुभव हृद्य आहेत .वाचताना वाचणारा जणू तुझ्या जागी आहे असं वाटतं हेच लेखनाचं यश आहे. तेव्हा बिनधास्त लिही .तुश ब्लोग समृद्ध होवो . होईलच .
    रवि

    ReplyDelete
  4. ' पाडस ' मध्ये फ्लोरिडा मधील वर्णन आहे. त्याची ओझरती आठवण झाली.
    तुझ्या इतक्या तपशीलवार रसाळ वर्णनाबरोबर जोडीला फोटो असते तर .......
    खूप सुरेख. .
    जे आहेत ते २ फोटो इतके स्वर्गीय आहेत .पुढील वर्णन वाचायला मी उत्सुक आहे.

    ReplyDelete
  5. wonderful!!! It felt like I was there.

    ReplyDelete
  6. Anand Mama, tussi gr8 ho. I cant label it just as a travelogue or" Prawas Varnan". I had a feeling that I was physically looking at the places, only thru your eyes. Looking at the pictures was "Sonepe Suhaga". Only one slightly typical Puneri query - Why you have not written so far? I am sure u must hv, but it never saw the light of the day! Requesting Shreeshail n Uttaramami to enearth the hidden treasures since I know you will shoo away this suggestion!
    - Awaiting for more, Hemant

    ReplyDelete