मला स्वतःला या अशा लिहिण्यातून पुनः प्रवास केल्याचं सुख मिळतं.मी ते मनापासून उपभोगतो.काही वेळा त्या प्रवासादरम्यानच्या गडबडीत न जाणवलेल्या अनेक गोष्टी या पुनःप्रत्ययाच्यावेळी जाणवतात... निमित्त प्रवासाचेच आहे. पण भर मात्र प्रवासवर्णनापेक्षा प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवांवर जास्त आहे. मला आलेले अनुभव, तिथे भेटलेली किंवा पाहिलेली माणसं यांच्याविषयी लिहिताना मला आनंद मिळतो. आपण आपला अभिप्राय/ प्रतिक्रिया comment या खाली लिहिली अथवा माझ्या वैयक्तिक मेलवर पाठवली तर हा आनंद द्विगुणित होईल.
Tuesday, 30 July 2013
Austria Außervillgraten औजरव्हीलग्राटन
झेल
आम सीवरून निघताना पाय निघत
नव्हता.
ते
वाल्ड हाऊस ऑप्टीजचं काळं
घर,
त्या
मागच्या डोंगराच्या कुशीत
आणि जंगलात असलेलं,
तो
गारवा हे सारं पुनः पुनः
अनुभवावं असच तर होतं.
मग
पुनः चार तासांच्या वर २१३
कि.मी.चा
प्रवास करून आणखी वेगळं ते
काय साधणार आहोत न कळे असा
विचार जरी मनात आला तरी
श्रीशैलच्या
"दृष्टी"वर
तितकाच विश्वासही होता.
या
वेळी त्याने त्याचं कोणतही
प्लॅनिंग आम्हाला सांगितलं
नव्हतं.
नेटवरून
माहिती काढून मग त्याप्रमाणे
ती माहिती ताडून बघण्यापेक्षा
त्याच्या अनुभूतीतून मत बनवावं
हे त्याचं म्हणणं आतापर्यंतच्या
अनुभवावरून पटण्यासारखंही
होतं.
स्टेशनवर
जाताना गेल्या वेळची चूक
दुरुस्त केली.
या
डोंगराळ भागात अंतराचा हिशोब
करून भागत नाही तर श्रमांचा
करावा लागतो हा धडा आम्ही जाते
वेळी शिकलो होतोच.
आता
तर तो परिसरही इतक्या खेपांनंतर
परिचित होता.
सरळ
टॅक्सी करून स्टेशनवर पोहोचलो.
आम्हाला
दोन वेळा गाडी बदलायची होती.
प्रथम
(Schwarzach-St
Veit) श्वार्झाख
सेंट व्हाइट आणि नंतर स्पिटल
मिलिस्टेटर सी (Spittal
Milistätter See) येथे.
गाडी
नेहेमीप्रमाणेच आली वेळेवर
आणि मग तो प्रवास त्यातलं सुख
अनुभवता आलं.
डोंगरांच्या
अविरत रांगा,
न
संपणा-या,
मधेच
समांतर जाणारा रस्ता आणि
सोबतीला असंख्य झाडं आणि कधी
दूरवरून तर कधी लगटून वहाणारी
नदी.
खरतर
हे सारं अधून मधूनच दृगोचर
होणारं.
कारण
इतक्या अरुंद भागातून रेल्वेमार्ग
जात होता की झाडांच्या मधून
जे काही दृष्यमान होईल तेवढच.पण
काही गोष्टी डोळ्यांना न
दिसताही जाणवत रहातात,
त्यांचं
अस्तित्व चराचराला व्यापून
उरलेलं असतं.
ठीक
ठिकाणी डोंगरांवरून माती-दगडांचा
ढिगारा मार्गावर कोसळू नये
म्हणून जाळ्या लावल्या होत्या.
आपण
कोकण रेल्वेचं कौतुक
करतो ते निश्चित यथार्थ आहे.
पण
इथे या सगळ्या,
म्हणजे
ढासळणा-या
कड्यांप्रमाणेच समस्या असते
ती हिमवर्षावाची.
या
सगळ्याला हे लोक कसे तोंड देत
असतील?
या
सगळ्या आडबाजूच्या गाड्यांमध्ये
टॉयलेटसची उत्तम व्यवस्था
असते.
त्यातील
पाणी संपले किंवा कागदाचा
रोल संपला असे कधी होत होत
नाही.
या
व्यवस्थेची,
या
व्यवस्थापनाचे अनुकरण करणे
निश्चित आवश्यक आहे.
या
आमच्या प्रवासातील तीन
ट्रॅन्सफर्सपॆकी पहिले स्टेशन
आले-(Schwarzach-St
Veit) श्वार्झाख
सेंट व्हाइट.
पटापटा
लोक खाली उतरले.
रेल्वेचा
गाडीतील कर्मचारीही अपवाद
नव्हता.
तितक्याच
जलद गतीने सिगरेटस पेटवल्या
गेल्या.
रेल्वेगाडीत
जरी परवानगी नसली तरी प्लॅटफॉर्मवर
सिगरेट ओढायला बंदी नाही आणि
त्याचा फायदा (?)
सगळेच
घेतात.
या
निमित्ताने कचरा मात्र पुष्कळ
होतो,
अर्थात
तो साफही होतो ही गोष्ट वेगळी!
तर
आम्ही आलो ती गाडी सुटली आणि
आम्ही आमच्या पुढच्या गाडीची
वाट बघत उभे राहिलो,
शक्यतो
उन्हाचा कवडसा अंगावर येईल
या बेताने.
इथून
दुस-या
गाडीने स्पिटल मिलिस्टेटर
सी (Spittal
Milistätter See) आणि
मग त्यांची रेजिओ पकडून
औजरव्हीलग्राटनला
जाण्यासाठीचं स्टेशन सिलियन.
टिरोल
या प्रांताचा हा ग्राटन हा
भाग!
त्यातील
दरीत वसलेली औझरव्हील,
इनरव्हीलग्राटन
अशी ही गावं!
एक
गोष्ट स्पष्ट होती श्रीशैलने
खूप विचारपूर्वक हे सारं
निवडलं असणार.
इन्सब्रुक
हे शहर,
त्यानंतर
झेल आम सी हे छोटं म्हणावं असं
टाऊन.
या
आधीच्या तेथील मुक्कामात
आम्ही अल्पाइन तलाव बघितला
होता.
आता
तर चहुबाजूंनी वेढलेलं असं
आल्प्सच्या द-याखो-यातलं
अगदी छोटं गाव,
खेडं
कसं म्हणू,
बघायचं
होतं.
आम्ही
सिलियनला उतरलो तेव्हा दुपारी
छान ऊन पडलं होतं.
अगदी
छोटं स्टेशन.
हिंदी
सिनेमातला हिरो उतरतो तशा
थाटाचं.
प्लॅटफॉर्मचा
किंचित उंचवटा पण उतरताना
पाय-या
उतरून यावं लागावं असं.अर्थात
या ठिकाणीसुद्धा सगळ्या सोयी
सुविधा उपलब्ध होत्याच.
गाडी
जाताच रूळ ओलांडून बाहेर
पडलो.आम्ही
सारी मिळून ५-६
माणसं इथे उतरलो असू.
बाकीची
सगळी बाहेर असलेल्या त्यांच्या
गाड्यांमध्ये बसून पटापटा
निघून गेली.
आम्हाला
बसने पुढे जायचं होतं.
आम्ही
बाहेर आलो.
इथून
५ किलोमीटरचा बस प्रवास आणि
मग औझरव्हीलग्रॅटन.
बस
स्टॉपचा H
बाहेरच
दिसला.
टाइमटेबल
बघितलं अर्ध्या तासाचा अवधी
होता.
दूरवर
एक लाल रंगाची बस उभी होती.
पण
ती अर्थातच आमची नसणार होती.
या
बसचा रंग हिरवा पिवळा असा
काहीतरी असतो.
स्पार
नावाची ऑस्ट्रियात एक सुपर
स्टोअर चेन आहे.
तिथे
उतरायचं असं मेलमध्ये एलिजाबेथनं
म्हटलं होतं.
हिच्याच
अपार्टमेंटमधे आमचा मुक्काम
असणर होता.
अतिशय
सुस्पष्ट पण थोडक्यात तिने
लिहिलं होतं की ट्रेनने सिलियनला
उतरून बसने ५ किमी प्रवास करून
स्पारच्या स्टॉपला उतरलात
की स्पारमध्येच या.
आम्ही
तिथेच आहोत.
इथे
वेळ कसा काढायचा हा प्रश्नच
होता.
थंडी
होतीच.उन्हाच्या
दिशेने आम्ही वळलो.
एव्हढ्यात
काहीतरी समोरच्या डोंगराच्या
दिशेने तरंगताना दिसलं.
काय
असेल,
एखादा
फुगा वगैरे
असा विचार करेपर्यंत आतापर्यंत
झाडांच्या गर्दीतून ते सामोरं
आलं.
पॅराग्लायडर
होता.
छान
वा-याच्या
झोतावर झुलत त्याचा तो तांबडा
रंग त्या हिरव्या वॆभवात खुलून
दिसत होता.
इतकं
म्हणेपर्यंत एक पिवळा एक निळा
असे ठिपके दिसू लागले.
बहुधा
ग्लायडिंग क्लब असावा!
त्यांच्या
करामती बघण्यात वेळ कधी गेला
कळलं नाही.
आपल्या
भाषेत गावढ्या गावात इतकी
पॉश बस,
त्याचा
स्मार्ट ड्रायव्हर आपल्या
दृष्टीने ते अपूर्वच म्हणायला
हवे.
बसमध्येही
फार कोणी नव्हते आमच्या
व्यतिरिक्त.
बसने
आम्हाला सिलियनचं सिटी सेंटर
फिरून दाखवले आणि मग रस्त्याला
लागली.
आम्ही
उतरलो ते स्पार समोरच त्यामुळे
शोधणे बाद.
रस्त्यावरून
वळून आत आलो तर एका ६५-७०
वर्षाच्या बाईने समोर येऊन
हसत हसत स्वागत केलं आमचं.
उंची
बेताची.
स्लिम
नाही पण तिच्या वयाला शरीर
व्यवस्थित होतं.
चटपटीतपणा
तर कळत होताच वागण्यातून पण
सर्वात मोठा गुण लक्षात आला
तो भाषेचा पूल ओलांडून आमच्याकडे
पोहोचण्याचा तिचा प्रयत्न.
तिचं
स्वागत लक्षात राहील असं,
आश्वस्त
करणारं.
दुपारचे
तीन वाजले होते म्हणून दुकान
(स्पार)
उघडायला
ती निघाली होती आणि आम्ही
दिसलो म्हणून ती थांबली.
तिने
आम्हाला टू मिनिट असं म्हणून
वेलकम करून दुस-या
एका बाईकडे मोर्चा वळवला आणि
तिच्या हातात चाव्या ठेवल्या.
नंतर
तिने जे सांगितलं आणि आम्हाला
समजलं त्याप्रमाणे स्टोअर
उघडण्याची वेळ झाली होती उशीर
नको म्हणून त्या शेजारणीला
विनंती करून दुकान उघडून घेतले
आणि आमच्याकडे वळली.
आम्ही
उतरलो तो रस्ता,
त्याबाजूला
वहाणारी नदी आणि आम्ही उभे
होतो तो गावाचा भाग याच्या
विरुद्ध बाजूला रस्त्याच्या
पलीकडे डोंगरांच्या रांगा
होत्या आणि त्या डोंगरांवर
टप्प्या टप्प्यावर घरं दिसत
होती.
वरती
एक चर्च लक्ष वेधून घेत होतं.
त्याच्याकडे
तिने इशारा केला.
जर्मनमधून
ती सांगत होती,
त्या
पलीकडचं,
त्याच्या
वरच्या अंगाला तिचं घर आहे
आणि आम्ही तिथे रहाणर आहोत.
आम्ही
हो हो करत ती चावी आता देईल मग
देईल असं म्हणत आणि सामान
उचलून निघू म्हणून खोळ्ंबलो
होतो.
पुनः
टू मिनिट करत ती स्टोअरच्या
वर असलेल्या तिच्या घरात गेली.
हातात
चाव्यांचा जुडगा होता,
ती
देईल म्हणून आम्ही पुढे झालो
तर आमच्या अंगावरून पुढे जाऊन
तिने गाडीचा दरवाजा उघडून
आम्हाला इशारा केला वर डिकी
उघडून आमची बॅग उचलायला पुढे
झाली.
आम्ही
चकीतच झालो या स्वागताने.
गाडीत
बसलो आणि सफाईने तिने गाडी
रस्त्यावर घेतली.
समोरच
रस्ता होता पण तो चालणा-यांसाठी.
गाड्यांसाठी
बंद केल्याचा बोर्ड तिने
दाखवला आणि पुढे जाऊन डाव्या
बाजूला एक झोकदार वळण घेत गाडी
वरचा रस्ता चढू लागली.
साधारण
माथेरानला टॅक्सीने जाताना
जसा अनेक ठिकाणी जीव गोळा होतो
तसा अरूंद रस्ता आणि अतिशय
शार्प वळणे.
गाडीने
वळ्ण घेऊन आणखी वरचा रस्ता
घेतला आणि गिअर जॅम झाला.
शिताफीने
तिने हॅन्डब्रेक लावला पण
गिअर पडे ना.
श्रीशैलने
विचारले May
I? तिने
हसत होकार दिला आणि त्याने
जोर लावून गिअर पाडल्यावर
आम्ही निश्वास टाकला.
चर्च
मागे टाकून घरासमोर गाडी
थांबली.
घर
तसेच,
लाकडी,
त्या
पर्यावरणाशी मिळतेजुळते.
रस्त्यापासून
खाली उतरून दोन मजले.
आम्ही
मात्र रस्त्याच्या पातळीवर.
आत
आलो आणि एका पॅसेजमधील सुंदर
झुंबराने आणि त्याच्या समोरच
असलेल्या आरशामधील आम्हा
सर्वांच्या प्रतिबिंबाने
आमचे स्वागत केले.
सुंदर
असा खानदानी झुंबरांचा पिवळा
लखलखीत प्रकाश.
आमच्या
मालकिणीसारखेच घरही प्रसन्न!
खात्री
वाटावी पहिल्याच क्षणी की हा
मुक्काम अविस्मरणीय होणार!
आत
आलो.
स्वच्छ
आणि सुंदर फिटिंग्ज असलेलं
टॉयलेट.
त्यापुढे
एक बेडरूम नंतर होतं किचन आणि
तिथेच डायनिंगची व्यवस्था.
किचनला
बाल्कनीत जायला रस्ता होता.
पण
दुसरी बेडरूम कुठे?
आपली
फसवणूक झाली की काय?
म्हणताना
मेलमध्ये तर २ बेडरूम्सचा
उल्लेख होता इथे तर पूर्णविराम
दिसतो आहे.
आमच्या
चेहे-यावरचे
प्रश्नचिन्ह आता तिच्या
चेहे-यावर
उमटले.
मिश्कील
भाव नजरेत आला आणि तिने पुढे
होऊन एक दरवाजा उघडला,
दिवा
लावला आणि आम्हा दोघांकडे
बोट करून म्हणाली ही तुमच्यासाठी.
उतरत
जाणरा वळणदार लाकडी सुंदर
पॉलिश असलेला जिना,
खाली
ड्बलबेड,
कपाटं
असा सुसज्ज.
कल्पनातीत
कशाला म्हणतात ते कळलं.
जर्मनमधूनच
आम्हाला तिने सांगितलं मी
त्या दुकानाच्या वर (स्पार)
रहाते,
इथे
खाली माझी मुलगी व तिचा नवरा
रहातात काही हवं असेल तर
निःसंकोचपणे सांगा.
इंग्रजीत
ज्याला infectious
म्हणतात
तसा तिचा तो उत्साह आणि जोष
होता.
जशी
आली तशीच ती बाहेर पडली.
गाडी
झोकात वळवून दिसेनाशी होइपर्यंत
आम्ही बाहेर उभे होतो.
तोच
उत्साह घेऊन आम्ही मग भवताल
बघायला सुरवात केली.
चर्च
अगदी जवळ जरी असले तरी ते मागील
बाजूला,
त्यामुळे
दृष्टीच्या टप्प्यात नव्हते.
खाली
जाणारा रस्ता घराच्या खालच्या
दोन मजल्यांकडे नेत होता.
त्याच्या
खालच्या बाजूला मधे रस्ता,
त्याला
लागून असलेल्या घरातील तीन
मुलांचा किलबिलाट आमच्यापर्यंत
पोहोचत होता.
छान
खेळत होती ती त्यांच्या अंगणात.
वरच्या
अंगाला लागून डोंगर त्यावरील
तीन चार टप्प्यात घरे दिसत
होती पण दाट झाडीतून अंदाजच
लावता येत होता.
दूर
खाली वहाता रस्ता,
त्याला
लागून दुथडी भरून उत्साहात
वहाणारी नदी,
तिचं
ते फेसाळ पाणी,
त्या
पाण्याची स्पष्ट ऎकू येणारी
गाज.
त्या
नदी पलीकडची घरं त्यांना वेढून
असणारी हिरवीगार लॉन्स,
दाट
झाडं,
उंच
उंच वाढलेली,
आणि
पुनः वर वर डोंगरांच्या कमानी.
थोडी
नजर वर केली की आमचा सखा आल्प्सची
खुणावणारी बर्फाच्छादित
शिखरं.
पण
आता झेल आम सीमुळे ती तशी परिचित
झाली होती.
निदान
प्रथमदर्शनाचा,
भेटीचा
तो उन्मादक आनंद त्यात नव्हता.
आता
ती आनंददायी पुनर्भेट होती.
आम्ही
निवांत बाल्कनीत बसलोही असतो
पण भन्नाट वा-याने
तिथून उठवलं.
आत
येऊन चहा घेऊन काहीतरी खाऊन
बाहेर पडायचं ठरवलं.
तसा
या हवेतला उत्साहच असा की थकवा
कसा तो जाणवूच नये.
आम्ही
बाहेर पडलो.
चर्चच्या
ठिकाणी असलेल्या पाय-या
बघितल्या,
म्हणजे
शॉर्टकट असेल म्हणून उतरून
गेलो.
आणखी
एक रस्ता की खाली रस्त्यावर.
रस्त्यालगतच्या
घरांच्या अंगणात झाडांच्या
बुंध्याशी असंख्य शोभेच्या
वस्तू होत्या.
प्रत्येक
अंगणात खुर्च्या तर होत्याच
होत्या,
कधीमधी
पडणा-या
उन्हाचा आस्वाद घ्यायला,
आपल्याकडे
बायका छान कडक उन्ह आहेत,
वाळवणं
करायला हवीत,
ऊन
फुकट कशाला घालवा म्हणतात
त्याची आठवण आली.
रस्ता
ओलांडून ते स्पारचं सुपर
स्टोअर आणि पुढे गाव.
जरा
हिंडून यावं म्हणून पुढे गेलो
तर पाच मिनिटात बाजूने असणारा
फुटपाथ नाहीसा झाला.
आणि
रस्त्यावरून चालण्याची इथे
पद्धत नाही कारण वेगात येणारी
वहाने.
तिथेच
एक छान चौक
होता.
कार्यक्रम
होत असावेत बहुधा.
बोर्डावर
नोटिस होती त्यातील फक्त
Mutter Tag
(मातृदिन)
आणि
तारीख एवढे शब्द कळले.
तिथेच
एक बोर्ड होता.
पायवाटेने
जाणा-यांसाठी.
त्या
वाटा डोंगरातील आत आत जाणा-या.
आज
आता ते नको वाटले म्हणून परत
फिरलो.
नदीच्या
काठाने जाणारा रस्ता.
मात्र
तिच्या दुस-या
अंगाला पादचा-यांसाठी
आणि सायकलसाठी वेगळा रस्ता
होता.
त्यावरून
रमत गमत,
दाट
झाडं बघत कापलेल्या लॉनचा
गवताचा वास हुंगत,
शेणाच्या
रचलेल्या थरातून आपल्या
गावाकडे परिचित असणारा वास
घेत दूरवर गेलो.
तिथे
जरा उंचावर एक सुंदर बाक होते.
बर्फाच्छादित
शिखरं आणि नदी दोन्ही दृष्टिच्या
टप्प्यात होती.
वेळ
कसा गेला कळलेच नाही.
परतलो
तेव्हा संध्याकाळचे आठ वाजले
होते पण सूर्यनारायण असल्याने
अंधार नव्हता झाला.
घरी
येण्यापूर्वी स्पारमधून
सगळ्या आवश्यक गरजेच्या वस्तू
घेतल्या आणि पोटा पाण्याच्या
व्यवस्थेला सुरवात केली.
आजचा
दिवस खूप छान गेल्याच्या
समाधानात घरी परतलो दार लावून
आत आलो आणि बेल वाजली.
दरवाज्याच्या
बेलचा उपयोग करण्याची वेळ
येण्याचा तसा काहीच प्रश्न
नव्हता.
विचारात
दार उघडले तर समोर एक पंचवीस
ते तीसच्या मधली हसतमुख मुलगी
उभी.
मी
एलिझाबेथ.
तिने
ओळख सांगितली.
ही
त्या बाईंची मुलगी जी खालच्या
मजल्यावर रहाते.
व्यवस्थित
इंग्रजीत काही त्रास नाही
ना?
काही
लागलं तर मी खालीच आहे कधीही
सांगा असं म्हणून ती वळून
गेली.
मघाच्या
बाई दिसायला छान होत्या.
ही
त्या मानाने तशी डावी पण तोच
उत्साह,
तोच,
दुस-याला
आश्वस्त करणारा welcoming
attitude! या
गोष्टी आपल्याकडे इतक्या
अभावाने का असतात किंवा इथल्या
मातीत किंवा पाण्यात असं काय
आहे जे यांना असं घडवतं हा
विचार मनात घोळवत आम्ही आत
वळलो.
या
अपार्टमेंटमधली मला जाणवलेली
गोष्ट म्हणजे त्यांनी तेथील
कपाटांमध्येच डझनाच्या हिशोबात
टॉवेल्स नॅपकिन्स टॉयलेट
टिश्यूज एवढच कशाला भांड्यांचा
साबण हॅन्डवॉश वगॆरे उपयोगी
वस्तू सुद्धा साठवणीच्या
हिशोबात ठेवल्या होत्या.
माणसाच्या
चांगुलपणावर किती विश्वास
आहे.
आपल्याकडे
आपण ठेवत नाही हे एक,
पण
चहाकरता ठेवलेल्या साखरेच्या
पुड्या जर आपल्या घरी जात
असतील तर या गोष्टींची काय
मात?
कोण
धजावेल इतक्या वस्तू ठेवायला?
दुसरा
दिवस काहीसा ढगाळ!
आज
वातावरण असं असणार की काय या
भीतीने धास्तावलो.
या
हवेत ढगाळ,
काहीसं
ग्लूमी वाटणारं वातावरण नको
होतं.
स्वच्छ
सूर्यप्रकाशात फिरण्याचा
उत्साह असतो.
मनात
शंका न ठेवता आम्ही आवरून
बाहेर पडलो तेव्हा वातावरण
पुनः निरभ्र झाले होते.
आज
हायकिंगचा अनुभव घ्यायचा.
झेल
आम सीला जरी गेलो तरी पाऊलवाटेने
इथे सरळ चढायला सुरवात करायची
बघू तरी किती दम टिकतो ते.
तशी
माती घट्ट होती त्यामुळे
सरकण्या किंवा घसरण्याचा
प्रश्न आला नाही पण निश्चितपणे
हे जड जाते आहे हे तासाभरात
मान्य करून मळल्या वाटेवरून
वर चढायला सुरवात केली.
ही
गावं,
इन्सब्रुक
किंवा झेल आम सी प्रमाणेच
हिवाळ्यात गजबजून जातात.
तो
यांचा खरा सीझन.
सगळे
स्कीइंगचा आनंद लुटायला येतात.
मग
या छोट्याशा गावातली रहाण्याची
व्यवस्था अपुरी पडते आणि भाव
वाढतात.
आमचा
आताचा वसंत ऋतुतला प्रवास
म्हणजे तसा ऑफ सीझनच त्यामुळे
गर्दी शून्य होती.
इथे
येताना एक गोष्ट मात्र जाणवली
की अपार्टमेंटमध्ये रहाणं
निश्चित सोयीच आहे.
सगळ्या
सोयी तर असतातच पण आमच्यासारख्यां
शाकाहारी लोकांना आपल्याला
हवं ते करून खाण्याचं सुख
मिळतं.
वरच्या
बाजूला स्कीइंग स्टेशन होतं.
त्याच्या
आसपासची कापलेली झाडं नीट
एका आकारात कापून ठेवून रचलेली
होती.
नवीन
लावण्यासाठी आणलेली झाडं
लावणीची वाट बघत होती.
लॉन
नव्याने लावल्यासारखे वाटले.
तिथे
शेणाचा वास आला म्हणून बघितले
तर खरोखरच जमीन शेण घालून तयार
केलेली होती.
पिवळ्या
रानफुलांचा बहर सर्वत्र दिसत
होता.
इग्लस
पासून आम्ही इतक्या ठिकाणी
हा गालिचा बघत आलो होतो,
त्यातलं
नाविन्य आता ओसरलं असलं तरी
प्रत्येक ठिकाणची फुलं मात्र
वेगळी आहेत हे लक्षात आलं
होतं.
अवघड
मार्गाने चढाई केल्यावरचा
आनंद धापा टाकण्यात व्यक्त
करीत थोडी विश्रांती घेतली.
वरच्या
लेव्हलवर गाडीरस्ता दिसत
होता.
पुनः
हायकिंग करत रस्त्यावर आलो
आणि रस्त्याने उतरू लागलो.
खरतर
तसेच खाली उतरून जाऊ आणि सामान
आणू असा विचार केला होता पण
कंटाळा आला म्हणून घरी जाऊन
खाऊन पिऊन उतरू असा विचार करून
निवांत दुपारी ४च्या नंतर
आम्ही निघालो.
गावात
खाली आलो तर स्पार बंद.
उघडायची
वेळ बघितली तर दुपारी तीनची.
आठवड्याच्या
सगळ्याच वारी तीच वेळ!
काहीतरी
गडबड आहे म्हणत तसेच पुढे गेलो
तर इतर एक दोन दुकानं पण बंद
दिसली.
मागे
फिरलो आणि पुनः स्पारच्या
वेळा बघत होतो तोवर वरून एक
गृहस्थ खाली आले.
पुढे
येऊन त्यांनी सुरवात केली "
I think you are our guests. I am -------." ~आज
ऑस्ट्रियात सुट्टी असते
त्यामुळे दुकान बंद आहे पण
तुम्हाला काही हवे असेल ते
मी दुकान उघडून देऊ शकतो कारण
चाव्या माझ्याकडे आहेत.
(If you need something , I have the keys and I can open it for you)
डोळ्यामधली
मिश्कील छटा,
तोच
welcoming
attitude आणि
तोच उत्साह आम्हाला त्या
सत्तरीतील माणसातही दिसला.
त्यांनी
दुकान उघडेपर्यंत बाईसुद्धा
आल्या.
व्हेजिटेरिअन
म्हटल्यावर बुवांनी बाईंशी
चर्चा करून काही पॅकेट्स
सुचवली.
आम्ही
घेतलेलं एक पॅकेट बिलकरतेवेळी
बाईंनी बाजूला ठेवून दिलं.
खुणेनेच
त्या म्हणाल्या वरती ओव्हन
नाही त्यामुळे उपयोग नाही.
भाषा
हे माध्यमच असते हे पटले.
भाव
खरा.
भाषा
कळेल नाही भाव पोहोचला की सगळं
सुलभ होऊन जातं.
आम्ही
बुवांबरोबर इंग्रजीत गप्पा
मारत होतो.
त्यातला
मथितार्थ ते बाईंना सांगत
होते.
थोड्या
गप्पांनंतर त्यांना विचारले
की उद्या आम्हाला स्टेशनवर
जायचं आहे.
येताना
आम्ही बसने आलो पण सामान घेऊन
उतरून येऊन बस पकडायची नको
वाटते तर इथे टॅक्सी मिळेल
का?
बुवा
उत्साही OK
I will be your taxi tomorrow. tell me the time. आम्ही
गाडीची वेळ कुठे बघितली होती
त्यांचा फोन नंबर घेतला आणि
कळवतो सांगितलं.
घरी
येऊन गाडीच्या वेळेवर त्यांना
दुपारी साडेबाराच्या सुमाराला
या असे फोनवर सांगितले.
थोड्या
वेळाने एलिझाबेथ आली त्यांचा
निरोप घेऊन की साडे दहाला
तुम्हाला सोडलं स्टेशनला तर
चालेल का?
कारण
वडिलांना कामासाठी दुस-या
गावी जायचे आहे.
त्यामुळे
साडेबारा ही वेळ अडचणीची होइल.
आम्हाला
काहीच प्रश्न नव्हता.
त्यांना
हो म्हणून आम्ही स्वस्थ झालो.
दुसरा
दिवस उजाडला.
आम्ही
जाणार म्हणून सूर्यदेव रागावले
होते.
अखंड
पाऊस पडत होता.
नशीबाने
आमच्याकडे दोन छत्र्या होत्या.
दहा
वाजून वीस मिनिटांनी गाडी
दारासमोर उभी करून ते गृहस्थ
तरातरा खाली गेले,
मुलीच्या
घरी.
आम्हाला
कळेना.
आम्ही
सामान घेऊन बाहेर येईपर्यंत
ते खालून छत्री घेऊन आले होते
आम्ही भिजू नये म्हणून.
सामान
गाडीत टाकायला पुनः हे पुढे.
त्यांना
सांगितलं आणि सामान डिकीत
ठेवून घराचा निरोप घेतला.
या
घराने आम्हाला खूप समाधान
दिलं या मुक्कामात.
निघताना
श्रीशैलने
त्यांच्या टिरोल प्रांताची
प्रसिद्ध अशी व्हाइट वाइनची
बाटली आणि thanks
note टेबलावर
ठेवून दिली होती कृतज्ञता
म्हणून.
गाडी
निघाली.
यांचे
बोलणे सुरू झाले.
कुठून
आलात किती दिवस फिरणार,
काय
करता या चौकशा
झाल्या.
आम्ही
त्यांच्या सगळ्यांच्याच
आनंदी उत्साही वृत्तीचं
मनापासून कौतुक
केलं.
त्यांची
चौकशी
केली तेव्हा ते म्हणाले मी
मूळ जर्मनीतला.
इथे
आलो ही आवडली लग्न केलं.
मला
हे शांत,
निर्भर
आयुष्य खूप आवडतं.
इथे
एन्जॉयमेंट नाही.
We create our own enjoyment but we are happy.
इथे
मुबलक पाणी आहे.
मी
आफ्रिकेत होतो काही वर्ष.
पाण्याकरता
मैलोनमॆल
जावं लागतं हे मला माहीत आहे.
इथे
खरोखरच सुख आहे.
गंमत
वाटली.
सुखाच्या
कल्पना किती वेगळ्या असू
शकतात!.
सिलिअन
आलं.
तीन
दिवसात या घराशी,
या
माणसांशी बंध जुळल्यासारखे
वाटत होते.
अर्थात
ते तेवढ्यापुरते असतात हे
आम्हीही जाणून होतोच पण वाईट
हे वाटणारच ना.
प्रस्तावना
आनंद
अनुभव!
नक्की
काय म्हणायचं आहे मला?
हा
आनंदाचा अनुभव आहे की अनुभवाचा
आनंद?
खरतर
दोन्ही!
आनंद
घ्यावा आनंद द्यावा आनंद
बहरावा अशी जर वृत्ती असेल
तर.....?
खूप
काही गोष्टींनी आपण भारावून
जातो.
त्या
आपल्याला आनंद देतात.
ते
क्षण आठवण्यात ते कोणाबरोबर
तरी share
करण्यात
आपण धन्यता मानतो.
कदाचित
तिथेच थांबतो.
हेच
क्षण जर आणखी खूप जणांपर्यंत
पोहोचले तर?
जे
जे आपणासी ठावे ते ते इतरांसी
दावावे इथवरच्याच वचनाशी
माझं नातं आहे.
शहाणे
करून सोडावे वगैरे
उद्दिष्ट दूरान्वयानेही मनात
नाही कारण हे फक्त माझ्या मनी
प्रकटले ते इतुकेच आहे.
या
अतिशय मर्यादित उद्देशाने
आपण भेटत राहू या,
या
माझ्या ब्लॉगवर.
सध्या
तरी आठवड्यातून एकदा असं मी
ठरवलं आहे.
पण
ते स्थूलमानाने.
आज
या प्रस्तावनेनंतर मी जे अनुभव
तुमच्याबरोबर share
करणार
आहे ते प्रवासवर्णन आहे का
मला सांगता येणार नाही.
प्रवास
हे खूपदा निमित्त असतं.
आपुलाचि
वाद आपणासि अशी संधी उपलब्ध
होते ती प्रवासात.
अशा
वेळी टिपलेल्या या गोष्टी हे
अनुभव!
नाव
काहीही द्या.
आपल्या
येणा-या
प्रतिक्रिया दिशादर्शक असतील.
मी
त्यांची कायम वाट बघत असणार
आहे.
Subscribe to:
Posts (Atom)