Wednesday 31 December 2014



येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी समाधानाचे जावो ही शुभकामना !


Monday 29 December 2014

ITALY FIRENZE (FLORENCE) I

इटली फिरेन्झ (फ्लोरेन्स) (१)

रोममधला मुक्काम संपणार याचं वाईट वाटत असतानाच श्रीशैलच्या आवडत्या टस्कनीला भेट द्यायची उत्सुकता मनात होती. मुंबईच्या माणसाला ट्रेनचं सान्निध्य असल्यावर एक निवांतपणा असतो. सकाळी ९.२०ची गाडी आहे. वेळेत निघा. हाय स्पीडचं रिझर्वेशन फक्त त्याच गाडी पुरतं असतं. नाहीतर सगळीकडे थांबत जावं लागेल इत्यादी सूचनांचा कल्लोळ मनात होता. पण एकतर आम्ही रोमच्या फुरिओ कामिलो स्टेशनच्या अगदी जवळ रहात होतो आणि तसं हे रोमच्या टर्मिनीपासूनचं सहावं स्टेशन. त्यामुळे वेळेचं अजिबात दडपण वगैरे नव्हतं. निवांतपणे निघालो आणि टर्मिनीला आलो. तिथल्या भूमिगत भूलभुलैय्यात मात्र क्षणभर का होईना गरगरायला झालं. पण हाती वेळ होता त्यामुळे फारसं काही बिघडलं नाही.

गाडी इंडिकेटरवर लागण्याची वाट बघत होतो. काही मुली, बायका गळ्यात कंडक्टर टाइप पर्स तिरकी अडकवलेली, लगबगीने हिंडत होत्या. कोणाला काही मदत हवी का ते विचारत होत्या. खरतर ट्रेन इतालिया या कंपनीच्या काऊंटर्सवर व्यवस्थित माहिती मिळत असता या बायका अशा का फिरतात आणि त्या स्वतःहून विचारत असता लोकं मात्र त्यांच्याकडे का दुर्लक्ष करतात ते कळे ना. आम्हाला मदत नको होती त्यामुळे आपल्याला काय त्याचं म्हणून दुर्लक्ष केलं.

आमची गाडी लागली आणि आम्ही निवांत जाऊन बसलो. टस्कनी हा इटलीचा समृद्ध प्रदेश. ऑलिव्ह आणि द्राक्ष यांच्या बागा वाटेत जागोजाग दिसत होत्या. एकूण संपन्नतेची लक्षणं सांगावी लागत नाहीत हे खरं.

सांता मारिया फिरेन्झ हे शेवटचं स्टेशन त्यामुळे उतरण्याची लगबग नव्हती. फिरेन्झ हे इटलीतील या शहराचं प्रचलित नाव. सांता मारिया हा त्या गावाचा संत. इटलीत असा प्रत्येक गावाचा एक एक संत असतो. त्याच्या नावाने चर्च असतेइथे हे चर्च अगदी स्टेशनजवळ म्हणून कदाचित त्याचे नाव स्टेशनला जोडले असावे.

आम्हाला बाहेर येऊन बस पकडायची होती. स्टॉपचं नाव Stazione Pensillina, तो कुठे असेल त्याचा अंदाज घेत उभा होतो तेव्हा आधी तो बुक स्टॉल दिसला. इटलीत बस, मेट्रो इ तिकिटं या अशा स्टॉलवर मिळतात, ती घेतली आणि स्टॉप शोधायला लागलो. थोडं पुढे गेल्यावर तिथे ट्रेन इतालियाचाच एक माणूस गळ्यात कंडक्टरची असते तशी पिशवी लटकावून उभा होता. आम्ही हातातला कागद त्याला दाखवला. त्याने इटालिअनमधे आम्हाला काहीतरी सांगितले आणि तोरे गल्लीला ("Torre Galli") जाणा-या बसचा ६ नंबर इंग्रजीत सांगितला. त्याच स्टॉपवर बस येणार होती आणि ती पुढच्या ११ मिनिटात येईल असं स्टॉपवरचा इंडिकेटर सांगत होता.

बस आली. सर्वसाधारणपणे बसमध्ये इंडिकेटर असतो आणि अनाउन्समेंटही त्यामुळे ऐकून समजले नाही तरी समोर बघून कळतं. पण इटलीचा अपवादाने नियम सिद्ध करण्यावर गाढ विश्वास आहे त्यामुळे इंडिकेटर असला तरी तो ते चालू ठेवण्याचे कष्ट सर्वसामान्यपणे घेत नाहीत. कानात प्राण आणून मग त्या घोषणा ऐकणं आलं. आमच्या यजमानांच्या सूचनांप्रमाणे साधारण ६ मिनिटांनी येणा-या Fonderia 01 इथे आम्हाला उतरायचं होतं. बसने नदी ओलांडली आणि ती उजवीकडे वळली. आमचे कान अनाउन्समेंटकडे आणि डोळे घड्याळाकडे होते. सुदैवाने आम्हाला ती अनाउन्समेंट कळली आणि आम्ही उतरलो. तसा पुढचा रस्ताही फारसा कठीण नव्हता. निवांत वाटणरी गल्ली पार करून पुनः लागलेल्या मोठ्या रस्त्यावरचं ते २६/a नंबर असलेलं घर, अपार्टमेंट होतं. आम्ही पुढे होणार इतक्यात मागून एक अतिशय हॅन्डसम, उंच, गोरा, धिप्पाड तरूण आला आणि त्याने हॅलो केलं. मी डॅनिअल, आताच जरा प्रोव्हिजन्स आणायला खाली उतरलो होतो. Welcome in our Tuscany. दुस-या मजल्यावरचा त्यांचा तीन बेडरूमचा फ्लॅट. त्यातील एक त्याने आम्हाला दिली होती. आणखी एकात रहाणारा कोणी मंगोल चेहे-याचा इसम नंतर आम्हाला दिसला होता.

डॅनियल मृदू व्यक्तिमत्वाचा, व्यवस्थित इंग्रजी बोलत होता. श्रीशैलबरोबरच्या पत्रव्यवहाराचा उल्लेख करून त्याने आमची चौकशी केली आम्ही मुंबईत कुठे असतो तिथे B & B म्हणजे Bed and Breakfast ची सोय कशी असते ते विचारलं. फारशी नसावी या माझ्या vague comment वर उतारा म्हणून त्याने साइटवर जाऊन किती ठिकाणी मुंबईत अशी ओपनिंग्ज आहेत ते दाखवलं. त्यापुढे जाऊन त्यातली conveniently located किती आहेत याचीही चौकशी त्याने केली. मला गंमत वाटली. या बोलण्या दरम्यान आमचे पासपोर्ट घेऊन नोंदी करणं, आमच्याकडून सिटी टॅक्सचे पैसे घेऊन त्याची पावती देणं वगैरे सर्व त्याने पार पाडलं होतं. तुम्हाला चहा किंवा कॉफी आवडेल का असं विचारल्याबरोबर माझं हो आलं. त्यांच्याकडची इटालिअन कॉफी चांगली असते हा माझा अनुभव. त्याने दूध, साखर कशी हवी ते विचारलं आणि कपात दूध ओतलं. आम्ही आपले शांतपणे त्याच्या त्या हालचाली बघत तिथेच डायनिंग टेबलवर बसलो होतो. कॉफी कपात ओतून झाली आणि नंतर तो म्हणाला, इथे साधारणपणे आपल्याला किती दूध हवे ते प्रत्येकाने ओतणा-याला सांगायचे असते, नाहीतर ओतणारा माणूस थांब सांगेपर्यंत थांबत नाही. शिकलेला हा नवा धडा आम्ही नोंद करून ठेवला.

आतून झाडू वगैरे घेऊन एक किरकोळ, बुटकी, सामान्य दिसणारी बाई बाहेर आली. ही क्लारा, याने तिचं नाव सांगून ओळख करून दिली. कदाचित कामाला असावी त्याच्याकडे. आम्ही सामान घेऊन आमच्या खोलीत गेलो तेव्हा पाठोपाठ तो आला. दरवाजे खिडक्या कशा उघडतात, बंद कशा करायच्या हे सांगितलं. शॉवरविषयीच्या सूचना दिल्या आणि शेवटी महत्वाचं म्हणजे टॉयलेट. मेकॅनिकल आहे त्यामुळे जर त्यात टॉयलेट पेपर व्यतिरिक्त काही टाकलं तर ते ब्लॉक होतं हे सांगायला तो विसरला नाही. या सूचना लिहिलेल्याही होत्या पण त्याच्या अनुभवाप्रमाणे नंतर बोलण्यापेक्षा आधी सांगावं म्हणजे समोरचा माणूसही काळजी घेतो असं असावं.

हा आमचा टस्कनी प्रांत अतिशय सुंदर आहे. मला माहित आहे की तुमच्याकडे एकच दिवस आहे आणि त्यातही तुम्ही पिसाला जाऊन येण्याचही ठरवलं आहे. तरीही इथे पुनः कधी आलात तर नक्की खूप वेळ घेऊन या. जरी आम्ही इटलीचा भाग असलो तरी आम्ही खूप वेगळे आहोत. आमचं कल्चर, आमची भाषा, आमचं खाणं हे इतर भागांपेक्षा खूप वेगळं आहे. इथलं निसर्गसौन्दर्यही खास असं आहे. हे सारं बोलताना तो मला सेल्स टॉक देत नव्हता, तर ते त्याच्या आतून येत होतं.

हा गृहस्थ चांगला शिकलेला आणि हे काय करतो आहे असा प्रश्न मनात होता पण सभ्यपणा मला ते विचारू देत नव्हता. कदाचित माझ्या मनातलं ते वाचूनच की काय त्याने आपणहून सांगितलं असावं. हा फ्लॅट माझा आणि माझ्या बहिणीचा. माझे वडील असेपर्यंत ही तुम्हाला दिलेली, त्यांची बेडरूम होती आणि या समोरच्या दोन माझी आणि बहिणीची. तिथे कॉमन टॉयलेट आहे. वडिलांनंतर आम्ही दोघांनी ठरवलं एकाने नोकरी करायची आणि एकाने हे B & B सांभाळायचे. म्हणजे घराचा उपयोगही होइल. ती नोकरी करते, मी घरून काम करतो. आणि ही तुम्हाला दिलेली व आमच्या शेजारची बेडरूम भाड्याने देतो. इथे वर्षभर टूरिस्ट येतात आणि त्यांना हॉटेलपेक्षा या व्यवस्था आवडतात. मी सुद्धा हे छान एन्जॉय करतो आहे. हे बोलणं होत असताना क्लारा आता गॅसवर काहीतरी ठेवून स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली दिसली. शिराळं दिसलं म्हणून त्याला त्याचं इटालिअन नाव विचारलं तर म्हणाला ज़ुकिनी (zucchini) . कदाचित आमच्या डोळ्यातलं क्लाराविषयीचं प्रश्नचिन्ह वाचून की काय त्याने खुलासा केला, ही त्याची मैत्रीण, इथेच त्याच्याबरोबर रहाते आणि त्याला मदतही करते! एवढं सगळं झाल्यावर तो त्याच्या कामाला वळला.

तसा आमचा प्रवास सुखाचा झाला होता. कॉफी घेऊन लगेच निघणं आवश्यक होतं. आम्ही थोडसं हट्टानेच इटलीच्या श्रीशैलने तयार केलेल्या मूळ प्लॅनमध्ये दोन गोष्टी आमच्या मनाप्रमाणे  घुसडल्या होत्या. त्यातली पहिली होती काप्री- ब्लू ग्रोट्टो, जिच्यामुळे आम्हाला मूळ रिझर्वेशनमध्ये काही फरक करावा लागला नव्हता. पण फ्लोरेन्सला ठेवलेल्या एका दिवसातच, आम्ही पिसाला जाणार म्हटल्यावर, मग  दुस-या दिवशीच्या सकाळच्या व्हेनिसला जाण्यावर प्रश्नचिन्ह आलं. शेवटी श्रीशैलला ट्रेन रिझर्व्हेशन बदलणं भाग पडलं. सकाळच्या ९.३० च्या व्हेनिसच्या गाडीची तिकिटं बदलून मग दुपारी अडीचच्या गाडीचं रिझर्वेशन केलं जेणेकरून आम्हाला फ्लोरेन्स बघायलाही पुरेसा वेळ मिळावा.


त्यामुळे आता आम्हाला ताबडतोब निघून स्टेशनवर पिसाला जाणारी गाडी पकडणं भाग होतं.

                                                                      भाग दुसरा पुढील मंगळवारी


Monday 22 December 2014

ITALY VATICAN IV


व्हॅटिकन (४)
अजून निम्मा जिना उतरणे बाकी होते. पण आता आम्ही खूप प्रसन्न होतोअसं कोणी भेटलं की खूप उत्साह येतो. खाली आलो आणि बघितलं तर आता मात्र बॅसिलिकाला आत जाण्याकरता फारशी गर्दी नव्हती. तो पिएता पुनः बघू या का? तसाही हातात वेळ होता

पुनः बॅसिलिकामधे आत जाण्यासाठी रांगेत उभे राहिलो. इतका वेळ लक्षात न आलेली गोष्ट आता उलगडली. एका बाईला आत प्रवेश नाही म्हणून दारातच अडवलं. ती कारण विचारत होती तेव्हा त्या माणसाने सगळ्या ठिकाणी लिहिलेल्या एका सूचनेकडे तिचं लक्ष वेधलं. You should be properly dressed. ती त्यांच्या दृष्टीने व्यवस्थित म्हणजे हाफ पॅन्ट आणि टी शर्ट्मध्ये होती. अशा लोकांसाठी मग धंदेवाल्यांनी बाहेर सोय ठेवलेली आहे. सकाळी खूप मुली/ बायका इथे उन्हाळा असल्याकारणाने आखूड कपड्यात आल्या होत्या. त्यांनी रांगेत असतानाच अंगावर ओढणीसारखं किंवा टॉवेल ओढून घेतला होता, आणि तो त्यांच्या  proper dress च्या व्याख्येत बसत  होता.

पिएताच्या पुनर्दर्शनातही आम्हाला त्या शिल्पाचं सामर्थ्य दृष्टोत्पत्तीस आलं नाही तेव्हा आम्ही तो नाद सोडून दिला. एक चक्कर मारू या पुनः म्हणून तीनही कॉरिडॉर्स हिंडताना जिना दिसला. वर जावं की नाही या विचारात होतो पण म्हटलं जाऊन तर बघू. वर गेलो पण डोमची मजा इथे नव्हती. तसाही बॅसिलिकाचा तो घुमट हा बंद होता. वरून फक्त खाली फिरणारी माणसं दिसत होती. वर काही चित्र होती भिंतींवर पण त्यात काही वैशिष्ट्य म्हणावं असं नव्हतं. मुकाट्याने खाली उतरलो.



आधी म्हटलं त्याप्रमाणे  व्हॅटिकन हे स्वतंत्र राष्ट्र आहे. अर्थात सगळ्या व्यवस्था त्यांच्या स्वतःच्या आहेत. इथे त्यांचं पोस्टही आहे. प्रत्येकजण आत जाऊन स्वतःचा पत्ता लिहिलेलं पाकीट पोस्टात टाकताना दिसत होता. फक्त गंमत की भक्तीभाव? पोपच जाणे!

बाहेर आलो. कुठे जायचं? परतीच्या मार्गात ती नदी, तो किल्ला सगळं खुणावत होतं. तसा आता वेळही हाताशी होताच त्यामुळे ती काळजी नव्हती. डोमवरून बघताना दिशांचा साधारण अंदाज (!) आला होता त्याप्रमाणे निघालो. पूल बघितला होता त्याच्या खालून जाताना बाजूने वेगात जाणा-या गाड्या आणि अरूंद पायवाट यामुळे जरासं भीतीदायक म्हणण्यापेक्षा दडपण आल्यासारखं वाटत होतं. पुढे गेलो आणि नदी सामोरी आली. पाणी काही स्वच्छ म्हणावं असं नव्हतं पण आमचं लक्ष त्यापेक्षा त्यात तयार झालेल्या एका छोट्या बेटाने वेधून घेतलं. एकच झाड, विस्तार असलेलं आणि थोडी मोकळी जागा भोवताली. सुबक साजरं असं ते बेट पाहून मन प्रसन्न होत होतं. पुढे गेल्यावर पूल होता नदीवर. त्याच्या मध्यावरचे पुतळे बघितल्यावर पॅरीसच्या पुलाची आठवण झाली. अर्थात पॅरीसचा तो सुबकपणा आणि कलादृष्टी वजा जाता. तसे हे पुतळे ओबडधोबडच वाटले. पण या लोकांची कलासक्ती दिसत रहाते ठायी ठायी एवढ मात्र खरं!






पूल ओलांडल्यानंतर किल्ला. बाहेरून आम्ही बघत होतो. किल्ला पुरातन त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण. पण त्याला एका ठिकाणी लावलेल्या काचा विरूप करून टाकत होत्या. आत जायच? हा प्रश्न जेव्हा आमच्यापैकी कोणाच्याही मनात येतो तेव्हा त्याचं उत्तर अर्थात नकारार्थीच असतं कारण जायचं असेल तर आपण त्याची चर्चा कशाला करणार? तरीही प्रवेशद्वारापर्यंत गेलो. आत जायला तिकिट होतं. आता डोम चढून बॅसिलिकामधला तो घुमट चढून पुनः किल्ल्यात वर चढून जाण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही नव्हती. तिकिट देऊन कोण दमणूक करून घेईल असं म्हणत आम्ही बाहेर पडलो.

बाहेरच्या अंगाला दुकानांची रांग होती. गणपती राम-सीतेपासूनचे देव, वेगवेगळ्या भेटवस्तू तिथे दिसत होत्या. आता त्यामधला रस संपला असला तरी नवीन काही आहे का म्हणून बघत चाललो होतो. दुकानं ही प्रामुख्याने इतरेजनांची असावीत कारण तिथे काळे, आपले (= बांगलादेशी किंवा श्रीलंकन) विक्रेते दिसत होते. पुस्तकांचीही दुकानं होती पण ती अर्थातच इटालिअन भाषेतली पुस्तकं. चित्र बघून पुढे जात होतो.

आता परत फिरायला हवं असं घोकत होतो पण उलट फिरून मेट्रोला जायला कंटाळा आला होता. असेच पुढे जाऊ या कुठे तरी स्टेशन लागेलच म्हणत पुढे पुढे निघालो होतो आणि असं वाटलं की हा भाग ओळखीचा आहे. आता इथे कुठे ओळखीचा भाग असणार? आपण काल गेलो त्यापासून हे खूप दूर नाही का असं म्हणत असता लक्षात आलं की  काल आपण त्रेवी फाऊंटन शोधत असता चुकून गेलो होतो तो हा भाग आहे. मग मी मुद्दाम नकाशा बघितला तर खरच की आम्ही नदी ओलांडली तेव्हा या इथल्या पट्ट्यात आलो. आधी नकाशा नीट न बघितल्याचा परिणाम! संध्याकाळ झाली होती, काल याच वेळी आम्ही स्पॅनिश स्टेप्सला होतो. पुनः पाय-या चढून जाऊ या का? पुनः तेच नको म्हणत मग बार्बेरीनी स्टेशनच्या दिशेने चालत निघालो.


उद्याच्या परतण्याचं सावट मनावर होतं. रोममधले हे दिवस छान होते. आलो तेव्हा जाणवत असलेला उन्हाळा, पावसाच्या शिडकाव्यानंतर निवळून गारव्याची सुखद जाणीव होती. उद्या इथून निघायचं तेव्हा हसन नसला तर? खरतर इतका प्रश्न पडण्यासारखं काय होतं त्यात? दुकानातला एक विक्रेता, तोही मुळात आपलाच मुक्कम ज्या शहरात पूर्ण तीन दिवसही नाही अशा ठिकाणचा. पण हे सगळे व्यवहारी मनाला पटणारे तपशील अंतर्मनाला कसे पटतील? जाताना नकळत आमचं लक्ष गेलच दुकानाकडे. होताच तो तिथे. आज तर काही विकत घेण्याचा प्रश्न नव्हता. त्यालाही ते माहीत होतच की. पण तरीही एकीकडे काम सुरू ठेवत ( दुकान बंद करण्याची आवरासावर सुरू होती) तो बोलत होता. मला तसं चांगलं हिंदी बोलता येत नाही समजतं सगळं. तरीही .... असं म्हणून तो थांबला. इथे येऊन मला पाच वर्ष होतील आता. माझा भाऊ नऊ वर्षांपूर्वी आला होता. इतक्या वर्षात तो घरी जाऊ शकला नव्हता. आता त्याचे कागद तयार झाले आहेत. (म्हणजे त्याचं रहाणं आता अधिकृत झालं असावं.) तो आता तिकडे (बांगला देशला) गेला आहे. मला वाटतं मी पण पुढच्या वर्षी जाऊ शकेन (कायदेशीर बंधनांमूळे ) . पण एक सांगू का? मला तुमच्याकडे बघून खूप बरं वाटलं. तुम्ही दोघे बरोबर फिरता, एकमेकांशी बोलता, आमच्याकडे हे असं नसतं. माझे वडील म्हणजे मिलिटरी आहेत. ते आले की आई घाबरून गप्पच होते. तिला त्यांच्यासमोर बोलताच येत नाही इतकी त्यांची भीती (खरतर दहशत) आहे. मी त्याला म्हटलं, हसन तुझं लग्न झालं आहे का रे? तर लाजला, म्हणाला, नाही. मग त्याला सांगितलं कि निदान वडीलांची जी गोष्ट तुला बरोबर नाही असं वाटतं ती निदान तू तरी तुझ्या आयुष्यात करू नकोस. हसला आणि म्हणाला सही है.   

                                                                                    इति व्हॅटिकन 
                                                                                    पुढच्या मंगळवारी फ्लोरेन्स     

तळटीप : मी अंधेरी ब्रॅन्चमधे काम करत असताना मिसेस अरान्हा नावाच्या एक कस्टमर माझ्या आधी त्या जागेवर काम करणा-या मेन्डोन्सा नावाच्या मॅनेजरला शोधत आल्या होत्या.  व्हॅटिकनहून त्यांनी आणलेलं "होली वॉटर" त्यांना मेन्डोन्साना द्यायचं होतं. ती आठवण ठेवून मलाही आमच्या लुडा, मिशेल जेरी या मैत्रिणी आणि अर्नेस्ट या मित्राकरता ते घेऊन येण्याची इच्छा होती. पण......... अर्थात या सगळ्यांची मला तिथे प्रकर्षाने आठवण मात्र झाली. त्यांच्या पापलपर्यंत (पोपना पापल म्हणतात, जवळिकीने) नक्कीच ती आठवण पोहोचली असेल!               

Monday 15 December 2014

ITALY VATICAN III

व्हॅटिकन (३)
जाऊ दे असं म्हणत आम्ही बाहेर आलो. अजून एक महत्वाचं आणि कष्टाचं काम बाकी होतं. तसं ते आवडतं असल्यामुळे फारसा प्रश्न नव्हता. चढून वर घुमटापर्यंत जायचं. इथे खरतर लिफ्ट आहे. तिला थोडे जास्त तिकिट आणि पायी जाणा-यांना कमी तिकिट. पण लिफ्ट्ला इतकी गर्दी होती आणि त्यातून आपण काही म्हातारे नाही लिफ्टमधून जायला, ही ऊर्मी (खर म्हणजे माज) होता. आम्ही चालायला सुरवात केली. काहीतरी दोन अडीचशे पाय-या झाल्या आणि उजेड दिसायला लागला. हट इतकच तर होतं लिफ्ट नाही घेतली ते बरं झालं वगैरे म्हणून बाहेर आलो. इथवरचा जिनाही खूप रूंद वगैरे होता त्यामुळे काहीच कष्टदायक वाटलं नाही. बाहेर पडून खाली बघितलं फोटो काढले आणि कळलं हे जेमतेम अर्ध्यावर आलो आहोत. लिफ्टही माणसांना इथवरच आणून सोडते. पैसे वाचल्याचा आनंद झाला. पुढे सगळेच चालणार होते.

आता जिना थोडा अरूंद झाला होता. आमच्या मागे दोन बायका आणि एक छोटा मुलगा होता. असेल दहा बारा वर्षाचा. पाय-या मोजण्याचा त्याचा उद्योग सुरू होता. उत्तराही मोजत होती. त्याचा आकडा चुकला की त्याला सांगत होती. मग तो खिदळत होता. बरोबरच्या त्या दोन्ही बायका दमल्या होत्या त्यांना चिडवत याचं पटापट जिना चढणं सुरू होतं. असाच काही वेळ गेला. आता तो गोल जिना आणखी अरूंद झाला. जेमतेम एक माणूस एका वेळी. त्यामुळे वेग मंदावला होता. कोणीही पुढचा माणूस पुढे गेल्याशिवाय जाऊ शकत नव्हतं. पण कुठेही अंधार किंवा कोंडलेपण नव्हतं. मधे मधे त्यांनी वारा- प्रकाशाकरता झरोके ठेवले होते. दमलेल्या लोकांना त्याच्या आधाराने इतरांना पुढे जाऊ देता येत होतं. या सगळ्या वर जाण्यात कुठेही आरडा ओरडा, शिट्ट्या किंवा उगीचच किंचाळणं, घाबरवणं इ. कोणताही प्रकार नव्हता त्यामुळे हे कष्टही सुखद वाटत होते.

तिस-या टप्प्यात जेमतेम एका माणसाला सामावून घेणा-या त्या जिन्याची ती भिंत कलती झाली. त्यामुळे आम्हालाही भिंतीला तिरके होत जावे लागत होते. अखेरीस एकूण ६१२ पाय-यांचा हा प्रवास संपून आम्ही एकदाचे वर पोहोचलो. शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचा आनंद होता तसा वरून व्हॅटिकन बघण्याचासुद्धा


सेंट पीटर्स स्क्वेअर, व्हॅटिकन
छाया प्रकाशाचाच फरक!




समोरचा सेंट पीटर चौक देखणा खराच. कंपासमधलं वर्तुळ ठेवून काढलेला गोल आणि बाहेर जाणारा तो रस्ता! बघत रहावं असा. इतक्या उंचावर बांधलेल्या त्या गॅलेरीला अर्थातच जाळी होती. त्यामुळे कॅमेरा त्याच्या बाहेर काढून तो चौक टिपावा लागत होता. फोटो व्हिडिओ सगळेजण इतके गुंगलेले होते आणि त्यात नवीन येणा-यांची भर पडत होती. उत्तराला म्हटलं मी जरा इतर बाजूंनी बघतो आणि मी निघालो. जेमतेम माणूस जाऊ शकेल अशी रचना. त्यात खांबांचा अडथळा. वाट काढत काढत मी समोरून दिसणारा पूल त्यावरून जाणारी रेल्वे गाडी, किल्ला, नदी सारं काही आपल्याला डोळ्यात आणि कॅमे-यात बंदिस्त करता यावं या धडपडीत होतो. किती वेळ झाला कोणास ठाऊक पण आवरून आता निघू या असं वाटलं आणि बघायला गेलो तर गर्दीच्या त्या गोंधळात उत्तराचा कुठे पत्ता नव्हता. मी पूर्ण चक्कर मारली पण मधले खांब आणि गर्दी दोन्हीचा अडथळा होता. शिवाय तीसुद्धा माझ्यासारखी फिरत असेल तर? शेवटी मी एका जागी शांत उभा राहिलो आणि समोरून ती येताना दिसली.
"होतात कुठे  तुम्ही? किती शोधत होते तुम्हाला इतका वेळ.”
घायकुतीला आलेला तिचा आवाज ऐकला तेव्हा मला हसू आलं. जाऊन जाऊन कुठे जाणार होतो मी? तसाही खाली उतरल्यावर मी भेटलोच असतो पण माणसाचा धीर सुटला की विचारही सोडून जातो बहुधा.

आम्ही बाहेर पडण्याच्या रांगेत उभे राहिलो. परतीचा जिना सुदैवाने वेगळा आहे. तितकाच अरूंद एकामागोमाग एक असं चालायला लावणारा. पण परतीची वाट नेहेमीच सोपी असते! कदाचित आपल्याला कुठे जायचं हे माहित असतं म्हणूनही असेल पण तसेच पाय-या मोजत आम्ही मधल्या टप्प्यापर्यंत आलो तेव्हा तोच मघा वर येताना उड्या मारत वर चढणारा छोटा मुलगा पुढे होता. तशाच आणि तितक्याच उत्साहात पुढे जात होता.

मध्यावर येऊन विसावलो. तिथे पाणी, टॉयलेट सगळी सोय आहे. उंचावर असल्याने वारा छान होता. दिवस उन्हाळ्याचे. स्वच्छ आकाश आणि भोवतालचं सुंदर वातावरण. थोडा निवांतपणा आला होता. आजच्या दिवसात आता आणखी काही उरकायची (!) घाई नव्हती. आमच्या जवळ प्लॅस्टिकचे ग्लास (पुनः पाणी घालून धुवून ठेवलेले) होते ते काढले आणि थर्मासमधला चहा ओतून पीत होतो. झाल्यावर नळावरून धुवून परत ठेवायचे दुस-या वेळेकरता.
उत्तरा म्हणाली "मला विचित्र वाटतं. इतक्या लोकांच्यासमोर तिथे जाऊन ते ग्लास धुवून पुनः ठेवायचे म्हणजे काय, मी ते टाकून देते.”
मी म्हटलं "तुला विचित्र वाटायला इथे ना ओळख ना पाळख. दे माझ्याकडे मी आणून देतो.” मी घेऊन नळावर गेलो तेव्हढ्यात एक मुलगा तिच्याबरोबर बोलायला लागला.
"मराठी कानावर पडलं आणि बरं वाटलं!”
( हे मराठी कानावर पडल्यामुळे होतं की आमचा सुखसंवाद (!) ऐकल्यामुळे होतं कोण जाणे! लिहिलेले शब्द कोणत्या सुरात बोलले जातात त्यावर तर सारं ठरत असतं. ) कुठून मुंबईहून का? वगैरे नेहेमीचे प्रश्न होईपर्यंत मी तिथे पोहोचलो. त्याने मला हॅलो केले आणि म्हणाला मी राकेश थापर. माझी आई मराठी आहे, पार्ल्याला माझं आजोळ. मला पंजाबी आणि मराठी दोन्ही तितकच चांगलं येतं. आमच्या खूप छान गप्पा सुरू झाल्या. त्याने खूप वर्षापासून ओळख असल्याप्रमाणे त्यांच्या लग्नाची हकीगत सांगितली. तारा जुळल्या की माणसं किती जवळ येतात ! आमच्याकडे थर्मासमधे थोडाच चहा उरला होता. त्यांना विचारलं तर पटकन हो आलं. मला बरं वाटलं उगीच आढेवेढे नाहीत. आपल्यासारखा चहा इथे कुठे मिळायला? बरं वाटलं चहा पिऊन. अशी पावती पण त्यांनी दिली.


इतका वेळ बोलत असताना आमची नावं सांगण्याचा प्रश्नच आला नव्हता. पण त्यांना त्याची आठवण होती. मघा पार्ल्याचा विषय आला तेव्हा उत्तराने तिचं पार्ले कनेक्शन सांगितलं होतच. तिचं नाव ऐकल्यावर तो म्हणाला अरे! माझ्या आजीचं नावही उत्तरा आहे. What a coincidence! लंडनला रहाणारे ते दोघं लग्नानंतर अजून आजीला भेटायला यायला जमलं नव्हतं आणि आम्ही मुंबईहून निघून व्हाया नेदरलॅंन्डस इटलीमध्ये भेटत होतो. या गोष्टीचं अजब वाटत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला

                      
                                                                भाग चौथा आणि शेवटचा  पुढील मंगळवारी                                            
                
                                                                        

                                                                                


व्हॅटिकन टॉवरवरून दिसणारं
                                                                                                                                                           

Wednesday 10 December 2014

RESPONSES


प्रतिसाद

वाचकांचा प्रतिसाद हे लिहिणा-याचे टॉनिक असते. वेगवेगळ्या मार्गाने ही प्रतिक्रिया त्याच्यापर्यंत पोहोचत असते. मेलव्यतिरिक्त फोन आणि आता whats app हेही नवीन माध्यम आणि पुनः सहज उपलब्ध असल्यामुळे वापर जास्त. पण प्रत्यक्ष ब्लॉगवर येणा-या प्रतिक्रिया सर्वांपर्यंत पोहोचल्या तरी मेलद्वारा आणि इतर माध्यमातील प्रतिक्रियांना तो फायदा मिळू शकत नाही. गेल्या वेळी सर्वात शेवटी संकलन करून अशा मेलद्वारा आलेल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तेव्हाचीच एक सूचना अशी होती की त्या नंतर आम्हाला relate करता येत नाहीत त्यामुळे ताबडतोब द्याव्यात. यावेळीही ते सुरवातीपासून राहून गेले. कारणं बरीच त्यातलं महत्वाचं संकोच. पण आता असही वाटतं आहे की काही मेल्समधून मिळालेली माहिती आणि एका मेलमध्ये त्यांनी पाठवलेले फोटो हे पूरक माहिती/ अनुभव देणारे आहेत. हे लक्षात घेऊन आजवरच्या प्रतिक्रियांचे ठिकाणाप्रमाणे संकलन करून ते देत आहे. सर्वसाधारणपणे जरी ते तारीखवार आहे तरी काही ठिकाणी एका संदर्भातल्या सगळ्या मेल्स एकत्रित असल्याने तारखा पुढे मागे होऊ शकतील. तरीही विषयवार असल्यामुळे गोंधळ होणार नाही अशी अपेक्षा आहे.
सर्वांच्या प्रति कृतज्ञता!

Vatican

प्रिय आनंद,
आजचा भाग छान जमलाय. तू जे विचार व्यक्त केले आहेस त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे. तू पोप विषयी म्हटलं आहेस की त्यांचा हव्यास बघून तुला विषण्णता आली आणि चीड आली. अगदी तशीच चीड मला शिर्डीच्या साईबाबांचं त्यांच्या भक्तांनी जे काही करून ठेवलं आहे ते बघून येते. जो माणूस हयात असताना एखाद्या फकिरासारखा राहिला, चिंध्या आणि फाटकेतुकडे कपडे नेसून वावरला, पोटापुरती भिक्षा मागून जगला त्यालाच आता त्याच्या भक्तांनी चांदीसोन्यानं मढवून टाकलं आहे आणि भरजरी शालींनी झाकून टाकलं आहे. '' अपरिग्रह '' याचा अर्थ तरी कळतो का ह्यांना?
मृदुला


Vinayak Thatte thatte.vinayak@gmail.com [Aadim] Dec 9 at 2:23PM

Dear Anand,

तुझे प्रवासवर्णन हे केवळ वर्णन नसून मार्मिक रसग्रहणच आहे. प्रवासादरम्यान उमटलेले तुझ्या मनातील 'खरेखुरे' तरंग हे अनलंकारिक व down to earth भाषाशैलीत व्यक्त झाल्याने, चट्कन आपलेसे वाटू लागतात. e.g. खालील परिच्छेद -

प्रत्येक गोष्ट प्रमाणात असेल तरच त्याचा आस्वाद व्यवस्थितपणे घेता येतो हे अर्थशास्त्रातलं तत्व! इथेही ते तंतोतंत लागू पडत होतं. खूप सुंदर अशा या सगळ्या गोष्टी एकापाठोपाठ बघत असता आधी काय पाहिलं होतं हेही विसरून जायला होतं. अति गोड जेवणानंतर आपली काय हालत लागते? तशीच ही गत.

मला तर मनापासून असे वाटत आहे की उत्कृष्ट अनुभवासाठी, युरोपच काय कुठचाही दौरा तुझे ललितलेख वाचल्यानंतरच करावा. [बघूया आम्हांलाही पुनःप्रत्ययाचा "आनंद" अनुभवायला जमू शकतंय कां ?]

Keep going & writing too.

विनायक थत्ते


madhav joshi joshimj2002@gmail.com [Aadim] 2014-12-09 0:18 GMT+05:30
आनंदभाऊ

परत एकदा छान वर्णन आणि चिंतन!

2014-12-09 0:18 GMT+05:30 

Madhav J Joshi

9223409123

VIVEK JOGLEKAR vvj123@yahoo.com [Aadim] To Aadim@yahoogroups.com 2 Dec 2014

Anand

Liked it. One small piece of information. The Vatican Guards  are essentially Swiss nationals. In fact, non-Swiss nationals can not be employed as Vatican Guards. Also, these guards are compulsorily discharged from duty on attaining the age of 25.

Vivek

On Tuesday, December 2, 2014 12:40 AM, "anand patkie anand_patkie@yahoo.com [Aadim]" <Aadim@yahoogroups.com> wrote:

madhav joshi joshimj2002@gmail.com [Aadim] To Aadim 3 Dec

सहजसुंदर लिखाण
Madhav Joshi 9223409123

mukund bhagwat bmukund52@hotmail.com To Aadim@yahoogroups.com Dec 4 at 7:10PM

आनंद,
लेखन नेहमी प्रमाणेच सुन्दर आणि ओघवती. मायकेल एंजेलो आणि पिएता चे शिल्प तर केवळ अप्रतीम
मुकुंद

Sent from Samsung Mobile
Date:02/12/2014 20:32 (GMT+05:30)
Cc:
Subject: Re: { Aadim } आनंद अनुभव [3 Attachments]

Vivek-a-Anand,

Attaching herewith the relevant photos from my last year's album.

VT

 Swiss Guards

  
Border bet Vatican & Rome (Italy)marked with a simple white line.

इटली आणि व्हॅटिकन हे जरी वेगळे देश म्हटले तरी ते नाममात्रच आहे. युरोपिअन युनिअनचे मात्र तसे नाही तरीही त्या देशांमधील सीमारेषा अशाप्रकारेच एक रेष आखून निर्देशित केलेली असते. यासंदर्भात बेल्जिअम व  नेदरलॅन्डसमधील सीमारेषा दाखवणारा हा फोटो. यातील बेल्जिअम म्हणजे BL आणि नेदरलॅन्डस म्हणजे NL

 

हे आपल्याकडे कधी होइल?



Rome

Sushama Damle

Nov 30 (10 days ago)

To me





hello I I opened my gmail after a long time. and read all the three parts in one go. Really you write so well
I am looking forward for your next journies. One/two photographs of both of you would be welcomed



mukund bhagwat bmukund52@hotmail.com [Aadim] To Aadim@yahoogroups.com 27 Nov 2014

Anand
very nice as usual...
I remember a structure silmiler to Panthion seen some where in MP, most probably in
Mandav gadh. I don't remember now but i have taken snaps where there was a big
circular hole just open to sky.

Regards

madhav joshi joshimj2002@gmail.com [Aadim] To Aadim 26 Nov 2014
ता..
खालील वाक्ये गाळली गेली होती
'अवर्णनीय असा साधेपणा आणि गोडवा असलेली आपली शैली प्रवास वर्णन वाचताना ते स्थळ डोळ्यासमोर उभे करते अगदी हळुवारपणे '

Madhav Joshi 9223409123

sarang charankar sarang_charankar@hotmail.com [Aadim] To aadim aadim 24 Nov

आनंद,

दोन्ही भाग वाचले. नेहमीप्रमाणे छान आहेत.

सारंग


sunil brahme

Nov 19

To me



आपल्याकडे वर्दीचा जो अंगभूत माज असतो तसा तो इथे अभावाने दिसतो.

(मला मुद्दाम स्पष्ट करणे आवश्यक वाटते की मेल लेखक हे भूतपूर्व पोलिस उच्च अधिकारी आहेत.)
sunil brahme

Nov 13

To me



Lay bhaari.....



madhav joshi joshimj2002@gmail.com Aadim@yahoogroups.com 13 Nov

नेहमीप्रमाणे रंजक आणि ओघवते

2014-11-11 0:02 GMT+05:30 anand_patkie@yahoo.com<Aadim@yahoogroups.com>:

Madhav J Joshi
9223409123


madhav joshi joshimj2002@gmail.com [Aadim] To Aadim@yahoogroups.com 25 Nov

अनेकजण रोमला जातात पण घाई घाईने यात्रा कंपनीच्या सोयीप्रमाणे. आपण चावी चवीने आस्वाद घेत प्रवास करीत आहात या बद्दल आपला हेवा वाटतो व आपल्या दोघांच्या उत्साहाचे कौतुक वाटते.
आपल्या लिखाणातील सहज सुंदरता,तपशील मनाला मोहवितात . जागोजागी मुक्तपणे केलेला भावनांचा शिडकावा आपल्या लिखाणाला रंजक करतात .


Madhav J Joshi
9223409123


sarang charankar sarang_charankar@hotmail.com [Aadim] To aadim aadim 26 Nov

वाहवा. माधव मी तुझ्याशी १०० टक्के सहमत आहे. छान आणि अगदी मनातली प्रतिक्रिया दिलीस. आम्हाला असे शब्द सापडत नाहीत.
तू आणि आनंद, दोघेही अभिनंदनास पात्र.

धन्यवाद.

सारंग

pravin<noreply-comment@blogger.com>

Nov 6

To me


pravin has left a new comment on your post "ITALY NAPLES (NAPOLI) IV":

आनंद,
याच क्षणाची वाट पहात होतो. मागच्या वेळेस आपण भेटलो तेव्हा महत्प्रयासाने जिभेच्या टोकावरले प्रश्न गिळून टाकले.
तू रोमबद्दल कधीतरी लिहिशीलच या आशेवर थांबलो होतो.
तू लिहिल्यामुळे आमचंच पुन्हा ते क्षण जगल्याच समाधान.
सलग ४ दिवस रोमच्या दगडी रस्त्यांवरून पायी फिरून त्या २००० वर्षांपूर्वीच्या एका समृद्ध संस्कृतीच्या खुणा पुन्हा पुन्हा पहात होतो तेव्हा जाणवलं नाही. पण परत आल्यावर मानवाच्या कल्पनाशक्तीची ती क्षमता, प्रत्येक दगडातून कोरलेल्या ( कधी कधी विना आकारसुद्धा ) शिल्पांमधून सारखी डोकावत असते.
असो.
तुझा अनुभव काय हे वाचायला मला नक्की आवडेल.
वात पहातो.
प्रवीण




sarang charankar sarang_charankar@hotmail.com To Aadim@yahoogroups.com 5 Nov

प्रिय आनंद,

तुझे सर्व भाग फोटोसकट वाचले/पहिले. तुझ्या सोप्या व सरळ भाषेमुळे व बारीकसारीक तपशिलामुळे तिकडे जायची अनामिक हुरहूर लागून राहिली. असाच लिहित राहा व आम्हाला आनंद देत राहा.

Sarang



Naples
Pallavi V pallavi.jrv@gmail.com [Aadim] To Aadim@yahoogroups.com 30 Oct
आनंद , तुझे तीनही भाग एकत्र वाचले. खूप छान. गुहेतील अनुभव विशेषच असेल. तुमचा उत्साह पण दांडगाहे .
असेच आम्हाला सर्वत्र फिरवून आणा .
शशी.

2014-10-28 1:01 GMT+05:30 anand_patkie@yahoo.com<Aadim@yahoogroups.com>:

प्रिय आनंद ,

तुझे अनुभव खरंच आनंददायक आहेत. फिरवून आणल्याबद्दल thanks .

पुढच्या ब्लॉगची वाट पहातोय .

रवि

Thanks & Regards,
Ravi Bhagwate

This is a mail from
Ravindra Bhagwate
Freelance Writer
602,Anil Apt.,Near Palkhi
Mithagar Cross Road
Mulund(East)Mumbai 400081
Mobile : 9833157771


pravin<noreply-comment@blogger.com>

Nov 6

To me



pravin has left a new comment on your post "ITALY NAPLES (NAPOLI) IV":

आनंद,
याच क्षणाची वाट पहात होतो. मागच्या वेळेस आपण भेटलो तेव्हा महत्प्रयासाने जिभेच्या टोकावरले प्रश्न गिळून टाकले.
तू रोमबद्दल कधीतरी लिहिशीलच या आशेवर थांबलो होतो.
तू लिहिल्यामुळे आमचंच पुन्हा ते क्षण जगल्याच समाधान.
सलग ४ दिवस रोमच्या दगडी रस्त्यांवरून पायी फिरून त्या २००० वर्षांपूर्वीच्या एका समृद्ध संस्कृतीच्या खुणा पुन्हा पुन्हा पहात होतो तेव्हा जाणवलं नाही. पण परत आल्यावर मानवाच्या कल्पनाशक्तीची ती क्षमता, प्रत्येक दगडातून कोरलेल्या ( कधी कधी विना आकारसुद्धा ) शिल्पांमधून सारखी डोकावत असते.
असो.
तुझा अनुभव काय हे वाचायला मला नक्की आवडेल.
वा पहातो.
प्रवीण

Google+ (vinita limaye)



To me


Thank you so much for wonderful gift of Blogs! I love to read "Anand Anubhav", as it is always virtual tour of the places n experiences!






Madhavi Kulkarni<madhavi.peegee@gmail.com>

Oct 16

To me



तू कितीही म्हटलस तरी मला आपलं मेलच करायला आवडत म्हणजे जमतं ! मस्त लिहिलयस ! अधिक सफाई ,अधिक मोकळेपणा , अधिक जोडले जाणे . . त्या अनुभवाशी , तसंच त्याच intensity ने आमच्याशीही . . तेच तर महत्वाचं असतं . खरोखर विश्वाशी तद्रूप झाल्यासारखं वाटलं. . a big complement !isnt it? accept it n enjoy it..! all d best!

Alka Dandekar (Google+)<replyto-2891ff65@plus.google.com> Unsubscribe

Oct 14




hi anand, just read urblog.it is fantastic.i liked ur cycle ride experience and barsolina the most.waiting for more .........alka


Jayant Gune <noreply-comment@blogger.com>

Oct 14

To me





Jayant Gune has left a new comment on your post "ITALY NEPALES":

फारच छान. दोन्ही ब्लॉग एकदम वाचले. तू हात धरून फिरवतोयस असं वाटतं

Posted by Jayant Gune to Anand Anubhav at 14 October 2014 04:52



Subhash Potdar<subhashpotdar@gmail.com>

Oct 14

To me



Upakrams Shubhechha.

Two suggestions - 1. In addition to email version only - need to print a book / booklet. No pun intended.
2.Please teach me in sending email in MARATHI --- I can do but get lost while doing so - kathin shabda gondhla ghalatat aani aamshi hava kadhun taktata

Onceagain best luck

Regards,

Subhash
703 625 8430


2014-10-13 14:36 GMT-04:00 Anand Patkie<anandpatkie@gmail.com>:

madhav joshi joshimj2002@gmail.com [Aadim] To Aadim@yahoogroups.com 14 Oct

परत एक सुंदर अनुभव . आनंद लिहित रहा ।

आम्हाला घर बसल्या यात्रेचे पुण्य आणि आनंद मिळतो आहे.

2014-10-14 0:00 GMT+05:30 anand_patkie@yahoo.com<Aadim@yahoogroups.com>:
Madhav J Joshi
9223409123

sarang charankar sarang_charankar@hotmail.com  To Aadim@yahoogroups.com 19 Oct

आनंद,

सुरवात तर छान केली आहेस. सरळ सोपी आणि ओघवत्या भाषेमुळे वाचायला मजा येते.

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

सारंग